";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......

आज कर..

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

आज कर..

 

.(स्थळ : सानेगुरुजी हायस्कूल. बगिच्यात काही मुलांचा घोळका बसलेला आहे. ही मुलं काहीशी गोंधळलेली आणि दडपणाखाली आहेत. विंगेतून सूत्रधारामागोाग नटी रंगमंचावर येते.

सूत्रधार : (रंगमंचावर एक शोधक फेरी मारत नांदी करतो) चंद्रासम धवल विलसे, जी शुभ्रवस्त्र शोभित असे । वीणेने कर शोभति जिचे, जी धवलपद्मावरी वसे ॥ 1 ब्रह्माविष्णुशिवादि देवही, सदा तिजला भावे वंदती । सदा राखो मला सरस्वती, तथा तुम्हा अज्ञान नाशुनी ॥2 मालिनी, बघ तर ती समोर दिसणारी मुले वर्गाबाहेर का? (मालिनी मुलांच्या घोळक्याजवळ जाते. विचारपूस करून सूत्रधाराजवळ येऊन म्हणते,) मालिनी : महाराज, ती मुलं दहाव्या इयत्तेतील आहेत. दहावीचा अभ्यास, पालकांच्या अपेक्षा, भविष्याची चिंता यामुळे ती दडपणाखाली आहेत. सूत्रधार : काय? दडपणाखाली? चल, विंगेत लपून त्यांचे काय चालले ते बघू, शेवटी त्यांचे टेन्शन दूर करणारच आहोत!

(सूत्रधार आणि मालिनी विंगेत शिरतात.) शेखर : (प्रवेश करतो. मुले उठून उभी राहतात). चला, गप्पा मारूया! काल आमच्या घरी बाबांचे मित्र आले होते. मी काय करावे, यावर खूप गप्पा झाल्या. मुलांनी काय करावे त्यावरही चर्चा झाली. ती चर्चा मी तुच्यापर्यंत पोहचवतो आहे. रामचंद्र : शेखर, विचारांनी डोके फुटायला आले. पुन: तू काय ऐकवणार? विनय : अरे, खेळू दे ना पोरांना! पागल कुठला. शेखर : मित्रांनो, दहावीचे वर्ष म्हणजे भविष्य चा पाया. पाया भक्कम तर इमारत भक्कम भविष्यात काय बनायचे तेआताच ठरवायचे असते. विनय : अहो विद्वान, पायाचे वर्ष दहावी नाही, बारावी! बारावीनंतर प्रवेश मिळत असतो.

मीना : अरे, बोलू द्या रे त्याला, ऐकायला काय पैसे मोजावे लागतात? शेखर : हं, मला म्हणायचे होते, आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, ‘तेआजच ठरवायला पाहिजे! माधव : अरे, शेखर, ते बारावीच्या निकालानंतर ठरत असते. एवढं साधं कळत नाही तुला? नरेंद्र : इथंच चुकताहात तुम्ही! बाबांनो कल करे सो आज कर म्हणतात. भविष्यात काय करायचे त्याचा विचार आजच केला पाहिजे. बोल, तू बोल शेखर! शेखर : तेच म्हणायचे मला. दामोदरा, पुढे तुला काय व्हायचे आहे?

दामोदर : मला कारागिरीत इंट्रेस्ट आहे. मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचे आहे. पण आई-बाबा म्हणतात, तू डॉक्टर हो! दुसरे काहीही आम्हास चालणार नाही. असला हेका सोडायला तयार नाहीत. जीवांची चिरफाड करण्यात मला रस नाही. कल्पना : समजव तुझ्या आई-बाबांना. हे आई-बाबा त्यांच्या पूर्ण न झालेल्या इच्छा, मुलांकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. हे अत्यंत चुकीचे आहे! इंदिरा : बरोबर म्हणालीस तू. मुलांना ज्यात रस आहे, ‘तेपालकांनी आपल्या पाल्यांना करू दिले पाहिजे. अनाठायी हट्ट काय कामाचा?

शेखर : तुम्ही दोघीही बरोबर बोललात. दामोदर, समजव त्यांना. इतके करून ऐकत नसतील तर त्यांना परांजपे सरांकडे ने. ते घेतील त्यांची शाळा! भाग्यश्री : तसेच कर. मला हॉटेल मॅनेजमेंट करायचे आहे म्हणताच बाबा ओरडले, कदापी नाही, तुला कॉर्स करायचे आहे. माझी मुलगी कुठल्याशा बँकेत प्रबंधक, महाप्रबंधक झालेली मला बघायचे आहे! दामोदर : हॉटेल मॅनेजमेंटच करणार म्हणून ठणकावून सांग त्यांना! भाग्यश्री : दामू, मला पूर्ण बोलू देशील काय? दामू म्हणतोय तसे आई-बाबांना ठणकावून सांगितले.

काही दिवस कुरकुर केली. शेवटी बसले गप्प. वंदना : आई-बाबांबद्दल आदर असावाच, पण त्यांनी आपल्या इच्छा मुलांवर थोपू नयेत, हे मात्र खरे! राजेंद्र : भाग्यश्री, पण त्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व हवे ना? उत्तम प्रकारे इंग्रजी बोलता आले पाहिजे, समजले? शेखर : ते काही कठीण नाही. तिने इंग्रजीचे वाचन करावे. इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करावा. सवयीने तीही सफाईदार इंग्रजी बोलू शकेल. माझी मातृभाषा कानडी, पण मी बोलतोयच ना मराठी! दामोदर : माझे मामा म्हणाले, ‘फायर इंजिनियरिंगसुद्धा चांगले फिल्ड आहे, ते कर!फायर इंजिनिअरिंग म्हणजे आग विझवण्याचे तंत्रज्ञान. शेखर : तुला आवडेल ते कर! तू वाचन करणारा आहेस. म्हणून मला वाटते तू पुरातत्व खात्यांचा अभ्यास करावा. त्यात पैसा आणि प्रतिष्ठा मिळते. शिवाय सरकारच्या पैशाने जगभर फिरायला मिळते.

सुधाकर : अरे, हे सारे सोडा! पिढीजात मावळे आम्ही. मग आम्ही सैनिकी विद्यालयात प्रवेश घ्यावा. शिवरायाच्या देशाचे संरक्षण आमच्याशिवाय कोण करणार? देशाचे संरक्षण करणे, हा आमचा मावळ्यांचा धर्म. जय भवानी, जय शिवाजी! मिलिंद : मावळ्यांची मुले तर आहोतच, त्याचबरोबर शेतकर्‍यांची! मला वाटते, शेतीशास्त्र शिकावे, झाडे, जंगले आपल्या परिचयाची. आपल्याला वनविद्यासुद्धा शिकायला हरकत नाही. वनविद्या शिकून आपण वनांची वृद्धी तथा रक्षण करूया भारतातून दुष्काळाला हद्दपार करूया! पटते का तुम्हाला? विकास : अरे चाललंय काय तुचं? तुम्ही इंजिनिअर, डॉक्टर होतायेत. आम्ही तुच्या सारखे हुशार नाहीत. आमचा विचार कोण करणार? जाम टेन्शन आलं आहे, दहावीचं आणि परिस्थितीचं! शेखर : आम्ही हुशार, तुम्ही मठ्ठ असा भेदभाव करू नका रे!

आणि कोणीही टेन्शन घेऊ नका. परीक्षेचा ध्यास घ्या. नियमित अभ्यास करा. नक्कीच घवघवीत यश मिळवाल! विकास : मित्रा, खूप अभ्यास करतो, पण पंचाहत्तर अठ्ठ्याहत्तरच्यावर मार्क मिळत नाहीत. आजच्या स्पर्धेच्या युगात कसली अ‍ॅडमिशन मिळणार बाबा. या विचाराने पोटात भीतीचा गोळा उठतो. शेखर : इतकं हताश होण्याची गरज नाही. कमी मार्क मिळाले म्हणून सगळी दारं बंद झालीत, असे नव्हे! जगात हजारो विषय आहेत. एक विषय निवडून तयारीला लागा. टेन्शनचं काय घेऊन बसलात? निलेश : शेखर, माझ्यासारख्या सामान्यातल्या सामान्यास काय करता येऊ शकते? शेखर : छान! छान प्रश्न केलास. तर मग ऐक, तुम्ही टर्नर, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन असल्या तंत्रविद्येला प्रवेश मिळवू शकता व भाकरीचा प्रश्न सुटू शकतो. गोंधळून जाण्याचे कारण नाही.

नरेंद्र : खरेच! दहावीचा धसक घेऊ नका. प्रयत्न मात्र सोडू नका, प्रयत्नांती परमेेशर. तो दयाळू आहे. सर्वांची व्यवस्था लावतो. एक उदाहरण सांगु? शंभर वर्षांपूर्वी अमेरिकेत एक हेन्री फोर्डनावाचा मनुष्य जन्मला. अनेकदा मॅट्रिकची परीक्षा देऊनही अखेर तो पास झाला नाही, त्याने प्रयत्न केले, चार चाकी मोटर बनवली. तिला फोर्ड असे नाव दिले. पुढे फोर्ड कंपनी स्थापन केली. जगातला एक श्रीमंत म्हणून तो जगला.

वंदना : आणि संस्कृत साहित्यातला तो पाणिनीप्रत्येक वर्गात अनेकदा नापाहोत असे. शेवटी त्याने शंकराचे तप केले. शंकर प्रसन्न झाल्यावर त्याने विद्या मागून घेतली. सगळ्यांच्यासाठी संस्कृत व्याकरणलिहिले. आज पाणिनीच्या व्याकरणावर जग चालते आहे. शेखर : व्हेरी गुड, चांगले दाखले दिले तुम्ही. तप म्हणजे काय? घेतलेला ध्यास सफल होत नाही तोवर प्रयत्न करणे! झटका मरगळ आता!

नरेंद्र : मग आता त्या हेन्रीआणि पाणिनीसारखे प्रयत्न करू. माझ्याकडे एक युक्ती आहे, आपण सारे दररोज काही वेळ एकत्र जमू या. तुचे प्रॉब्लेम्स सर्वांसमोर मांडा. आपण चर्चा करून ते सोडवू. त्यायोगे सर्वांना सर्वांची मदत होईल आणि सर्वांचा अभ्यास होईल, पण त्यासाठी सर्वांनी नित्यवाचन करण्याची गरज आहे, समजले! शेखर : नरेंद्र, तुला मी आडमुठा समजत होतो. मला क्षमा कर! छानच उपाय सुचवलास. तर मग ठरले? नरेंद्र ने सांगितल्याप्रमाणे करायचे ना? सर्व मुले : होय! होय! नरेंद्र : होय ना, मग कल करे सो आ कर ।लागा अभ्यासाला! (शाळेची घंटा वाजते. तशी सारी मुले राष्ट्रगीतासाठी पळतात.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 238

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds