";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- सखाराम हरी गुप्ते

सखाराम हरी गुप्ते

E-mail Print PDF

Add this to your website

छत्रपती श्री शिवरायांप्रमाणे पेशव्यांच्याही काळात चां. का. प्रभू ज्ञातीतील अनेक योद्धे होऊन गेले. त्यापैकी एक म्हणजे सखाराम हरी गुप्ते व त्यांचे बंधू बाबूराव हरी गुप्ते. हे दोघेही बंधू पराक्रमी असून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पदरी ते पुण्यास होते. सखाराम हरी यांचा जन्म सन 1718 मध्ये झाला असून ते आंबेगावकर गुप्ते कुटुंबापैकी होते. सन 1738 च्या पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात त्यांनी निजामाच्या स्वारीत युद्धकौशल्याने निजामास पकडले. तेव्हापासून रघुनाथराव पेशवे (राघोबादादा) व सखाराम हे मित्र झाले. इ.स. 1740 ते 1761 या काळात नानासाहेब पेशव्यांनी सखाराम यांना सालाना खर्चाकरिता तीन लाख, सैन्याच्या खर्चापायी 6 लाख रुपये दिले होते.

सन 1761 मध्ये राघोबादादांबरोबर त्यांनी दिल्लीस अब्दालीवर स्वारी करून त्याला अटकेपार केला व मराठ्यांचा जरीपटका भगवा तेथे फडकावला. या कामगिरीबद्दल त्यांना दिल्लीच्या बादशाहकडून मुसेखोर, आंबेगाव वतन दिले. इ.स. 1763मध्ये रघुनाथरावांविरुद्ध मोरोबा फडणवीस, सदाशिव रामचंद्र भवानराव प्रतिनिधी आणि गोपाळ पटवर्धन अशी खास मंडळी निजामास मिळाली. त्यांच्यावर रघुनाथरावांनी खास सरदार घेऊन स्वारी केली. निजामाचा पाडाव केला. त्या वेळी सखाराम यांनी राघोबादादा ऊर्फ रघुनाथराव यांना शत्रुंपासून वाचवले. या भयंकर संकटातून आपण वाचलो त्याची जाणिव ठेवून कृतज्ञ होऊन रघुनाथरावांची प्रिती एवढी एकमेकांवर जडली की सखाराम यांच्या वाचून त्यांना चैन पडत नसे. ते आनंदीबाईंना नेहमी सांगत की, ‘माझ्या पोटात घास जातो तो तितकाच काय,

माझे बाकी सर्व ऐश्‍वर्य सखाराम हरींचे समजावे. कारण यापुरता विेशासू, शूर व माझे भरवशाचा दुसरा कोणीही नाही.सन 1773 मध्ये पेणकर ब्राह्मण मंडळींनी चां.का.प्रभूंचा क्षत्रियवाद उत्पन्न करून कायस्थ प्रभूंची कार्ये बंद केली होती. याबद्दल सखाराम हरींनी श्रीमंत पेशव्यांस याबाबत सर्व समजावून सांगितले व हे ग्रामण्य मोडून सर्व कार्ये पूर्वापार सुरू केली. सन 1778 साली सखाराम हरी यांना  त्यांचे मेव्हणे भास्करराव राजापूरकर यांच्या घरी मेजवानीस बोलावून जेवणात भांग असलेले पदार्थ वाढून गुंग केले; नाना फडणवीसांनी त्यांना कपटाने पकडून धनगड या किल्ल्यात टाकले. सखाराम हरी यांच्या पत्नी आवई यांच्याकडून सखाराम हरींच्या भेटीसाठी त्याकाळी रु. 12,000/- किल्ल्याच्या सरदाराने मागितले.

ते त्यांनी भरण्याचे मान्य केले व आपल्या पुत्रास व कन्येस त्यांच्याजवळ ठेवण्याची परवानगी नाना फडणवीस यांच्याकडून मागितली. ज्या वेळी ती सनद मिळाली त्या दिवशी आवई श्रावणातील मंगळागौर पुजत होत्या. ती तशीच टाकून त्या पतीदर्शनासाठी धावल्या. परंतु गडावर जाताच त्यांना सखाराम हरींच्या मृत्यूची बातमी कळली. त्यांचा धनगडावरून कडेलोट करण्यात आला. दि. 07 ऑगस्ट 1780चा तो दिवस. त्यामुळे या घाटाला सौभाग्यवतीचा घाटम्हणतात. कारण आवई घाट चढल्या तेव्हा सौभाग्यवती होत्या व घाट उतरल्या तेव्हा विधवा झाल्या. त्यामुळे आंबेगावकर गुप्ते घराण्यात मंगळागौर कित्येक वर्षे पूजत नसत. सखाराम हरींसारख्या ज्ञातीतील इमानी व पराक्रमी वीर पुरुषांस वंदन! 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 544

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds