";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कांदा जीवनावश्यक नाही?

कांदा जीवनावश्यक नाही?

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

कांदा जीवनावश्यक नाही?

 

अतिशय महत्त्वाचा विषय आहे.सर्वच जण बोलतात पण त्याव खरा उपाय करायला राजकारणी भितात. जैन गुजराथी णि बरेच लोक कांदा खात नाहीत, तरीही त्यांना काहीही त्रास होत नाही म्हणून त्यांचे त्यावाचून अडत नाही. याचाच अर्थ कांदा जीवनावश्यक नाही.

बस्स एवढेच जाहीर करा. कांदा जीवनावश्यक नाही म्हणून त्याची निर्यात कोणत्याही सरकारला कोणत्याही परिस्थितीत बंदकरता येणार नाही. जेवढा कांदा निर्यात होईल, तेवढे त्याचे उत्पादन वाढेल. जेवढे उत्पादन वाढेल तेवढी त्याच्या गुणवत्तेत सुधारणा होईल तेवढे त्याच्यावर संशोधन व साठवणूक करण्यासाठी काळजी घेतली जाईल. निर्यात केल्यानंतरच वाढीव उत्पादित कांद्याला नवीन बाजारपेठ मिळेल. भारतीय शहरी लोक लबाड व स्वार्थी आहेत. त्यांच्या जिभेचे चोचले फक्त कांद्याच्या बाबतीत. फक्त पंधरावीस रूपये किलोनेच घ्यावेत अशी मनोवृत्ती झालेली आहे. ते शेकडो रुपये आइस्क्रीम, पिझ्झा, बर्गर, पाव- भाजी, बटर, चिज खाण्यात खर्च करतील. मनोरंजनावर हजारो रुपये खर्च करतील.

पण कांद्याचा भाव थोडा जरी वाढला तरी बोंबाबोंब करतात. मतदानाचे भिकारी राजकारणी लगेचच निर्यात बंदी घालतात व परदेशातून कांदा आयात करतात. यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या कांदा व्यापार्‍यांना शाश्‍वत व्यापारी म्हटले जात नाही. शहरवासीयांनो प्रथम कांदा कसा उत्पादित केला जातो. ते समजून घ्या. कांदा तीन वेळा मातीत गाडावा लागतो व त्यासाठी तीन वेळा शेतीची मशागत करावी लागते. दोन वर्षे त्या कांद्याच्या पिकासाठी शेतकर्‍यांना उन्हातान्हात राबावे लागते व बदलते हवामान व रोगराईपासून त्या पिकाचे संरक्षण करावे लागते. रात्रंदिवस मेहनत खतपाणी करून जोपासना करून तो बाजारात आणावा लागतो. त्यासाठी त्याच्या कष्टासहीत उत्पादन खर्च काढला तर तो सरासरी वीस रुपये प्रती किलो पडतो. म्हणजेच जेव्हा वीस रुपयांपेक्षा

कमी भाव त्याला घाऊक बाजारात मिळतो, तेव्हा त्याच्या श्रमाची किंमत तुम्ही त्याला देत नाही. म्हणजेच शेतकर्‍यांनी केलेल्या कष्टाची किंमत देण्याची तुची मनोवृत्ती नाही. मुळात तुची मनोवृत्तीच फक्त शेतकर्‍यांच्या बाबतीत विकृत असल्यानेच तुम्ही फक्त आणि फक्त कांद्याचेच भाव वाहले की ओरडायला लागता. शेतकर्‍यांचे कैवारी, शेतकर्‍यांचेच आमदार-खासदार म्हणवून घेणारेदेखील वर्षानुवर्षे त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. म्हणजे माझी शेतकर्‍यांना, त्यांच्या पुढार्‍यांना, राज्यकारभार पाहणार्‍यांना, शहरवासियांना एकच विनम्र विनंती - कांदा अनियंत्रित निर्यात धोरण राबवा.आपोआपच कांदा उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांना योग्य भाव मिळेल. जेवढी निर्यात वाढेल तेवढे उत्पादन व दर्जा वाढेल. शेतकरी जास्त कष्ट करून डोंगरावर कांदा लावून मागणी पूर्ण करतील. शेती परवडत नाही म्हणून गाव सोडून शहरातील झोपड्यांत राहून पडेल ते काम करणारा शेतकरी गावाला जाऊन शेती करील. शहरातील झोपडपट्ट्या काही प्रमाणात कमी होतील. फक्त अनियंत्रित कांदा निर्यात धोरण राबवा.’ ‘जय जवान जय किसान जय उद्योजक!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 89

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds