";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- येस बँकेला नो

येस बँकेला नो

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

येस बँकेला नो 

रिझर्व बँकेने वाणिज्य क्षेत्रातील येस बँकेवर निर्बंध लादल्याचे गुरुवारी जाहीर केले. खातेदारांना आता महिन्यातून एकदाच 50 हजार रुपये काढता येणार आहेत. ही बँक आर्थिक संकटात असून सक्षम आर्थिक पुनर्उभारणीबाबत विेशासार्ह योजना सादर न केल्याने बँकेविरुद्ध कारवाई करावी लागली आहे. बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून प्रशासक म्हणून प्रशांत कुमार यांनी नियुक्ती झाली आहे. आता निर्बंध आहेत तोवर प्रशांत कुमार काम पाहातील.

वाणिज्य क्षेत्रातील पंजाब व महाराष्ट्र बँकेविरुद्ध अशीच कारवाई 6 महिन्यापूर्वीच करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता येस बँकेचा नंबर लागला. बँकेसाठी भांडवल उभे करावयाचे होते व या चर्चेला गतीच येत नसल्याने रिझर्व बँकेने हे पाऊल उचलले आहे. या घटनेुळे आर्थिक क्षेत्रात खळबळ माजणे हे स्वाभाविक असून ठेवीदारांची झोप उडणे अपरिहार्य होय.

खातेदारांना जास्तीत जास्त 50 हजार काढता येतील व वैद्यकीय उपचार, लग्न, परदेशगमन यासाठी अपवादात्मक परिस्थितीत अधिक रक्कमही काढता येईल, परंतु त्यासाठी रिझर्व बँकेची परवानगी आवश्यक असते असा हा एकूण मामला. आपल्या देशाने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतर इ.स. 1992 पासून सर्वच व्यवहारात परिवर्तन झाले. त्याच्या अगोदर संमिश्र अर्थव्यवस्था होती. तथापि अपेक्षित वेगाने प्रगती होत नसल्यामुळे तत्कालीन पंतप्रधान स्व. नरसिंह राव व अर्थंत्री डॉ. मनमोहन सिंग या जोडीने खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले. खासगी क्षेत्राला प्राधान्य आल्याने सर्व क्षेत्रांना बहर आला व प्रगतीची वाटचाल वेगाने सुरू झाली.

तथापि परिणामकारी उपाययोजनांच्या अभावी अनेक क्षेत्रांध्ये अपप्रवृत्ती बळावल्या. त्यापैकी एक म्हणजे बँका. राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी, वाणिज्य अशा बँकांचे जाळे वेगाने विस्तारले. चिटफंड आले. पतसंस्था आल्या. परंतु त्यावर प्रभावी नियंत्रणाची व्यवस्थाच नव्हती. आजही नाही. वास्तविक आर्थिक क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे आणि अत्यंत नाजूक स्वरूपाचे. परंतु त्यावर परिणामकारी अंकुशच नाही. रिझर्व बँकेला आपण शिखर बँक म्हणतो खरी परंतु तिच्या कारभाराबाबत साशंकता आहे. सर्व क्षेत्रातील बँकांवर रिझर्व बँकेचे नियंत्रण आहे, तर हे प्रकार घडतातच कसे असा सवाल आहे. गोष्टी विकोपाला गेल्यानंतरच जाग का येते हा मुद्दा आहे.

रुग्णाला एकदम अतिदक्षता विभागात दाखल करण्याऐवजी रोग सुरू होतानाच उपाययोजना का नाही केली? बँकांच्या संदर्भात रिझर्व बँक घेत असलेल्या निर्णयाुंळे सामान्य नागरिक चिंतातुर आहे. केवळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रश्न सुटत नाही. लाखो माणसे पोटाला चिमटा काढून आपला पैसा मोठ्या आशेने बँकांध्ये ठेवत असतात. हल्ली व्याजसुद्धा 6 आणि 7 टक्क्यांवर आलेले आहे. आपली रक्कम सुरक्षित राहावी म्हणून माणसे बँकांध्ये, पतसंस्थांध्ये, खासगी उद्योगांध्ये गुंतवीत असतात. परंतु गेल्या 25-30 वर्षांध्ये घडत असलेल्या घटनाुंळे लोक हवालदिल झालेले आहेत. संचालक मंडळ बरखास्त झाले म्हणजे प्रश्न मिटला असे होत नसून प्रश्न वाढत आहेत. वर्षानुवर्षे प्रशासकाच्या ताब्यात रूपी बँक अडकली अहे.

लोकांच्या डोळ्याचे अश्रू थांबत नाहीत, असे असताना वेळेवर तिचे विलीनीकरण करून लोकांच्या ठेवी का परत केल्या जात नाहीत याचे सर्वांनाच कोडे आहे. आर्थिक क्षेत्रातील प्रश्न लोंबकळत ठेवण्याऐवजी सुटावेत ही अपेक्षा गैर म्हणता येणार नाही. सामान्य जनतेला आपला पैसा सुरक्षित राहील, असे क्षेत्रच नजरेसमोर येईनासे झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा पूर्वजांच्या मार्गाने जावे लागण्याची शक्यता आहे. आपले पूर्वज आपला पैसा सोन्यानाण्यात गुंतवीत असत.

चोरांच्या भीतीने दागदागिने डब्यात, हंड्यात घालून भिंतीत, जमिनीत पुरून ठेवण्याची पद्धत होती. आता पुन्हा एकदा त्या मार्गाकडेच वळावे लागण्याची परिस्थिती आहे. बँका काय, पतसंस्था काय कधी मोडीत निघतील त्याचा ने नसल्याने आपला पैसा सोन्यानाण्याच्या रूपात जमिनीत पुरून ठेवावा हे बरे असेच लोकांना वाटेल. त्यापेक्षा सरकारने चांगल्या व्याजदराने लोकांकडून रकमा स्वीकाराव्यात व विकासकामांना त्या वापराव्यात हे योग्य ठरेल!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 32

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds