";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- श्‍वानपुराण

श्‍वानपुराण

E-mail Print PDF

Add this to your website

 

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा सार्वकालीन आहे. त्यांच्याबद्दल अनेकदा, अनेक वृत्तपत्रांतून तक्रारी, सूचना येत असतात. (समर्थाघरचे श्‍वान वेगळे!) सध्या त्यांचा वावर येथील अनेक वसाहतींमधून दिसून येतो. (भालेराव कॉलनीत तर ती सध्या 10च्या गटाने फिरतांना दिसतात) काळे फडके, डोक्यावर काही बोजा घेतलेल्या माणसांवर ती भुंकतात, मुले घाबरून पळू लागली की कुत्री त्यांच्या मागे लागतात. दुचाकी, चारचाकीच्या मागे पळत पाठलाग करतात, त्यामुळे अपघात होतात. अशी भटकी कुत्री चावल्यावर पूर्वी पोटात 9 इंजेक्शन्स घ्यावी लागत असत, आता ती संख्या (पाचावर धारण) पाचावर आलेली आहे.

मांजर लबाड, तर कुत्र्याची इमानदार म्हणून ख्याती. घराच्या राखणीसाठी, शेतावर त्यांचा उपयोग होतो. बाँबशोधक पथकात त्यांचा चांगला उपयोग करून घेतला जातो, सर्कशीतही त्यांचे खेळ दाखविले जायचे. त्यांना नटवून त्यांचे फॅशन शोही गुलहौशी मंडळी भरवत असतात. इतिहासकालीन अशा एका इमानदार कुत्र्याची समाधी महाराजांनी बांधल्याचे सर्व ज्ञात आहे. घरीदारी पाळलेल्या कुत्र्यांचे काही ठिकाणी तर माणसांपेक्षा जास्त लाड पुरवले जातात. त्यांना दूध, नॉनव्हेज खिलवले जाते. सलूनमध्ये नियमितपणे त्यांचे केस कापले जातात, त्यांच्यासाठी डॉक्टरही असतो.

पण या कुत्र्यांध्येही एक अवखळ भटकीजमात असते. त्यांच्या वागण्याने मात्र त्यांना वरीलप्रमाणे व्हीआयपी ट्रीटमेंट न मिळता मारच मिळतो. गेल्या चार वर्षात 50 हजार जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरिता प्रत्येक इंजेक्शनाकरिता 400 रुपये याप्रमाणे सुारे दोन हजारांचा खर्च येतो. पूर्वी केइएम हॉस्पिटलची (मुंबई) श्‍वानपुराण डॉगव्हॅन’, अशीच रस्त्यावरची भटकी कुत्री पकडून विद्युतदाहिनीत नष्ट करीत असे. आता मात्र सामान्य माणूस कात्रीत सापडतो, कारण एकीकडे भटकी कुत्री दंश करतात, त्यांना मारायला जावे तर पेटासारख्या प्राणिप्रेी संस्था त्यांना वाचवायला पुढे येतात, एवढेच नाही तर त्यांना क्रूर वागणूक दिली तर संबंधिताविरुद्ध कोर्टात केसही टाकतात. हे खरे की प्रत्येकाला, मग तो मनुष्य किंवा प्राणी असो, जगण्याचा अधिकार आहे, परंतु त्याबरोबर हेही अभिप्रेत आहे की त्याच्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये.

असं म्हणतात की मनुष्य जन्मजात गुन्हेगार नसतो, तर त्याला परिस्थिती तसे बनवते. त्यामुळे त्यांना सुधारण्याकडे सरकारचाही कल असतो. त्यामुळे मनात असा विचार येतो. रस्त्यावर बेवारस फिरणारी ही कुत्रीच व घराघरातून लाडाकोडाने पाळली जाणारीही कुत्रीच. समाजाने अव्हेरल्याने ती भटकी, गुन्हेगार बनली. कुत्र्यांची वीणफास्ट असल्याने त्यांची संख्या वाढत जाते, हाही एक समाजापुढे प्रॉब्ले आहे, रस्त्यावर सोडून दिलेली कुत्री, त्यांचे पालनपोषण न केल्यानेही त्यांना खायला न मिळाल्याने हिंस्र बनतात. अशा भटक्याया सदरात मोडणार्‍या सर्व कुत्र्यांना एकत्र करून त्यांची स्वतंत्र वसाहत स्थापन करून त्यांना माणसाळावलेतर ती नक्की सुधारतील. यासाठी खर्चही बराच येईल. नाहीतर कुत्र्यांचे निर्बिजीकरण, रेबीजवरील खर्चिक इलाज, यासाठी मुबलक खर्च येतो. प्राणिप्रेी संस्थांनी खटले दाखल करण्यापेक्षा वरील सूचनेच्या अंलबजावणीसाठी मदत केल्यास त्यांना पुण्य लाभेल!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 388

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds