";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अंतराळातील धमाका

अंतराळातील धमाका

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

अंतराळातील धमाका

उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी बुधवारी (ता. 27) भारतानेघडवून आणली आणि अवकाश महासत्तांच्या पंगतीत स्थान मिळवले. ही बाब देशासाठी अभिमानाची आहे. आण्विक प्रतिरोध पूर्वीच साध्य केला आहे. आता शत्रुराष्ट्राच्या उपग्रहांना पाडण्याची तांत्रिक क्षमता आपल्याकडे असल्याचे सिद्ध केल्याने अवकाशातील युद्धाचा प्रतिरोधही प्राप्त केला आहे. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी गर्जना केली होती की, आम्ही जमीन, समुद्र व हवाई अशा तीनही मार्गाने देशाचे संरक्षण करू.

समुद्रमार्गे इंग्रजांनी जगावर साम्राज्य केले होते. इंग्रजाच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, असे म्हटले जायचे. पण भविष्यात अंतराळातही युद्धे होतील याचा कोणालाच अंदाज नव्हता. आज आपण इंग्रजांना मागे सारले आहे. एकविसाव्या शतकात युद्धतंत्रात अनेक बदल झाले आहेत. समोरासमोर लढण्यापेक्षा हवाई हल्ल्यांना प्राधान्य आले आहे. तेही मर्यादित राहणार असून आता अंतराळातून युद्धे होण्याची शक्यता आहे. स्पेस व सायबर स्पेस ही क्षेत्रे भविष्यात महत्त्वाची ठरणार आहेत. भारताने केलेल्या मिशन शक्तीचे महत्त्व या पोर्शभूीवर प्रकर्षाने जाणवते.

पृथ्वीपासून तीनशे किलोीटर अंतरावर असलेला आपलाच पण निकामी झालेला उपग्रह केवळ तीन मिनिटात नष्ट करून ही चाचणी फत्ते झाली. अवकाशात उपग्रह सोडून सर्वप्रकारची हेरगिरी केली जाते. सर्व प्रकारची माहिती गोळा केली जाते, हे आता लपून राहिले नाही. त्याचा मुकाबला आपण करू शकतो हे सिद्ध झाले आहे. अवकाश हे कोणाच्याही मालकीचे नाही या दृष्टीने त्याकडे पाहायला हवे. अवकाश तंत्रज्ञानात प्रगती केलेल्या सर्वच देशांकडून ही अपेक्षा आहे. अवकाशही युद्धखोरीने व्यापून गेले तर त्यात अखिल मानवजातीचे नुकसान होईल.

अवकाश मोहिमांबाबत भारताने मर्यादा पाळल्या आहेत आणि ही चाचणीही त्याला अपवाद नाही, हे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्राराष्ट्रात शांतता, सहकार्य, सलोखा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करत राहणे सर्वात महत्त्वाचे आहे. मात्र दुर्बलांच्या उपदेशाला किंमत दिली जात नाही. म्हणून आपले सामर्थ्य वाढवणे भाग आहे. उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीकडे त्या दृष्टिकोनातून पाहायला हवे.

लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केल्याने औचित्याचा प्रश्न निर्माण झाला. विरोधकांना आयते कोलीत मिळाले. अगदी निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली. दोन सर्जिकल स्ट्राईक व अंतराळातील महासत्ता या गोष्टींचे भाजप भांडवल करत आहे, असे विरोधकांचे मत आहे. दोन सर्जिकल स्ट्राईक निवडणुकीपूर्वी झाले आहेत. तर राष्ट्रीय सुरक्षेच्या संबंधित विषयांच्या निवेदनाच्या बाबतीत अपवाद केला जातो, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट करून विरोधकांची हवा काढून घेतली. मग या चाचणीची सुरुवात आमच्या काळात सुरू झाली असा राग आळवायला काँग्रेसने सुरुवात केली.

तर इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर व सध्याचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी हे तंत्रज्ञान 2012 मध्येच आम्ही विकसित केले होते. मात्र त्याची चाचणी घेण्याचे धाडस राजकीय नेत्यांनी दाखवले नाहे, असे स्पष्ट केले आहे. पण पंतप्रधान मोदी यांनी पुढाकार घेतला, सर्व मदत केली, ही मोहीम यशस्वी करा असे धारिष्ट्य दाखवले, असे त्या दोघांचे म्हणणे आहे. क्षेपणास्त्राच्या चाचणीसाठी पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याचा दावा सतीश रेड्डी यांनी केला आहे. थोडक्यात काय, देशातील तीनही संरक्षक दले, इस्रोसारख्या देशाचे नाव उंचवणार्‍या संस्था यांनी काय करावे किंवा काय करू नये याचे अधिकार भारतीय लोकशाहीतील संविधानाने फक्त पंतप्रधान यांना बहाल केले आहेत, हे कोणीही विसरू नये.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 14

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds