";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- प्रेम आणि विश्वास

प्रेम आणि विश्वास

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टी आजच्या जगात फारच घातक ठरत आहेत. माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटना आजूबाजूला घडत असताना हाच विचार खरच मनात आला की प्रे कसं करावं आणि विेशास कोणावर ठेवावा. हा मोठा जीवनाचा खडतर प्रवास झाला आहे. समोर कोण आहे याचा विचार न होता बुभुक्षित वखवखले आहेत याचा विचार आता महिलांनीच केला पाहिजे.

खरं पाहायला गेलं तर जुन्या पद्धती जाचक वाटत होत्या. पण काही अंशी त्या बरोबर होत्या असे वाटायला लागले आहे. पण दुसरी बाजू पाहिली तर पूर्वी स्त्रिया बाणेदार, शूर व हिकमती होत्या. आता सर्व क्षेत्रात स्त्रिया भरारी घेतच आहेत, पण धनदांडग्या धनपूत्रांची मानसिकता बदलायला हवी. हा एक विशिष्ट समाज तयार होत आहे. जो समाजाला घातक ठरत आहे. कुणाला कुणाची भिती, धाक, जरब आणि आदर उरलेला नाही. चंगळवाद असावा पण किती? आजकालच्या मुलीही थोड्या बिनधास्त व बेदरकारपणाने वागतात की काय असे वाटते. एकट्या मुलीने कुणाबरोबर जाताना सर्व शक्यता मनातल्या मनात पडताळून पाहिल्या, थोडा विरुद्ध विचा  केला तर संभाव्य धोका टाळता येईल.

प्रेकरतानासुद्धा जरा अविचारच करतात मुली, खरंतर नको त्या वयात फसता  त्यामुळे. नको त्या माणसांवर विेशास ठेवतात आणि आयुष्य उद्ध्वस्त करतात स्वत:चे आणि कुटुंबाचे नंतर पालकांपुढे त्यांच्या आयुष्याच्या तरतूदीचे मोठे आव्हान उभे ठाकते. पण प्रेाने वाढवणार्‍या आई-वडिलांवर विेशास ठेवणे जणू मुलींना अपमानकारक वाटते जणू. त्यातच शिक्षण आणि भल्या मोठ्या पदाच्या व पगाराच्या नोकर्‍या या निमित्ताने बाहेर राहाणार्‍या मुली जणू मुक्तछंद प्रे आणि विेशास मिळाल्यासारखे बेजबाबदारपणाने व एका वेगळ्यात ताठ्यात वागत असतात. रात्री- बेरात्री कुणाबरोबर बाहेर जाणे. कार्यक्रमाला उपस्थित राहाणे, परंतु जाताना रस्त्याने कोण कसे भेटेल याचे काही नक्की नसते.

मग अशा वेळेला काही अतिप्रसंग घडेल याचे भान मुलींनी ठेवायला हवे. नरभक्षक प्राण्याप्रमाणे हे शीलभ्रष्ट पशु अशा सावजाची वाटच बघत असतात जणू! मुली, स्त्रिया अलगद त्यांच्या हातात सापडतात आणि शिकार होतात. समाजातील काही लोक आव ज उठवतात, काही दुषण देतात काही लक्ष न देता शांत बसण्याची भूमिका घेतात. प  हा वणवा मला किंवा माझ्या कुटुंबातील कुणाला कधी गिळंकृत करील हे काही सांगता येत नाही. पोलीस खात्यात भरती झालेल्या कित्येक स्त्रियांनी आत्महत्या केल्या तर काही प्रचंड ताण-तणावात राहात आहेत. त्यांना ना समाज स्वास्थ्य ना मानसिक स्वास्थ्य ना कुटुंबात स्थिरता! समाजात स्त्रियांची संख्या कमी असा अक्षेप घेतला जातो, पण त्यांच्या सुरक्षेची काहीही हमी नाही.

सरकारी योजना व यंत्रणा योग्य रीतीने राबवल्या जातीलच असे नाही. यंत्रण व नियम योग्य असले तरी राबवणार्‍याचे हात स्वच्छ असतीलच असे नाही. योग्य न्याय मिळवण्याचा विेशास राहिलेला नाही. कुणाशी थोडे प्रेाने आपुलकीने वागावे बोलावे तर तीच माणसे घात करतात. असे लहान मुलींच्या बाबतीत घडले तर समजण्याआधीच आयुष्य जळून गेलेले असते. मुली जिवानिशी जातात व जगल्या तर त्यापेक्षा भयंकर मरणं रोज मरावी लागतात.

कुणी प्रेाने स्वीकार करील हा विेशास उरत नाही व अगदी लाजिरवाणे जिणे बाईच्या पदरात पडते. कुटुंबातही आणि समाजातले तिचे स्थान ढळते व आश्रित म्हणून तिला जन्मभर जगावे लागते. सहानुभूती फक्त दाखविण्यापूरती असते. प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा कुणी मदतीला येत नाही. एकूण काय सगळ्याचाच अतिरेक होत आहे. मोबाइलचा गैरवापर, शिक्षणाच्या माध्यमातून शहाणपणाचा अतिरेक, प्रसिद्धिच्या हव्यासापायी माध्यमांचा अतिरेक, सत्तेच्या हव्यासापोटी

विेशासघात,  गेफटके, गैरविेशास यांचा तर अतिरेकच चालला आहे. मिळण्यापेक्षा घालवणे, गैरवापर करणे इकडे कल वाढत चालला आहे. क्षणिक सुखाच्या मागे जग धावत आहे व शाश्‍वताची व प्रेाची अनुभूती यास कधी मूठमाती दिली जात आहे याची जाणीव कुणाला राहिलेली नाही. धर्माला ग्लानी येत चालली आहे. तरुण पिढीच्या रूपाने अधर्माचे उच्चाटन व धर्माचे अभ्युत्थान व्हावे ही त्या जगदिशाकडे कळवळीची व मनापासून प्रार्थना. कारण प्रार्थनेत खूप सकारात्मक शक्ती असते आणि जी शक्ती अशा नराधमांपासून संरक्षण करो! असे म्हणायची वेळ आली आहे. स्त्री जन्मी ही तुझी कहाणी टाक बदलूनी कथानक तुझाच आता धाक वाटू दे वात्सल्यातून येऊ दे ज्वाला भयानक पेटून, जळून जाऊ दे वासना भगभगणार्‍या या नजरा नजर तुझीच अशी असू दे रण मर्दानी हो तू जरा थरार आता असा होऊ दे येता दुरूनी तू दिसशी सैरावैरा पळतील भेकड स्त्रीत्व मातृत्वाची होऊ दे सरशी

सौ. नलिनी र. राजहंस  

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 105

amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds