";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- आटपाट नगरीतली गोष्ट

आटपाट नगरीतली गोष्ट

E-mail Print PDF

Add this to your website

आधुनिकतेकडे वळणार्‍या आटपाट नगरीचा राजा उदात्तवीर याचं अकस्मात निधन झालं. एकाऐवजी दोन राण्या करूनसुद्धा त्याला पोटी संतान नव्हतं. काय करावं? राज्याला वारस तर हवा! दोन्ही राण्यांनी शेठजी भटजीला विचारून सल्ला मसलत केली. आधुनिकतेकडे वळणारं, सुशिक्षित आणि धैर्यवान स्त्रिया असणारं ते नगर आजूबाजूच्या राजांच्या डोळ्यात सलत होतं. हे नगर काबीज करावं म्हणून अनेकांनी प्रयत्न केला, पण तो हाणून पाडण्यात आला. त्यांच्या सैन्यात पुरुषांइतक्या स्त्रियाही होत्या. पण आता दोन्ही राण्यांना काळजी पडली. राज्य चालावे कसे आणि गादीवर बसवावे कोणाल ? आजूबाजूला नातलग बरेच होते, ते आपल्या मुलाला, भावाला गादी मिळावी म्हणून पुढं पुढं करीत होत ; पण ते सगळे होते आयत्या बिळावरचे नागोबा!! राज्यात सणवार, राष्ट्रीय सण, जागतिक महत्त्वाचे दिवस साजरे होत. आता येऊ घातला होता, महिला दिन. राण्यांनी त्या त्या भागातल्या महिलांचा मानसन्मान करण्याचे ठरवले. सगळ्यांना दवंडीद्वारे आमंत्रण गेली.

पण अनेकांच म्हणणं पडलं की, गादीवर राजा खास नसताना असा उत्सव साजरा करणं बरं नव्हे. त्वरीत कोणीतरी मुलगा म्हणून निवडावा, आणि तो दत्तक घेऊन त्याला राज्य सोपवावं. पण राण्यांना कोणी कर्तबगार पुरुष नजरेसच येईना. रात्रभर जागून राण्यांनी एकमेकीत सल्लामसलत केली, आणि एकदम त्यांच्या ध्यानात आलं की, आपल्याच शहरातील एक नववी इयत्तेत शिकणारी मुलगी इंद्राणीजी विज्ञानावर प्रयोग करते, कथ्थक करते, आणि कराटेसारखे आत्मसंरक्षणाचे प्रात्याक्षिक दाखवते, तिलाच राजाम्हणून गादीवर बसवावे. पण हे घडणार कसे? का नाही घडणार? सांडणीस्वारातर्फे त्या इंद्राणीला राण्यांनी बोलावले. धीट, हुशार इंद्राणीया आमंत्रणाने अवाक् झाली.

पण घाबरली मात्र नाही  आपल्या जन्मदात्यांना आणि कुलदेवतेला दंडवत घालून ती राण्यांना कुर्निसात करायला गेलीदेखील. बिचारे इंद्राणीचेमातापिता काळजीत पडले. राज्याच्या राण्यांचं बोलावणं? राण्यांनी इंद्राणीस सगळी परिस्थिती कथन केली. क्षणभर तिचे डोळे दिपले. तोंडाला कोरड पडली. पण... राण्यांनी महिलादिनानिमित्त समस्त महिलांचा मेळावा, हळदीकुंकू, ओटीभरण असा कार्यक्रम ठेवला आणि भरगच्च दरबारात पारंपरिक राजाच्या वेषातील इंद्राणीस पाचारण करून ही इंद्राणी आजपासून राजकन्याझाली असून ती या राज्याचा राजाम्हणून कारभार पाहील. आम्ही तिला सर्व सूत्रे बहाल करतो. हीच महिला दिनाचे दिवशीची समस्त राज्यास आपुलकीची भेट’!” इंद्राणी, तिचे मातापिता आनंदाश्रुंनी न्हाऊन निघाले. इंद्राणीच्या अभिनंदनासाठी रयतेची रांग लागली. हा अनोखा महिला दिन राज्याने आनंदात साजरा केला. इंद्राणीरयतेचं राज्य आनंदानं करू लागली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 441

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds