";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अजुनी रुसून आहे

अजुनी रुसून आहे

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

अजुनी रुसून आहे

कुमार गंधर्वांनी गायलेले कवी अनील यांचे हे भावगीत 60 वर्षे होऊन गेली तरी आजही लोकप्रिय आहे. ते आठवायचे कारण म्हणजे काल झालेला महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार व त्याला जाणवलेली संजय राऊतांची अनुपस्थिती. एवढा मोठा समारंभ व राऊत कुठेच नव्हते. वास्तविक एवढ्या मोठ्या रामायण-महाभारताचे जणू नायक असल्याचे चित्र पुढे आलेले, मग ते का नव्हते? पत्रकारांनी काढलेला निष्कर्ष सांगतो की त्यांचे बंधू आणि शिवसेनेचे आमदार नितीन राऊत यांना मंत्रिमंडळात न घेतल्याने ते नाराज होते.

पत्रकारांनी थेट संपर्क साधला असता, ‘मी सरकारी कार्यक्रमांना जात नाही असे मोघम उत्तर देऊन त्यांनी वेळ मारून नेली. काहीही असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडलेला असताना विजयाचे शिल्पकार असल्याच्या थाटात वावरणारा पक्षाचा एवढा मोठा नेता शपथविधीसारख्या सर्वात महत्त्वाच्या समारंभाला गैरहजर राहतो. याचा नेका अर्थ हुशार मंडळीना बरोब्बर कळतो. मग सारवासारव काहीही असो, मखलाशी कोणतीही असू दे! सत्य दडून राहात नसतं!

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका 21 ऑक्टोबर 2019 रोजी झाल्या आणि 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाले. भाजप-शिवसेना युतीला मतदारांनी कौल दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळेच युती बहुताने निवडून आली. परंतु मुख्यमंत्रीपदाचा वाद पुढे करून शिवसेनेने भाजपची साथ सोडली आणि हयातभर ज्यांना शिव्या घातल्या त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गळ्यात गळा घालून सत्तास्थापनेचा खेळ केला. हे बरोबर की चूक ते काळ सिद्ध करून देईल. परंतु राजकारणात आकड्यांचा खेळ चालतो हे दिसत असल्याने सेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असे त्रिपक्षीय सरकार सत्तेवर आले आणि या खेळात मुख्य भूमिका बजावली होती ती संजय राऊतांनी. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर दोन नंबरचा नेता अशी त्यांची प्रतिमा झाली होती.

असे असताना त्यांच्या भावाचा मंत्रिमंडळात नंबर लागू नये याला म्हणतात राजकारण! असं घडत असतं. फारसं मनाला लावून घ्यायचं नसतं. रागावून तर अजिबात चालत नसतं. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना राजीनामा द्यायला लावला आणि त्या खुर्चीवर नारायण राण्यांना बसायचा मान दिला. परंतु वेळ आल्यानंतर पंतांना लोकसभेचे अध्यक्षपदही बाळासाहेबांनी मिळवून दिले होते. हे विसरता कामा नये. याचाच अर्थ आज अन्याय वाटत असला तरी उद्या न्यायही मिळत असतो हे समजून तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावेअशी भूमिका घ्यावी हे बरे! एवढ्या मोठ्या विजयाचे शिल्पकार असताना आपल्याला डावलले गेले याचा राग येणे स्वाभाविक होय. लोकांनासुद्धा हे अपेक्षित नव्हते.

परंतु आता पुढे काय याबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे. संजय राऊत राज्यसभेत शिवसेनेचे खासदार आहेत. पक्षाचे मुखपत्र सामनाचे संपादक आहेत. पक्षात मोठं स्थान आहे. परंतु राग येऊनही आता उपयोग होणार नाही. पक्ष सोडायचा म्हटला तरी काँग्रेस अगर राष्ट्रवादीचे दरवाजे बंद झाले आहेत. भाजप तर दारातही उभं करणार नाही. सगळीच गोची. बरं पक्षातील 5-25 आमदार फोडून बाहेर जाण्याइतकी ताकदही नाही. लोक ठाकरेंना मानतात, राऊतांना नाही. त्यामुळे मान खाली घालून गप्प राहून, ‘

आलिया भोगासी असावे सादरहेच खरे! भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यापासून संजय राऊत विलक्षण प्रसिद्धीच्या झोतात आले होते. सकाळ, दुपार, संध्याकाळ उघडाल त्या वाहिनीवर महाराजांचेच दर्शन होत होते. वाहिन्यांनाही फाडा-फाडीशिवाय उद्योग नाही आणि यांनाही फुकटात प्रसिद्धी! फार मोठा पराक्रम गाजवल्याच्या थाटात मंडळी वावरत होती. दोन महिन्यांचा प्रदीर्घ काळ गेला आणि अखेर मंत्रिमंडळ अधिकारावर आले. गंत बघा, साठीचा अनुभवी आमदार होतो

राज्यमंत्री तर विशीतला अननुभवी आमदार बनतो कॅबिनेट मंत्री! कुठे मुलगा, कुठे मुलगी, कुठे पुतण्या अशी मोठ्यांच्या पोटी जन्म घेतलेली मंडळी बनतात मंत्री! पण या गोष्टीला नावे ठेवू नयेत. आमच्या संस्कृतीने जे संस्कार केलेत त्याला हे धरूनच असल्याने गमतीचा भाग म्हणून सोडून द्यावे. भावाला आज जरी मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसलं तरी एखादं महामंडळ, राज्यमंत्र्याचा दर्जा उद्या मिळू शकतो अशी आशा धरून संजय राऊतांनी रागावू नये वा रुसू नये!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 39

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds