";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- आठवणींची साठवण

आठवणींची साठवण

E-mail Print PDF

Add this to your website

 

लहानपणीचा काळ सुखाचा म्हणतात तेच खरं. लहानाचे मोठे झालो. सगळ्यांचे विवाह झाले, सगळ्यांचे संसार चालू झाले, आज काळ बदलला, शिक्षण संस्कृती सुधारली, मुले-मुली उच्चशिक्षित झाले. शिक्षण व पदवीच्या बळावर चांगल्या नोकर्‍या व भलेोठे पगार मिळू लागले. वर वर का होईना सगळं कसं सुरळीत चालले होते, का कोणास ठाऊक आत्मिक शांतता व समाधानाची कमतरता भासू लागली. अजूनही ते दिवस स्पष्टपणे आठवतात, त्या जुन्या आठवणींनी मन कसे भरून येते. आमच्या लहानपणी एक जुना दगडीवाडा होता. तेथे पाच कुटुंबे राहायची, तशी त्यांची परिस्थिती बेताचीच होती. प्रत्येक घरात कमावणारे एक-एक माणूस होते. पण पगार मात्र त्यांचा अत्यल्प होता. जेते आवश्यक गरजा कशाबशा त्यातून पुर्‍या व्हायच्या.

चैन मात्र त्यांना फारशी माहितीच नव्हती. पण आहे त्यात सर्वजण सुखी आणि समाधानी असायचे. वाडा म्हणजे जणु विेशच त्यांचे. त्यांच्यामध्ये एकता होती. कुठलाही निर्णय घेण्याची एक वेगळी ताकद होती. सुख-दु:खाला सर्वजण सहजच उभे राहायचे. कुणाचेही दु:ख हे आपले दु:ख मानायचे आणि त्यावर एकीने तोडगा काढायची त्यांची पद्धत मात्र भावस्पर्शी होती. त्यांच्यातले हे बळ जगण्याची नवी चेतना जागवायचे. सणसमारंभ खूप उत्साहाने आनंदाने साजरा करायचे, प्रत्येक गोष्टीत उत्साह असा ओसंडून वाहायचा. त्यांच्यात इरीशिरी असायची, कामाच्या चांगल्या गोष्टींची. पण त्यामुळे कामं कशी पटापट व्हायची. प्रत्येक सणाला गंध असायचा प्रेाचा, आपुलकीचा व भावनांचा. घरं छोटी पण मनं विशाल होती.

भाजीच्या वाट्या एकमेकांना देऊन घराघरात जशी एक वेगळी चव भरली होती, मनामनात सुवास दरवळत असायचा आपुलकी आणि प्रेाचा. एकमेकांशिवाय कोणाचेच पान हलत नसायचं. कोणी एखादे दिवशी दिसलं तरी त्याची आपुलकीने चौकशी व्हायची. शेजारच्या आजींकडे गेलं तरी त्या आजी म्हणायच्या, पोरी घोटभर चहा घेऊन जा. खरंच त्यांच्या भावनांचे मुल्य अमूल्य होते. त्यांचं प्रेम कोणताही तराजू मापू शकत नव्हता. तसेच बाकीचेही लोक तत्परतेनं अडीअडचणींना धावून यायचे. रॉकेल संपलं तर काय करायचं, भाजी संपली तर कुठं जायचं, आज मुलाची फी भरण्याची शेवटची तारीख आहे

तर कुणाकडे जायचे असे प्रश्न त्यांना पडत नसायचे. त्यांची गरज सहजरीत्या प्रत्येकजण आपापल्याला जमेल तशी  आपल्या कुवतीनुसार पुरी करण्याचा प्रयत्न करायचा. वाडा म्हणजे जणू एकच कुटुंब. एक-दुसर्‍याला गृहितच धरले जायचे, कुणी आजारी पडले तरी घाबरून न जाता, दुसरे लोक त्याच्या अडचणीला धावायचे, कुठलीही मदत आपल्याला मिळेल याची जणू त्यांना खात्री होती नव्हे तर त्यांचा ठाम विेशास होता. पण आज मात्र तसं चित्र दिसत नाही. आज फ्लॅट संस्कृती आली.

त्या फ्लॅटमध्ये उच्चप्रतीचं फर्निचर आले, पैसा आला, पण त्या फ्लॅटची दारं क्वचितच उघडी असायची. हाय, हॅलो इतकाच सामोपचार. बाकी सगळा व्यवहार. काही अपवाद वगळले तर माणसातल्या भावना कमी झाल्या. व्यक्तींचे मूल्यमापन त्यांच्या महागड्या गाड्या, उच्च ज्वेलरी, उच्च पोशाख व महागडे फर्निचर या कृत्रिम वस्तूंवर व्हायला लागले. हसणे जणू महागच झाले. असाच अनुभव एक फ्लॅटमध्ये आढळून आला. एक विवाहित जोडपं एक फ्लॅटमध्ये रहात होता. नवरा कामावर गेला असता एक घटना घडली. दुपारच्या वेळात त्या बाईने टीव्ही पाहण्यासाठी चालू केला असता, त्या टी.व्ही.चा अचानक स्फोट झाला पण त्यावेळी आजूबाजूचे फ्लॅट बंद होते. बाई त्या स्फोटात निधन पावली. ते कळले कधी तर तिचा नवरा कामावरून घरी आल्यावर तब्बल सहा तासांनी.

पण वेळीच कळल्या कळल्या प्रथमोपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचला असता. तात्पर्य असे की माणसाचे राहणीमान बदलले, ते उच्चप्रतीचे जरी झाले असले तरीही माणसाला माणसाची  गरज आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. पण हे सोयीस्कररीत्या माणूस विसरू लागला आहे. असो, ह्या सगळ्यांवरून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. 

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 464

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds