";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......

नोटाबंदी

E-mail Print PDF

Add this to your website

Image result for १००० नोट

 

निवेदक : एखादी घटना कोणाला काय देऊन जाईल सांगता येत नाही. आता हेच पहा ना, देशाच्या अर्थकारणासाठी नोटाबंदीचा निर्णय घेताना अशी पण एखादी घटना घडेल असे त्या पंतप्रधानांना माहीत तरी होतं का? स्थळ : मोठ्या भर चौकातल्या नॅशनल बँकेसमोरची नोटा बदलासाठीची हिमालयाएवढी गर्दी. नुसताच गोंधळ कलकलाट. नोटा बदलासाठीचा बाजार. रांगेत म्हातारे-कोतारे, स्त्रिया, पुरुष सगळेच. एकूण वातावरणातून हा गर्दीचा तिसरा दिवस असावा. कारण विजया आणि जय ही दोन तरुण मंडळी गेले दोन दिवस इथे आली. पण त्यांना नोटा बदलण्यात अपयश आलं. नुसतीच नजरानजर तिसर्‍या दिवशी दोघांचा 300, 301 वा नंबर. कोणीतरी चिठ्ठ्या वाटल्या म्हणून कळला. विजया जयला कुठेतरी भेटलेली. जय विजयला कुठेतरी भेटलेला. चाचपणी चालू आहे. एवढ्या भांडवलावर दांतो तले उंगलीया दबाना आणि दिलकी धडकन!

तो : कुठंतरी, तुला पाहिलंय ती : कुठं बरं, मलाही तसंच वाटतंय... तो : खरंच! ती : अहो, परवाच पाहिलंय! म्हणजे पहाते आहे नोटांच्या रांगेत. तो : दोन दिवस आपण येतो आहो. पण अजून नोटा बदलून मिळत नाहीत काय करावे? काल अखेरपर्यंत उभा राहून उपाशीच घरी गेलो. ती : मी पोहे आणले आहेत आज. खाऊ या का? नोटाबंदी तो : तू स्वत: केलेस? की आईनं? ती : मी स्वत: तो : मग खाल्लेच पाहिजेत. तू रहातेस कुठे? ती : जवळच. (अर्थात तुझ्या हृदयातच) तो : तीनशे नंबर आहे माझा, लकी नंबर! ती : माझाही लकी नंबरच आहे 301. अगदी लक्की. परीक्षेचा, स्कूटीचा, बँक अकाऊंट, मोबाईलचा शेवटचा 301 निवेदक : (एवढ्यात गर्दीचा रेटा पुढून मागे येतो. तो स्वत:ला सावरत मागे कोसळतो. तिला धक्का लागतो.) तो : अगं, अगं, काय गर्दी आहे. लागला का धक्का. ती : लागू द्या हो! गर्दीचं काय? देशासाठी चांगला निर्णय राबवायचाय ना. तो : हो ना! फारच कंटाळलो होतो

मागच्या राजवटीला. ती : अहो, तुम्हालाही आवडला ना हा निर्णय. तो : हो, पण एकदम अहो-जाहोनको. आज नोटा मिळाल्या नाहीत तर उद्या आणीन मी खायला काहीतरी. ती : बरं बरं! तो : पोहे आवडले, जरा तिखट झालेत. पाणी हवं होतं. ती : आहे. (पर्सधून पाण्याची बाटली काढते) तो : इतकी छोटी. एक घोटच पाणी प्यावं लागेल.

ती : पण मी बाटलीला तोंड लावून पाण  प्याले आहे. तो : असू दे गं! तोंड लावून म्हणू नकोस. ती : मग काय म्हणू. तो : ओठ लावून म्हण. ती : अय्या मस्तच. तो : काय? ती : तुचं वाक्य. एकदम ओठावर आलात. तुम्ही लेखक, कवी आहात? तुच्या कवितेत आलीच. निवेदक : (पुन्हा रेटारेटी होते. पुढचे मागे, मागचे पुढे होतात) तो : काय ही रेटारेटी! चेंगराचेंगरी! आपण खरं तर आत्तापर्यंत बँकेच्या दारापाशी जायला हवं होतं. पण मगापेक्षा फारच मागं आलो. ती : केव्हा मिळणार बदलून नोटा. तो : जेवढा वेळ लागेल तेवढा आपल्याला सहवास हवाहवासा वाटेल. ती : तुम्ही सरळ बँकेकडे तोंड करून उभे रहा ना. तुम्ही माझ्याकडे आणि रांगेतले आपल्याकडे पहात आहेत. तो : तुम्ही नको, तू हवंय! ती : काय हवंय! तू? तो : तू हवी आहेस. ती : अन नोटा? तो : तू म्हणजेच माझी नोट. कोरी करकरीत. ती : नवी. म्हणजे बदलणार नाहीस. तो : वेडी आहेस का? ती : नव्हते. पण गेल्या दोन दिवसात झाले आहे. निवेदक : (पुन्हा गर्दीचा रेटा मागून पुढे येतो. आता ती त्याच्या अंगावर पडते... किंचाळते... रांगेतले सगळे त्यांच्याकडे पहातात.) ती : तू काय करतोस? तो : नोकरी.

तुझं ही बाटली आणि तो नाक पुसायचा रुमाल इतका बारीक का असतो कळत नाही. निवेदक : (आता उन आणि गर्दी वाढते आहे) तो : नोटांची ही गर्दी पाहून अजून पाच दिवस तरी आपला नंबर लागणार नाही वाटतंय. ती : मग काय पाच दिवस यायचं! अन् मग लकी नंबरचं कायतेवढ्यात बँकमॅनेजर पाटी लावतो छे उरीह. ती : तुझं म्हणणं खरं झालं. निवेदक : आता गोंधळ आणि कोलाहलातच गर्दी पांगली. जवळजवळ संपली. दोघांच्या चेहर्‍यावर चिंताग्रस्त चिन्ह उभं राहिलं. बँकेचा शिपाई दार बंद करायला लागला तेव्हा म्हणाला. शिपाई : कालपासून सकाळ-संध्याकाळ येताय. पाहतोय मी. नोटा बदलून हव्यात नाया पटकन आत. घ्या बदलून. निवेदक : (मग दोघांच्या चेहर्‍यावरचं प्रश्नचिन्ह वितळलं. दोघांनी नोटा घेतल्या आणि) तो : चल आता बागेत आपलं प्रेआपण कॅश करू. ती : थांबा ना! मी माझी स्कूटी काढते 301. तो : थांबा नव्हे चल लवकर’ असं म्हण. शिपाई : नोटाबंदी पथ्यावर प्रेी युगुल बोहल्यावर

काय? ती : जे तुझं तेच माझं. नोकरी. तो : छान! (असं म्हणून मान डोलावतो.) तो पाणी पितो. तो : उद्या मोठी बाटली आण. श्रीकृष्ण पुरंदरे

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 520

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds