";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- यावर विेशास ठेवावा की नाही?

यावर विेशास ठेवावा की नाही?

E-mail Print PDF

Add this to your website

 

जादुटोणा, चमत्कार, वशीकरण,अंधविेशास आदी सर्व भ्रामक कल्पना आहेत असे समजून आज कोणी त्यावर विेशास ठेवत नाहीत. परंतु पन्नास-साठ वर्षांपूर्वी या गोष्टीवर अनेकांचा विेशास होता आणि त्याला कारणेही तशीच होती. गावात कोणाला साप, विंचू इत्यादी चावल्यास तेथील मांत्रिक त्याला मंतरलेले पाणी पिण्यास देत किंवा जखमेवर फुंकर मारत. त्यामुळे विषबाधा नाहीशी होऊन ती व्यक्ती बरी होत असे. ही ऐकीव कथा नव्हे तर स्वत: अनुभवलेली एक सत्य घटना आहे. साधारण 1950 ते 1953 च्या दरम्यान मला विंचवाने दोन वेळा दंश केला होता.

मध्य प्रदेशातील त्या वेळच्या सागर जिल्ह्यात हटा नावाचे ते एक तालुक्याचे गाव होते (आहे). त्यावेळेस गावात आतासारखे डॉक्टर नव्हते. दोन-तीन पिढीजात मांत्रिक, एखाद दुसरा वैद्य किंवा हकीम. त्या दिवशी सकाळी मला विंचू चावल्यानंतर एका मांत्रिकाच्या घरी नेण्यात आले. मांत्रिकाने एका ग्लासात पाणी आणून त्यावर सात वेळा फुंकर मारली आणि नंतर मला ते पिण्यास दिले. काही वेळ तेथेच थांबवून मग घरी जाण्यास सांगितले.

बोटाला चावलेल्या विंचवाचे विष जे त्या दरम्यान माझ्या खांद्यापर्यंत चढले होते ते हळूहळू खाली उतरत असल्याची जाणीव मला झाली व होणार्‍या त्या भयंकर वेदना पण कमी झाल्या. आता चोवीस तासपर्यंत चावलेल्या जागी जखम झाल्यामुळे तेथे थोडी थोडी आग होत राहील. मात्र घाबरू नकोस. सर्व ठीक होईल.असे घरी जाताना मला त्या मांत्रिकाने मोठ्या प्रेाने सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळी मला त्याचा प्रत्यय आला. मी पूर्णत: बरा झालो होतो. जखमही दिसत नव्हती. त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी पुन्हा एकदा विंचवाने माझ्या पायावर डंख मारला. तेव्हादेखील मांत्रिकानेच त्यावर

उपचार केले. मात्र या सेवेबद्दल त्या मांत्रिकाने माझ्याकडून एक पैसाही घेतला नाही हे नमूद करण्यासारखे आहे. पैसे घेतल्याने ती विद्या लोप पावते अथवा नष्ट होते अशी त्यांना त्यांच्या गुरूंची शिकवणूक होती आणि ते सत्यही होते. वास्तविक कुठल्याही शास्त्रावर अथवा विद्येवर विेशास असणे हे महत्त्वाचे. मग ते आधुनिक असो किंवा पुरातन. उदाहरण द्यायचे झाल्यास बर्‍याच वेळा आपण क्षुल्लक आजारासाठी घरच्या घरी माहीत असलेली औषधे घेऊन रोग बरा करू शकतो पण मनात कुठेतरी शंका असते की या औषधाने आपल्याला बरे वाटेल का?

पण याच कारणास्तव आपण जेव्हा एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि तो विचारपूस करून जेव्हा आपणास नेके औषध घेण्यास सांगतो तेव्हा मात्र आपण अगदी निर्धास्त होतो. याला कारण म्हणजे आपला डॉक्टरवर असलेला विेशास किंवा श्रद्धा. मात्र अनेकदा असेही घडते की त्यांनी दिलेल्या औषधाचा फायदा रोग्याला होईलच असे नाही. याचा अर्थ वैद्यकीय शास्त्र चुकीचे आहे असा तर होत नाही. त्याचप्रमाणे मंत्रतंत्र किंवा जादुटोणा इत्यादी विद्येवर त्यावेळेस लोकांचा विेशास किंबहुना श्रद्धा होती आणि त्यामुळे त्यांना बरेही वाटत असे. मात्र जेव्हा स्वार्थासाठी या विद्येचा उपयोग नरबळी किंवा तशाच प्रकारच्या अन्य अघोरी कृत्यांसाठी होत गेल्याने ती श्रद्धा राहिली नाही

तर अंधश्रद्धा झाली आणि तो एक अक्षम्य गुन्हासुद्धा. पत्रलेखनाचे मुख्य कारण म्हणजे गेल्याच वर्षी असाच एक चमत्कारी प्रसंग घडून गेला. आमच्या शेजारी नाईक आडनावाचे एक वयोवृद्ध गृहस्थ गेल्या पंधरा-सोळा वर्षांपासून राहतात. वय वर्षे ) अवघे त्र्याण्णव असून ते अविवाहित आहेत. घरात एकटेच असल्यामुळे स्वयंपाक करण्यापासून सर्व काही स्वत:चे स्वत: करून घेतात. सर्दी, खोकल्यासारखी क्षुल्लक दुखणी सोडल्यास बाकी प्रकृती अगदी ठणठणीत. डोळ्यांवर अजूनही चष्मा नाही. पुण्याला त्यांची पुतणी (भावाची मुलगी) असते. अधून मधून दोन-तीन दिवसांसाठी ते तेथे जात असतात.

गेल्या वर्षी असेच ते एकदा पुण्याला तिच्याकडे गेले असताना एके संध्याकाळी त्यांना अचानक आपल्या दोन्ही पायातील शक्ती कमी कमी होत असल्याची जाणीव झाली. पाय लटपटू लागले. धड उभे राहता येईना म्हणून ते जवळच्या सोफ्यावर बसले. थोड्या वेळाने त्यांनी आपल्या पायाची हालचाल करून पाहिली परंतु तेथे कसलीच संवेदना जाणवेना. तेव्हा भीतीने त्यांना घाम सुटला. घरातील लोकांना जेव्हा हे कळले तेव्हा

त्यांनी लागलीच डॉक्टरांना पाचारण केले. प्राथमिक तपासणीत डॉक्टर काही निदान करू शकले नाहीत. मात्र त्यांना ताबडतोब इस्पितळात नेऊन न्युरो स्पेशालिस्टला दाखवाअसा सल्ला दिला. इस्पितळात अ‍ॅडमिट केल्यानंतर त्यांच्या रक्तापासून सीटी स्कॅन, एम.आर.आय. इत्यादी सर्व शारीरिक तपासण्या केल्या गेल्या. शेवटी मेंदूला होणारा रक्तपुरवठा हा कमी होत असल्याने त्याचा प्रभाव त्यांच्या पायाच्या नसेवर झाल्याचे निष्पन्न झाले. वयाचा विचार करता ऑपरेशन वगैरे शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्यांना काही औषधे घेण्यास सांगितली.

मात्र औषधांचा प्रभाव कितपत होईल हे आत्ताच सांगणे कठीण असल्याने त्यांनी तोवर व्हीलचेअरचा वापर करावा असे सुचविले. त्यानंतर पाच ते सहा महिने ते सतत व्हीलचेअरवर बसूनच आपले दैनंदिन कार्यक्रम करीत राहिले. पायातील गेलेली शक्ती पुन्हा येण्याची आशा दुरावली होती. त्यामुळे त्यांनी औषधे घेणेही बंद केले. इतकी वर्षे स्वतंत्रपणे जीवन जगणार्‍या नाईकांना आता परावलंबी जीवन नकोसे झाले होते. देवाने एकतर माझे पाय पूर्ववत करावेत किंवा मरण तरी द्यावेअशी देवाजवळ ते रोज प्रार्थना करू लागले. असेच आणखी एक-दोन महिने गेले आणि एके दिवशी तो चमत्कार घडला.

दुपारचे जेवण आटपून नाईक सोफ्यावर टीव्ही बघत बसल  होते. बाजूला त्यांचा पाच-सहा वर्षांचा पणतू (पुतणीचा नातू) त्याच सोफ्यावर चढून खेळत होता. खेळात खेळता त्याचा हात चुकून वर फळीवर ठेवलेल्या लहानशा रेडिओला लागला आणि तो नेका नाईकांच्या डोक्यावर पडला. डोक्यावर केस नसल्याने रेडिओचा टोकदार भाग त्याठिकाणी पडून मोठी जखम झाली आणि त्यातून भळाभळा रक्त वाहू लागले. रक्त थांबविण्यासाठी त्यांनी प्रथम जखमेवर हाताने दाबून धरले परंतु ते थांबत नाही हे लक्षात आल्यावर ते खूप घाबरले आणि चटकन आपल्या जागेवरून उठून समोर काही अंतरावर ठेवलेल्या टीपॉयवरील टेबलक्लॉथ उचलला आणि झालेल्या जखमेवर घट्ट दाबून धरून पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसले. हे काही क्षणात आणि अचानक घडले की त्यांना आपल्या पायात जोर नाही आणि आपण उठूही शकत नाही

हे लक्षातच राहिले नाही. काही वेळाने घरच्या लोकांनी जखमेवर हळद वगैरे लावल्याने रक्तप्रवाह थांबला आणि त्यांना बरे वाटले. आनंदाची बाब म्हणजे या चमत्कारिक घटनेनंतर ते आता आपल्या पायाने पूर्ववत चालू-फिरू लागले आहेत. याला चमत्कार म्हणावा की अजून काही हेच कळत नाही. संबंधित डॉक्टरांना याबाबतीत विचारले असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. बहुधा पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जगात काही अज्ञात शक्ती आहे यावर विचार करण्यास त्यांना सवड नसावी. एक सामान्य माणूस म्हणून आपण याला दैवी चमत्कारच म्हणणार. परंतु वैद्यकीय शास्त्रात याला काही उत्तर असेल तर ते कोण्या विद्वानाने शोधून पाहावे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 431

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds