";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मुजोर होऊ नका’

मुजोर होऊ नका’

E-mail Print PDF

Add this to your website

मुजोर होऊ नका

संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक संघटना झाली ती जगात शांतता, स्थैर्य, सहवास, सहभाग एकवटण्यासाठी. यानिमित्ताने 21 सप्टेंबरला दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिन पाळण्याची प्रथा आहे. यंदा मात्र उलटेच घडले. भारत-पाकिस्तानमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली, तर अमेरिका उत्तर कोरियाने युद्धाची गर्जना केली. उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन याने थेट अमेरिका महासत्ता बेचिराख करण्याची धमकी दिली, तर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमच्या सुरक्षेला धोका निर्माण कराल तर कोरियाला जगाच्या नकाशावरून संपवून टाकू अशी तंबी दिली.

 ती एखाद्या पत्रकार परिषदेत नव्हे तर संयुक्त राष्ट्र संघाच्या भर आमसभेत बोलताना. उत्तर कोरिया हा धटिंगण देश म्हणून पूर्वीपासून कुप्रसिद्ध आहे. तो देश कोणतेच आंतराष्ट्रीय संकेत, निर्बंध पाळत नसल्याने त्याच्याकडून दुसरी अपेक्षा नसली तरी जागतिक महासत्तेचा प्रमुख त्याच पातळीवर उतरत खडाखडीची भाषा करणार असेल तर जागतिक पातळीवर शांतता व स्थैर्याचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एखाद्याने अंगावरचे कपडे उतरविले म्हणजे समोरच्याने तेच करावे आणि तु नंगा तो हम नंगेअसा हा प्रकार वाटतो. उत्तर कोरियाला उत्तर द्यायचे असेल तर अण्वस्त्राचा वापर अटळ आहे. त्याचे परिणाम दक्षिण कोरिया व जपानपर्यंत पोचतील, हे विसरता येणार नाही. या दोन्ही देशांनी साधलेली आर्थिक क्रांती व समृद्धी मातीमोल होण्यास वेळ लागणार नाही. चीन व रशिया अमेरिकी प्रभावाला शह देण्यासाठी उत्तर कोरियाचा उपद्रव उपयोगी पडेल असे मानत आले आहेत.

त्यामुळे उत्तर कोरियाला पायबंद घालण्यासाठी चीनने प्रमुख भूमिका घ्यावी हाच सुज्ञपणा ठरू शकतो. परंतु राजनैतिक प्रयत्नांसाठी संयम, दूरदृष्टी लागते, प्रसंगी दोन पावले मागे घेण्याची तयारी लागते. ट्रम्प यांची एकूण वागणूक पाहता त्यांच्याशी हे सगळेच विसंगत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता, सहजीवन याचा उच्चार करताना ट्रम्प यांनी कडक भाषा वापरली ते योग्यच आहे. पण दहशतवादी भस्मासुरांना वाढविण्यासाठी जे रान मोकळे मिळाले,

 जी राजकीय पोकळी निर्माण झाली, ती कुणामुळे याचेही आत्मपरीक्षण करायला हवे. दहशतवादामुळे आशियात अनेक वर्षं अस्थिरता खदखदत आहे. त्यावर कोरिया व अमेरिकेचा वाद कडी करत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर योग्य टीका केली. भारत विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात प्रगती करत असताना पाकिस्तान दहशतवादी घडवित आहे असा टोला दिला. पाकने मात्र इतर आरोप टाकून काश्मीरचा मुद्दा व्यासपीठावर आळवला.

असे आरोप प्रत्यारोप नेहमीचे झाले आहेत. पण रॉकेट मॅन (किम जोंग उन) याने अण्वस्त्र चाचण्या व अमेरिकेवर अण्वस्त्र डागण्याच्या धमक्या आणि प्रत्यक्ष कृती केली तर उत्तर कोरियाला बेचिराख करू असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून ट्रम्प यांनी जाहीर करणे भयानक वाटते. त्यावर किमने ट्रम्प यांना भुंकणारा कुत्रा अशी उपमा दिली. तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री याँग होयांनी ट्रम्प हे आत्महत्येच्या मोहिमेवर निघाले आहेत अशी वाच्यता केली, एकंदर या डरकाळ्यातून संभाव्य अणुयुद्धाचे संकट जगापुढे उभे राहणार की काय यावर सध्या काथ्याकूट चालू आहे. किम याला आवर घाला असे ट्रम्प चीनचे अध्यक्ष जिन पिंग यांना सांगत आहेत. उत्तर कोरियाची मुस्कटदाबी करण्यासाठी राष्ट्रसंघाने अलीकडे त्या देशावर आर्थिक निर्बंधही लादले, त्यामुळे किम अधिकच पिसाळला आहे. त्यातच कोरियात चीनचा व्यापारविषयक वाटा 90टक्के आहे.

 त्यामुळेच चीन मूग गिळून स्वस्थ आहे. कोरियाकडे 25 अणूबाँब 100 किलो टनच्या आसपास आहेत असा अंदाज आहे. हिरोशिमा व नागसाकीवर अमेरिकेने टाकलेल्या अणुबाँबची क्षमता 15 किलोटन होती याचा इतिहास जगापुढे आहेच. अण्वस्त्र युद्धाच्या उंबरठ्याकडे जग चालले आहे, याची धास्ती वाटते. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी ट्रम्प, जिन पिंग, रशियाचे पुतीन आणि अतिजहाल किम यांना एकत्र यावे लागेल. जगाच्या भल्यासाठी भारतीय राजकारणी व विशेषत: नरेंद्र मोदी यांना कदाचित कृष्णशिष्टाईकरावी लागेल

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 170

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds