";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- महायुद्धाचे ढग

महायुद्धाचे ढग

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

महायुद्धाचे ढग

अमेरिका विरुद्ध इराण हा वाद तीव्र बनू लागला आहे. इराणचे लष्कर प्रमुख कासीम सुलेानी यांची ड्रोन हल्ला करून अमेरिकेने हत्या केली आणि भडका उडायला आरंभ झाला आहे. या हत्येचा बदला घेण्याची प्रतिज्ञा इराणने केली असून पुढे काय-काय घडते या चिंतेने जगाला ग्रासलेले आहे. या दोन्ही राष्ट्रांधील वाग्युद्ध वर्षानुवर्षे चालूच आहे.

परंतु प्रत्यक्षात त्याला तोंड फुटले नव्हते तोपर्यंत फारशी भीती वाटत नव्हती. आता उभय बाजूंनी डरकाळ्या सुरू झाल्या आहेत आणि आगडोंब उसळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काय होणार याकडे जगाचे लक्ष लागलेले आहे. अमेरिका विरुद्ध इराण हा वाद कित्येक दशकांपासून सुरू आहे. मुळाचा शोध घ्यायचा झाल्यास ख्रिश्चन विरुद्ध इस्लाम या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या वादाचा विचार करावा लागतो. पृथ्वीतलावर माणूस टोळीने राहत होता तेव्हापासूनचे हे भांडण आहे. विज्ञानयुग बहरले, माणसाच्या जीवनात परिवर्तन आले तरी मूळ वादाचा विसर पडू शकत नाही ही खरी शोकांतिका आहे.

इस्लामी राष्ट्रांचा खरा रोष युरोप नसून अमेरिका आहे. त्यामुळेच ओसामा बिन लादेनने अमेरिकेतील जागतिक व्यापारकेंद्र उद्ध्वस्त केले. लष्करी तळ असलेल्या पेंटॅगॉनवर हल्ला चढवला. महाबलाढ्य अमेरिकेला आम्ही वठणीवर आणू शकतो असे दाखवून द्यायचे होते. परंतु अमेरिका हल्ल्यातून त्वरेने सावरली आणि दडून बसलेल्या हल्लेखोर ओसामा बिन लादेनला शोधून काढून त्याचा खात्माही करून दाखविला. इराकच्या सद्दाम हुसेनला जमिनीखालच्या भुयारातून शोधून काढून फासावर लटकविले. विमाने पाडण्यात पराक्रम मानणार्‍या लिबियाच्या कर्नल गडाफीला त्याच्या देशात घुसून गोळ्या घालून ठार मारले. ख्रिश्चन विरुद्ध इस्लाम या पुरातन कालापासून चालत आलेल्या लढ्याचे हे वर्तान स्वरूप. पुढे काय होणार? कोणताही लढा सुरू झाला की त्याची झळ गरिबांना बसत असते. बड्यांना फारसा फरक पडत नाही. भारताची 80 टक्के इंधनखरेदी इराणकडून होत असते.

त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढायला त्वरेने सुरुवात झाली आहे. अगोदरचं वाढलेले इंधनाचे दर सामान्य माणसाचे पेकाट मोडून टाकणारे ठरलेले असताना आता युद्धाच्या भीतीने ते कोणत्या पातळीवर जातील ते सांगता येणार नाही. त्यामुळे भविष्यातील भडकत्या महागाईला तोंड देण्याची मानसिकता आतापासूनच तयार ठेवावी लागेल. मोदी सरकारवर हल्ला चढवायला अमेरिका-इराण वादाचे शस्त्र विरोधकांना मिळाले तर नवल वाटू नये! परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय ते समजून घेणे निश्चितच आवश्यक आहे. खरे म्हणजे दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ अशी म्हण आहे. परंतु इथे दोघांच्या भांडणात

तिसर्‍याचा तोटाच होतो आहे. इस्लाममध्ये शिया आणि सुन्नी असे दोन पंथ आहेत. त्यामुळेच इराणविरुद्ध सौदी अरेबिया हे शत्रुत्व जगजाहीर आहे. इंग्लंड-अमेरिका खंबीरपणे सौदीच्या बाजूने उभे आहेत. इराण हे राष्ट्र इंधनामुळे शक्तीमान बनलेले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेशी टक्कर देण्याइतके सामर्थ्य त्याच्याकडे आहे का हा खरा प्रश्न आहे. युद्ध खरेच सुरू झाले तर रशिया, चीन हे देश इराणला मदत करतील का? इराक युद्धाच्या वेळी काय घडले ते जगाच्या समोरच आहे. त्यामुळे इराणचा इराक करण्यात अमेरिकेला यश मिळेल का? महायुद्ध सुरू झालेच तर अण्वस्त्रांचा वापर होईल का? उत्तर कोरियाने

अणुबाँब, हैड्रोजन बाँब बनवले आणि थेट वॉशिंग्टनवर अण्वस्त्रे डागण्याची दर्पोक्ती केली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रंप आणि किम जोंग ऊन एकत्र आले आणि जगाने सुटकेचा नि:ेशास टाकला. त्याला एक वर्षसुद्धा होत नाही, तोच इराण-अमेरिका वादाने तोंड वर काढले. पुढे काय घडेल ते सांगता येत नसले तरी भारतीय तत्त्वज्ञानाला अनुसरून या वादात काहीतरी तोडगा निघेल आणि जग सुटकेचा नि:ेशास टाकेल असे म्हणूया. काशीस जावे नित्य वदावे! सामान्य माणूस भांडतो त्याचे फारसे काही वाटत नाही. परंतु मोठी माणसे भांडू लागली की भीती वाटते. खरे म्हणजे जगाने किती वैज्ञानिक प्रगती केली आहे! माणसाला चार घास सुखात, आनंदात खाता यायला पाहिजेत. प्रत्यक्षात चित्र उलटेच आहे. जितकी प्रगती तितकीच अधोगती. जगाची परिस्थिती सातत्याने बदलते आहे. परंतु भारतीय संस्कृतीमध्ये खरे उत्तर दडलेले आहे. कितीही प्रतिकूलकाळ आला तरी तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे, ‘निर्वाणी गोविंद असे मागे पुढे । काहीच साकडे पडो ने दीयावर वि शास ठेवून असावे. किंबहुना तुका म्हणे उगी रहावे । जे जे होईल ते ते पहावे.अशीच भूमिका ठेवावी. इराण-अमेरिका युद्धात काहीतरी तोडगा निघेल आणि महायुद्धाचे जगावरचे ढग निवळतील अशी आशा करूया!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 30

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds