";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अखेर ठेचले

अखेर ठेचले

E-mail Print PDF

Add this to your website

अखेर ठेचले

भारतीय केंद्रीय राखीव दलाचे 42 जवान जैश-ए-महंद या पाक धार्जिण्या संघटनेने केलेल्या भीषण हल्ल्यात हुतात्मा झाले होते. 14 फेब्रुवारीला केलेल्या या हल्ल्याने सारा देश संतप्त झाला होता. भारत हा सॉफ्ट पॉवर आहे, कितीही कुरापती काढल्या तरी निषेध नोंदवण्यापलीकडे जात नाही अशी समजूत पाकिस्तानची झाली होती, पण दहशतवादी कृत्ये आता भारत सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश देणारी धाडसी कारवाई भारतीय हवाईदलाने केली आहे. पुलवामा येथे जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अखेर भारताने बदला घेत पाकचे जुने हिशोब चुकते केले. दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-महंदने स्वीकारली तरीही पाक पुरावे द्या असा कांगावा करतच राहिला. जगभरातून अनेक देशांनी निषेध व्यक्त केला.

पाकिस्तानला जगात तोंड वर करून बोलण्याची शामत राहिली नव्हती. मग पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांचा तळ सीमावर्ती भागातून हलवून बालाकोटजवळील नागरीवस्तीपासून दूर हलवला. त्याची माहिती भारतीय सुरक्षा दलांना व गुप्तचर संस्थांना मिळाली होती. पंतप्रधान मोदींनी तीनही दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. बालाकोट हे ठाणे तसे पाकिस्तानच्या अगदी पोटात असल्याने तेथे भारत ल्ला करू शकेल याची जराही कल्पना दहशतवाद्यांना नव्हती. तरीही सोवारी पहाटे हवाईदलाच्या बारा मिराज विमानांनी थेट पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात घुसून बालाकोट येथील जैश-ए-महंद या संघटनेचा तळ नेस्तनाबूत करून तीनशेहून अधिक दहशतवाद्यांचा खातमा केला. मुझफ्फराबाद आणि चाकोडी येथील केंद्रांवर या विमानांनी अग्निवर्षाव केल्याने अवघे भूंडळ थरारले.

एवढ्या आत घुसून लष्कराला कारवाई करणे शक्यच नव्हते, ते काम हवाई दलाने केले. अवघ्या 25 मिनिटात धडक कारवाई करून सर्व विमाने सुरक्षितपणे आपल्या तळावर सुखरूप परतली, यावरून कारवाई किती फत्ते झाली याचा अंदाज येतो. त्याबद्दल अवघा देश हवाईदलाचे अभिनंदन करत आहे. त्याच वेळी अतिरेकी व पाकिस्तानी लष्कर याचा बदला घेतील काय याची चर्चा रंगणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच सूड घेतला, बदला घेतला अशा प्रतिक्रिया देशभरातून उमटत असल्या तरीही भारताला स्वस्थ बसून चालणार नाही.

उलट्या कारवाईुळे संतप्त झालेला पाकिस्तान आता कोणत्याही थराला जाऊ शकतो हे गृहीत धरूनच आपल्याला यापुढे अधिक सावध राहावे लागेल. युरोपीयन राष्ट्रांनी भारताला शांततेचे आवाहन केले आहे. त्याच वेळी पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रानखान यांची खिल्ली उडवून शे-शेच्या घोषणा दिल्या आहेत हे विसरून चालणार नाही. भारताने हा हल्ला लष्करी नव्हता किंवा तेथील नागरिकांवरही नव्हता तर तो तेथील दहशतवाद्यांवर होता अशी रास्त भूमिका मांडली आहे. तुम्ही दहशतवाद्यांचे तळ नष्ट करा अथवा आम्ही करू असे या हल्ल्यामागचे सूत्र आहे आणि सर्व जगाला ते पटण्यासारखे आहे. आपण दहशतवादी आणि तेथील लष्कराला सणसणीत उत्तर दिले आहे. जैश-ए-महंद भारतावर आणखी हल्ले करण्याच्या तयारीत होता,

अशा बातम्या गुप्तचर संस्थांना मिळाल्या होत्या. त्यामुळेच वेळ न दवडता या संघटनांना लक्ष करणे आवश्यक होते. 1948, 1965, 1971 व कारगील युद्धात पाकच्या छुप्या लढाईचा अंदाज आलाच आहे. आताही ते समोरासमोर युद्ध करणार नाहीत, मात्र सीमेवर कुरापती काढत राहतील. पाकिस्तानची आर्थिक अवस्था आज अत्यंत बिकट आहे, मात्र अण्वस्त्रे आहेत त्या जोरावर तेथील लष्कर माजले आहे.

आपल्या विरोधात भारत मोठी लष्करी कारवाई करण्याचे टाळेल अशा प्रकारचा गर्व अलीकडे पाकिस्तानी नेत्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसत होता. त्याला ही कारवाईची एक चपराक आहे. पंतप्रधान इम्रानखान याने शांततेची संधी देण्याची मागणी केली होती, पण तेथील लष्काराला ती पचली नाही. तिथे लोकशाही नावालाच असते, सर्व काही लष्कर सांभाळते. अविचारी पाकिस्तान कोणत्याही क्षणी आत्मघातकी कृत्ये करू शकतो. त्यामुळेच भारतीय सशस्त्र दले आणि गुप्तचर संस्थांना अधिक दक्ष राहावे लागेल.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 25

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds