";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- चिमणीची मनोव्यथा

चिमणीची मनोव्यथा

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

बाई गं, काय हा चिवचिवाट. कुठेही शांतपणे बसू देत नाही. सारखी चिवचिव करत मला बोलवत असतात. एक कटकट आहे का? त्यात ह्या मैनांचा कर्कश आवाज, नको बाई, जीवाला शांतता अशी नाही. नवरा फिरत असतो, इतर चिमण्यांच्या बरोबर. पण माझी अंडी द्यायची वेळ झाली ना की येतो हो मदतीला. त्याचीपण घर शोधायला धडपड सुरू होते.

छे आजकाल चांगले घर मिळते आहे कुठे? सगळ्यांना आजकाल टापटिप आवडते ना. कितीही खबरदारी घेतली ना, तरी त्या मेल्या कावळ्याची काकदृष्टी आमच्यावर असतेच. परवाचीच गोष्ट घ्या ना. आम्ही दोघांनी मेहनत करून किती सुंदर आपले घरकुल घरटे बनवले. केवढे मोठ्ठे घरटे बनवले. पिल्लांना टोचायला नको, म्हणून कुठून-कुठून मऊ-मऊ कापूस आणला होता. आपलं छान छान चौकोनी कुटुंब होते. तुम्हाला मोठे झालेले पाहून आम्हा दोघांना केवढा आनंद झाला होता. तुम्हाला सांभाळायची आम्ही दोघंही खबरदारी घेत होतो. रात्रीच्या वेळेला कोणी उद्धवस्त केले आपले घर कुणास ठाऊक? चिक्कार मोठा आवाज झाला,

काकूपण दिवा लावून पाहून गेल्या. पण सकाळी पाहतो तो काय, तुम्ही दोघंही खाली पडला होतात व जोराजोराने ओरडत होतात. कुण्या मेल्याची दृष्ट लागली कुणास ठाऊक. काकूंनी तुम्हाला त्रास न होऊ देता पुन्हा अलगदप्णे घरटे वर ठेवले. पण ह्या सर्व खटाटोपात छोट्या खाली लाकडात पडलाच. बाई ग, किती तुम्हा लोकांची काळजी घ्यावी लागते. तुम्हाला पिल्लं झाल्याशिवाय नाही कळणार. काकूंकडे माझी, दोन्ही मावशांची किती बाळंतपणं झाली माहीत नाही. आमचा सुनंदा मोडक कातवी रोड, तळेगाव दाभाडे (स्टेशन) चिमणीची मनोव्यथा आवाज ऐकला की, काकू पोळीचा कुस्करा करून नाहीतर काहीतरी खायला व स्वच्छ पाणी ठेवायच्या.

पण मध्यंतरी काकू कुठेतरी गावाला गेल्या व आम्हाला दाण्याकरता वणवण फिरावे लागले. नंतर त्या आळ्यावर रोज रोज खिचडी. (काकांना बरे नव्हते ना) बाई ग – रोज रोज खिचडी खाऊन कंटाळा आला. आम्ही दोघांनी मग ठरवले, घर बदलायचे, मग आम्ही वरच्या मजल्यावर घर केले. मी वरून पहात होते, काकू आमची वाट पाहात आहेत. पण आता पुन्हा घर बदलायचे म्हणजे, अहो, असे सारखेसारखे घर बदलून कसे होईल? आता पावसाळा म्हणजे घर मिळायची पंचाईत. आता तू मोठा झालास बाळा, तू तुझे खाणे आपणहून शोधायला हवे. पिल्लू पुन्हा हट्ट करून सांगते, नाही, तू भरव व तोंडाचा आऽऽ करून चिमणीच्या मागे-मागे ओरडत फिरत असते.

चिमणी पण प्रेाने त्याच्या तोंडात दाणा टाकते. उगी उगी बाळा रडू नकोस, बघ काकूपण तुला हसताहेत एवढा मोठ्ठा काकूंचा टेरेस आहे, खेळ की जरा तिथे. नको माझ्या मागे-मागे फिरू. रोज रोज नॉनव्हेज बरे नसते. पहाते कुठे नॉनव्हेज, कीडा, मूंगी, आळी मिळते आहे का? नको हट्ट करू.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 141

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds