";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......

संस्कार

E-mail Print PDF

Add this to your website

संस्कार

म्हणजे खरं तर चांगले वळण/शिस्त असे मला वाटते. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा असतो. आपण त्याला जसा आकार देऊ तसा तो सुंदर तयार होत असतो. संस्कार हे घरातून प्रत्येक मुलावर चांगले होत असतात. परंतु या बालसंस्कार वर्गात गेल्या 4 वर्षांपासून आम्ही सगळा शिक्षकवृंद वेगवेगळ्या नवीन संकल्पना राबवून मुलांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतो. या संस्कार वर्गात आम्ही मुलांवर मानसिक व शारीरिक असे दोन्ही प्रकारचे संस्कार करत असतो.

आमचा सर्व शिक्षकवृंद त्यांच्यामागे असणारी नोकरी/ व्यवसायाची व घराची जबाबदारी सांभाळून विनामूल्य शिकवण्यासाठी येत असतो. संस्कारवर्ग दररोज सोवार ते शुक्रवार सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळात असतो. दररोज 2-3 शिक्षक असतात. यामध्ये आम्ही स्तोत्र, श्लोक, रामरक्षा, गणपती अथर्वशीर्ष, छोटी गाणी, गोष्टी, योगासने, प्राणायाम इत्यादी बरेच काही शिकवत असतो. यावर्षी आम्ही आषाढी व कार्तिकी एकादशीला मुलांची सुंदर बालदिंडी विठ्ठल मंदिरात घेऊन गेलो. तसेच बालगोपाळांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा व मोठ्या मुलांसाठी गणपती अथर्वशीर्ष सुस्पष्ट म्हणणे या स्पर्धा घेतल्या. नवरात्रीत मुलांचा भोंडला घेतला व मुलांना खाऊ देण्यात आला. डिसेंबर महिन्यात श्रीदत्त जयंतीनिमित्त येथे संस्कारवर्ग घेण्यात आला. गणेश जयंतीनिमित्त श्रीसिद्धीविनायक मंदिर येथे मुलांनी श्लोक,

गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष म्हटले. जानेवारी महिन्यात शाहूनगरच्या बागेध्ये सहल नेण्यात आली. मुलांचे खेळ घेतले. तसेच पोटभर नाश्ता देण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात मुलांचे दातांचे आरोग्य तपासणीसाठी एक दिवस मोफत डेन्टल कॅम्प ठेवला होता. त्यासाठी पिंपरी येथील डॉ. अनिता पेसवानी व त्यांच्या सहकारी आल्या होत्या. संस्कार वर्गाचा समारोप 31 मार्च 2017 ला झाला. त्या दिवशी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. संजीवकुमार पाटील आले होते. ते भूलतज्ज्ञ असून नाटककार, दिग्दर्शक आहेत. तसेच मन:शक्ती केंद्र लोणावळाचे ते साधक आहेत. त्यांनी सुजाण पालकत्वयाविषयी संस्कार वर्गातील मुलांच्या पालकांना तसेच शिक्षकांना खूप सुंदर मार्गदर्शन केले. पाण्याचे महत्त्व, रोज मोठ्यांना नमस्कार करणे, रोज मंदिरात जाणे, मोठ्यांचे ऐकणे, खोटे न बोलणे इत्यादी आम्ही सांगितलेल्या गोष्टी मुलं आपल्या पालकांना आवर्जून सांगतात.

व या गोष्टींचे पालनही करतात. संस्कारवर्गात मुख्य रवींद्र टोळे, सौ. रोहिणी टोळे, विजय अभ्यंकर काका तसेच श्रीनिवास साठे हे कार्यरत असतात. साठे काकांचे काम हे न दाखवता पण काळजीपूर्वक व बारकाईने सगळीकडे लक्ष ठेवून चालू असते. तसेच श्रीमती सुन नामदे, सौ. प्रिती साठे, सौ. सपना साठे, सौ. मीरा जोशी, सौ. शिल्पा जोशी, सौ. रजनी जोशी, सौ. संगीता धोंडीराम, सौ. जान्हवी एरंडे, सौ. सविता स्वामी, सौ. सुवर्णा देशपांडे हे सगळे शिक्षक संस्कारवर्गात कार्यरत आहेत. यावर्षी श्रीनिवास साठे यांनी संस्कारवर्गाला 5001 रु.ची देणगी दिली आहे. हा संस्कारवर्ग अधिकाधिक चांगल्या प्रकारे घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सौ. सुवर्णा देशपांडे

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 495

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds