";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- बँकांचे घोटाळे अर्थात खातेदारांचे मरण!

बँकांचे घोटाळे अर्थात खातेदारांचे मरण!

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

आपल्या देशातल्या सर्वच प्रकारच्या, सर्वच स्तरावरच्या बँका म्हणजे

विलक्षण घोटाळ्यांचे अड्डे आहेत. विेशासाने पैसे ठेवून त्यावरील व्याज घेणे आणि जीवनमान उंचावणे, अडीअडचणीला त्या पैशांचा उपयोग व्हावा हा खरा हेतू. पण या तत्त्वाला पूर्णपणे मूठमाती देऊन बँका म्हणजे पैसे खाण्याचे कुरणच बनले आहे. असंख्य प्रमाणात असलेल्या खातेदारांना देशोधडीला लावणे, त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणे, याचा त्रास त्यांच्या कुटुंबीयांनीही भोगणे. सरकारने काणाडोळा करून, आपण त्या गावचेच नाही असे समजून कोणताही तोडगा न काढणे आणि थातूरमातूर ओशासनांवर जनतेला झुलत ठेवणे

या जाळ्यात त्या अडकल्या आहेत. एकदम एखादा दिवस असा येतो की, बँकांचे व्यवहार ठप्प होतात. तिथल्या कर्मचार्‍यांनाही याची कल्पना नसते. पैसे काढण्यासाठी गेलेल्या खातेदारांना बाहेर हाकलले जाते आणि आजपासून बँक बंद असा बोर्ड लिहिला जातो. हे असे घडण्याचे कारण, बँकाच्या झालेल्या ऑडिट रिपोर्टस्चा (अंतर्गत ऑडिट,

नंतर सी.ए. मार्फत किंवा सरकारचे ऑडिट) गांभीर्याने विचार न करता, ते दडवून ठेवणे. बँकेच्या संस्थापक बॉडीला काय वाटेल? ही भीती. त्यामुळे त्यांचे हितसंबंध जपणे हे काम केले जाते. तसे नसेल तर ऑडिटर्सच्या शेर्‍यांची (रिमार्कस्) अंलबजावणी करण्यात केलेली चालढकल, चुकीची दिलेली कर्जे आणि त्यांची न झालेली वसुली हेच तर खरे मूळ कारण आहे. हे साठत, सा त जाते आणि स्फोट होतो. या स्फोटात मरतो तो सामान्य नागरिक. अहो काही सहकारी बँका आता डुबणार आहेत, हे संचालक मंडळींच्या लक्षात  ल्यावर त्यांनी पटापट एक-दोन दिवसा  रकमा काढून तिजोरीत खडखडाट केलेला आहे. हे पापकृत्य सर्वत्र झालेले   आहे. आता यामध्ये ऑडिटर्सच सामील असेल तर प्रश्नच मिटला. ते जनतेचे खरे गळा घोटणारे नराधम आहेत. व्यवस्थापनाला मुद्दाम अंधारात

ठेवून आपली स्वत:ची पोळी भाजून घेऊन, त्यांना अजीर्ण झाल्याचे दिसते. सहकार तत्त्व एकमेकांच्या मदतीने पायाखाली तुडवले आहे ते या तत्त्वांचा अवलंब केलेल्यांनीच. मला वाटते पूर्वीची सावकारी पद्धत इतकी त्रासदायक नक्कीच नसेल. लोकांनी आता पैसे घरी ठेवावेत हे बरे! सुरक्षित राहतील किंवा चोरीला गेले, तर स्वत:लाच जबाबदार धरता येईल. पण बँकांच्या भरवशावर रहायला नको. तात्पर्य सरकारने, व्यवस्थापनाने जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे बंद करावे. यालाच जोडून काहीजण सुनावतात की, खातेदारांनी जागृत असावे, सावध राहावे; म्हणजे खातेदारांनी प्रत्येक वेळी बँकेच्या मॅनेजरला विचारायचे काय?

की बँकेची परिस्थिती कशी आहे? ऑडिट रिपोर्ट दाखवता का? किंवा बँकेच्या डुबण्याची तारीख अंदाजे केव्हा डिक्लेअर होईल? वगैरे वगैरे! काहीही म्हणा, स्वत:ची कोणतीही चूक नसताना; आपलेच पैसे बँकेतून काढता येत नाहीत म्हटल्यावर, खातेदाराचे जगणे आणि सरकारचे वा संबंधित व्यवस्थेचे असणे, हराम आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 112

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds