";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- यंदाची राजकीय दीपावली

यंदाची राजकीय दीपावली

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

यंदाची राजकीय दीपावली

पंचवीस ऑक्टोबरला दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. त्याआधीच राजकीय दिवाळीचा धुधडाका होणार आहे. दिवाळीचे फटाके दोन दिवस आधीच वाजणार आहेत, असे नियोजन आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सध्या विविध राजकीय पक्षांनी मतदारांवर विविध सवलतींचा व घोषणांचा भडिमार केला आहे. त्यात कोणताच राजकीय पक्ष मागे नाही. मतदारांसाठी आम्ही काय-काय करणार आहोत याची जंत्री, वाजंत्रीसह वाजत आहे. प्रत्येक पक्ष समोरच्या पक्षापेक्षा आपला पक्ष कसा वरचढ आहे, याचे प्रात्यक्षिक सादर करत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी व अन्य समविचारी पक्षांच्या आघाडीने दसर्‍याच्या पूर्वसंध्येला आपला आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

त्यात बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जाफी, उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज, ‘केजी टू पीजीमोफत शिक्षण, शेतीमालाला हमीभाव अशा दिलखेचक घोषणा केल्या आहेत, भाजपने लोकसभेत जिंकताना ज्या घोषणा केल्या होत्या त्याचीच रिओढताना त्याला 370वे कलम रद्द, तोंडी तलाक रद्द, राष्ट्रवाद याची जोड दिली आहे, तर शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेने वेगळाच जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, त्यात शेतकरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास लक्ष देण्यात आले असून शेतकर्‍यांना वार्षिक अनुदान देण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. एक रुपयांत रक्तचाचणी व आरोग्य चाचणी, दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण याशिवाय केवळ दहा रुपयात राईसप्लेट सुरू करणार

असल्याचे म्हटले आहे. 2014 मध्ये शिवसेनेने झुणका-भाकर व शिववडा सादर केला होता. त्यासाठी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी जागाही देण्यात आल्या होत्या. झुणका-भाकर काही महिन्यातच गायब झाली तर शिववडा-पाव बारा रुपयांच्या खाली मिळत नाही. अम्मांनीही (जयललिता) पाच रुपयात इडली-सांबार चालू केले होते. पण अम्मांच्या पश्चात सर्व बंद झाले. आता दहा रुपयात राईसप्लेट मिळणार आहे. थाळी म्हटल्यावर दोन-तीन चपत्या, डाळ-भात, एखादी भाजी, कांदा-लिंबू एवढे तर हवेच. ते दहा रुपयात या महागाईच्या काळात देता येणे शक्य नाही, एवढेही गणित यांच्याकडे नाही. सवंग लोकप्रियतेच्या घोषणांचा पाऊस वचननाम्यात पाडणे यासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. वरुणराजाने पळताभूई करून सोडले. आता राजकीय पक्ष घोषणांचा पाऊस पाडत आहे. निवडणुका म्हणजे मनोरंजनाचे साधन झाले आहे एवढे खरे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपापसात राजकीय लाथाळ्या करीत मतदारांना वेगवेगळ्या थाळ्या पेश करून जनता मिटक्या

मारीत मतदान करेल याची जबाबदारी सर्व घेत होते. राईसप्लेटबरोबर मुखशुद्धीसाठी आणखीही बराच मेवा उपलब्ध करून देण्या  आला आहे. राज्यात महावितरण खड्ड्यात गेले असताना 300 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांना वीज 30 टक्के सवलत देण्याची घोषणा म्हणजे अत्यंत धाडसी पाऊल ठरेल. कारण महिन्याला 4800 कोटी रुपये महावितरणला द्यावे लागणार आहेत, मात्र ते प्लॅस्टिकबंदीसारखे कदमताल होणार. कोणी म्हणाले आमचे पैलवान अंगाला तेल लावून तयार आहेत, पण समोर कुस्ती खेळण्यासाठी मल्लच नाहीत, तर कोणी म्हण ले मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, पैलवान कसे तयार करायचे व समो च्याला कात्रजचा घाट कसा दाखवायचा यात मी तज्ज्ञ आहे. राज्यातील मेळावे व विराट

सभांधून राज्यातील जनतेला भेडसावणार्‍या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होईल अशी अपेक्षा होती, पण तसे झालेच नाही. लोकांच्या मूलभूत समस्यांवर, शेतकर्‍यांच्या दुरवस्थेवर, शेतीमालाला ठोस संरक्षण देण्याच्या प्रश्नावर, उद्योगधंद्यातील गारठलेल्या गुंतवणुकीवर, बेरोजगारीवर कोणी मंथन घडवून आणताना दिसले नाही, त्यामुळे आता कोणाची थाळीस्वीकारायची हा लाख मोलाचा प्रश्न आहे. सर्व राजकीय हॉटेलवाले हातात थाळी घेऊन आवो भाई-बहिनो सस्ते का खाना मस्त है! एक बार खाओ, बार-बार खाओंगे!!असा डंका पिटून मोकळे झाले आहेत. हा लेख जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा फटाक्याचे आवाजही तुच्या कानांवर पडणार आहेत. त्यामुळे यंदा तरी फटाके खरेदी करू नका, शिवाय फराळाची थाळी ही तुम्हाला घरपोच मिळणार आहे. दिन-दिन दिवाळीआणि दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा!!!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 39

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds