";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय वाचनालय

सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय वाचनालय

E-mail Print PDF

Add this to your website

सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय, नाना भालेराव कॉलनी, तळेगाव स्टेशन या ग्रंथालयाची स्थापना सेवाधाम ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने सन 1981 -82 मध्ये केली. त्यास 1983 मध्ये रितसर मान्यता देण्यात आली. तालुका अदर्जा प्राप्त असे हे मावळ तालुक्यातील एकमेव ग्रंथालय आहे.ग्रंथालयाची जागा तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सौजन्याने आहे. ग्रंथालयास पुणे जिल्हा ग्रंथालय संघाकडून आदर्श ग्रंथालय आदर्श ग्रंथालय कार्यकर्ताअसे पुरस्कार मिळालेले आहेत. वाचकांची ज्ञानतृष्णा भागविणारे सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय वाचनालय पंचवीस हजाराहून अधिक ग्रंथसंपदा असलेल्या या ग्रंथालयाचा उपयोग आठशेपेक्षा जास्त सभासद वाचनासाठी करतात. सकाळी 8 ते 10 व सायंकाळी 4ते 8.30 या वेळेत ग्रंथालय उघडे असते.

ऐंशीहून अधिक साप्ताहिके, पाक्ष के, मासिके, त्रैासिके तसेच अठराहून अधिक दैनिक वर्तानपत्रे इथे वाचकांसाठी उपलब्ध असतात. दरवर्षी इथे भरपूर कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडत असतात. त्यासाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध आहे. या व्यासपीठावरून अनेक कलाकार, व्याख्याता, नेते, विद्यार्थी, समाजसेवकांनी आपले कसब पणाला लावले आहे. सदर ग्रंथालयाच्या विकास व उन्नतीसाठी संस्थेचे विश्‍वस्त डॉ. कृ. बा. वाढोकर व संचालक सुरेशराव धोत्रे हे नेहमीच विशेष परिश्रम घेत असतात. सन 2002 मध्ये ग्रंथालय या नवीन इमारतीमध्ये सुरेश धोत्रे यांच्या प्रयत्नांनी सुरू झाले.

त्यावेळी ग्रंथालयात अवघी पाच हजार एवढीच ग्रंथसंपदा होती. परंतु आताचा ग्रंथसंग्रह हा अद्ययावत व खूप वाचनीय असून इथे मराठी, हिंदी, इंग्रजी, बालविभाग, यू.पी.एस.सी (चझडउ) एम.पी.एस.सी. (णझडउ) इत्यादी स्पर्धा परीक्षेंची पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच अभ्यासूंसाठी व्यवस्था आहे. बालविभाग, प्रौढविभाग, पेपरविभाग, संदर्भविभाग स्वतंत्र आहेत. असे हे ग्रंथालय सध्या तळेगाव नगरीच्या शैक्षणिक पोर्शभूीवर केंद्रबिंदू ठरत आहे. असंख्य वाचकांची ज्ञानाची तहान इथे भागविली जाते याचे जतन करणे भविष्यकाळासाठी फार-फार जरुरीचे आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 475

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds