";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कमळ अर्धवट फुलले

कमळ अर्धवट फुलले

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

कमळ अर्धवट फुलले

यंदा दिवाळीपूर्वी राजकीय फटाके फुटणार याचा अंदाज पावसाळ्यापूर्वीच आला होता. लोकसभेच्या 2019च्या निवडणूक निकालाने भाजपला स्पष्ट बहुत दिले. मग त्यानंतर महाराष्ट्र व हरियाना राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे आले. मात्र लोकसभेपेक्षा विधानसभेला कमी मतदान होते असा आजवरचा अनुभव सोवारी पुन्हा प्रकर्षाने जाणवला.

ग्रामीण भागात 55 ते 65 टक्के तर शहरी भागात 40 ते 45 टक्के एवढे मतदान कमी झाले. त्यातच धो-धो कोसळणार्‍या पावसाने थैान घातल्याने उमेदवार व कार्यकर्ते धास्तावले होते. पण वरुणराजाने सोवारी विश्रांती घेतली, म्हणून एवढेतरी मतदान झाले. महाराष्ट्रात एकूण मतदारांपैकी 40 टक्के लोकांनी मतदानच केले नाही असे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

शनिवार-रविवारसोवार जोडून सुट्ट्या आल्याने लोक मौज-मजा, दिवाळीची खरेदी यात गुंतून पडले. यावेळी सर्वच पक्षांनी राजकीय धुलवड, घाणेरडे आरोप-प्रत्यारोप, बोचरे शाब्दिक बाण आदिंचा वापर करून जनतेची करमणूक केली. अखेर मतदान थोडेसे अपवाद वगळता शांततेत पार पडले. या ठिकाणी एक मुद्दा आवर्जून उपस्थित करावा वाटतो. सध्या महाराष्ट्रात अतिश्रीमंत व अतिउच्च मध्यमवर्गीयांची संख्या 30 ते 35 टक्क्यांपर्यंत गेली आहे.

हा वर्ग मतदानास फारसा उत्सुक नसतो. कोण आला व पडला तरी त्यांच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. टक्का वधारण्यासाठी प्रशासनाने भरपूर प्रयत्न केले, पण ते सफल झाले नाहीत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. विधानसभेच्या झालेल्या तुंबळ युद्धात भाजपने सर्वाधिक 101 जागा व शिवसेनेने 58 ठिकाणी विजय मिळवून सत्ता संपादन करण्याचा मार्ग सोपा केला असला तरी राष्ट्रवादीने 54, काँग्रेस 45 जागा जिंकून तोडीस तोड उत्तर दिले आहे, तर इतर पक्षांनी 30 जागा जिंकून कमाल केली आहे.

पुढील पाच वर्षांसाठी विरोधीपक्ष प्रबळ असेल याची जाणीव महायुतीला ठेवावी लागेल. अगली बार 220 पारहा भाजपचा बुडबुडा मतदारांनी फोडला आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेची निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवर लढावी लागते याचे भान सर्व पक्षीय उमेदवारांना आली असेल अशी ही निवडणूक ठरली आहे. 370वे कलम रद्द करणे, तलाक कायदा हटवणे, प्रखर राष्ट्रवाद या भाजपच्या अजेंड्यावर सरकार विरोधात रान उठवताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याचाच फायदा उठवत सामान्य शेतकर्‍यांचे, बेरोजगारांचे प्रश्न,

नोटाबंदी व जीएसटी यामुळे लहान उद्योजक व व्यापारी यांना बसलेला फटका हे मुद्दे लावून धरले. विरोधक चिरडून जातील अशी राजकीय व्यूहरचना लावूनही राष्ट्रवादीचा हा अँग्री ओल्ड मॅनमैदान मारून गेला. शरद पवाराुंळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. वयाच्या 80व्या वर्षी 70 पेक्षा जास्त सभा घेतल्या, हे अजून यौवनात मीयाचे द्योतकच म्हणावे लागेल. सातार्‍यातील भर पावसातील त्यांची सभा लोकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील, कारण त्या सभेने साक्षात राजेपावसात चिंब भिजले.

एकवेळेचे जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील तावून-सुलाखून लोकप्रतिनिधी झाले. भाजपने-सेनेने राज्य राखले असले तरी पंकजा मुंडे, विजय शिवतारे, प्रा. राम शिंदे, जयदत्त क्षीरसागर, अनिल बोंडे, डॉ. परिणय फुके, राजे अंबरीश, अर्जुन खोतकर,

बाळा भेगडे आदी युतीच्या मंत्र्यांना मतदारांनी घरी बसवले आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाने नव्याने दिव्यवलय प्राप्त झाले, राष्ट्रीय काँग्रेसने फारसे लक्ष घातले नाही. माजी तीन मुख्यमंत्री स्वत:च्या भागात अडकून पडले. उदयोन्मुख नेतृत्वात रोहीत पवार, संदीप क्षीरसागर, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, सुनील शेळके इत्यादीचा उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्रात सर्वांत जास्त मतांनी अजित पवार निवडून आले, बाकी सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली, हाही शरदरावांचाच करिष्मा आहे.

या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणाची नवीन रूपरेषा निश्चित केली. इतर प्रश्न व राष्ट्रवाद यापेक्षा राज्यवाद महत्त्वाचा अशी जडण-घडण झाली आहे. हरियानात तर कोणालाच बहुत मिळालेले नाही. इतर दहा पक्षांचे उमेदवार तेथे निर्णय करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिपाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट याने शेती व शेतकरी कोडमडला आहे. वाहन उद्योगात मोठी मंदी आहे.

कंत्राटी कामगार कमी केले जात आहेत. महागाई वाढतच जाणार आहे. राज्यावर मोठे कर्जही वाढले आहे. अशा अवस्थेत सरकार व विरोधकांनी एकमेकांना सांभाळून घेत योग्य वाटचाल करावी लागणार आहे. लोकांनी सर्व पक्षांना संधी देताना गंभीर इशारा दिला आहे, एवढे विसरू नका.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 37

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds