";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अनास्थेचे बळी

अनास्थेचे बळी

E-mail Print PDF

Add this to your website

अनास्थेचे बळी

 मानवी जीवनात नैसर्गिक संकटे वारंवार येणारच. माणूसच जेव्हा निसर्गाला आव्हान देतो तेव्हाच तो कोपतो. आणि एकाच दंडुक्याने तो सर्वांना झोडपतो. त्यात निष्पाप व पापी असा भेदभाव करत नाही. पण मानवाच्या चुकीमुळे 29 सप्टेंबर रोजी जी जीवघेणी घटना घडली त्याला निसर्ग नाही तर मानवी चुका कारणीभूत ठरल्या. नवरात्रीच्या नवव्या माळेला मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वे सेवेच्या इतिहासात शुक्रवार काळदिवस ठरला. पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर सकाळी अकरा वाजता चेंगराचेंगरी होऊन 23 प्रवाशांना जीव गमवावा लागला तर 40 जण गंभीर जखमी झाले.

चेंगराचेंगरीनंतरचे दृष्य मानवी भावना थिजवून टाकणारे होते, तर निष्प्राण झालेली कलेवरे आणि असह्य वेदनेने विव्हळणारे जखमी प्रवासी हे दृष्य काळजाला घरे पाडणारे होते. दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवासी व त्यांचे नातेवाईकांचा आक्रोश अश्रूंच्या रूपात ओघळत होता. चेंगराचेंगरी नेकी कशामुळे झाली हे कोणालाच नक्की सांगता येत नाही. परंतु काही प्रवासी घसरून पडल्यामुळे अफवा पसरल्या. शॉर्टसर्किट झाले, पुल कोसळला, पत्रा पडला असा आरडाओरडा झाला. त्यातच दोन लोकलमधून प्रवासी उतरल्याने स्थानकावर प्रचंड गर्दी झाली.

या सार्‍या जीवघेण्या धावपळीत चेंगराचेंगरी झाली. सणासुदीच्या वातावरणात अवघा देश दंग असताना देशाचे ग्रोथ इंजिनअसलेल्या शहरात पावसाची सर येते काय अन् ती थांबण्याची वाट पाहत असलेले जीव चेंगरून मरतात काय. सगळेच धक्कादायक व भीतिदायक. निव्वळ अपघात तिथे माणसाची असहायता समजू शकते, परंतु दुर्घटना टाळण्यासाठी उपाय शक्य असतानाही केवळ निष्क्रियतेुळे, अनास्थेुळे केले जात नसतील तर त्यांची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. तीस-पस्तीस किलोीटर अंतरावरील घरातून लाखो मुंबईकर शहरात रोजगारासाठी येतात. लटकतलोंब कळत रेल्वे गाड्यात कसेबसे उभे राहून प्रवास करतात.

त्यांना सुविधा पुरविण्याचे निर्णय कधीही प्रत्यक्षात येत नाहीत. चेंगरचेंगरीचे ठिकाण असलेले हे स्थानक मध्य मुंबईतील महत्त्वाचे केंद्र आहे. 8 ते 10 लाख प्रवासी येथे चढउतार करतात. दादर स्थानकाची तीच अवस्था आहे. या जोड स्थानकावर जुन्या काळातील अरुंद असे चारच पुल आहेत. सर्वसामान्यांना जे वास्तव ढळढळीत दिसत होते, ते रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांना दिसत नव्हते काय? का त्यांनी डोळ्यावर कातडे ओढून घेतले होते? या पुलांच्या विस्तारीकरण व समांतर जादा पुलाची मागणी अनेक वर्षांची आहे. परळला मोठ्या स्थानकाचा दर्जा देण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात घेण्यात आला होता.

मात्र कागदी घोडे नाचत राहिले. कारभार लालफितीत बंद झाला, अन् माणसांची कलेवरे दसर्‍याच्या पूर्वसंध्येला मोजावी लागली. मागील सहा महिन्यात रेल्वे  पघात वाढले. त्याला कारण रेल्वे प्रशासन होते. त्याचे दृष्य परिणाम दिसू लागताच प्रामाणिक रेल्वे मंत्री सुरेश प्रभू नैतिक जबाबदारी स्वीकारून पायउतार झाले. त्यांच्या जागी आलेले पीयूष गोयल हे मुंबईस्थित मंत्री शुक्रवारी लोकल फेर्‍यांची संख्या वाढविण्याच्या कार्यक्रमासाठी प्रथमच मुंबईत आले असताना हा अपघात झाला हा दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल.

 एलफिन्स्टन येथील नव्या पुलाच्या बांधकामास सुरेश प्रभु यांनी मंजुरी दिली होती. मात्र रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याचे टेंडरच निघाले नाही. प्रभू यांनी या स्थानकावर 12 मीटर रुंद व 10 मीटर लांब इतक्या आकाराचा पुल एप्रिल 2015 मध्ये उभारण्यास परवानगी दिली होती. उपनगरी रेल्वेबद्दल रेल्वे प्रशासनात भरणा झालेल्या बाहेरच्या अधिकार्‍यांना अनास्था आहे असे मुंबईकरांचे मत आहे.

 पुलावरील गर्दीचा यांनी स्वत: कधीच अनुभव घेतला नाही. वास्तविक मुंबई ते पुणे असा स्वतंत्र विभाग करून तेथील प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे. या पट्ट्यात नागरीकरण वेगाने होत आहे. येथील जटील समस्येत अजून भर पडणार आहे. कोणत्याही आपत्तीत मुंबईकर पुन्हा उभा राहतो, असा इतिहास आहे. पण त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले तरी चालते, असा नोकरशाहीचा समज झाला आहे. तो भविष्यात घातक ठरू शकतो.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 198

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds