";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कोरोनाको डरोना

कोरोनाको डरोना

E-mail Print PDF

Add this to your website

 

Image result for coronavirus

 

कोरोनाको डरोना

सध्या जगभर एकच विषय गाजतो आहे व तो म्हणजे कोरोना. शंभरावर राष्ट्रांध्ये हा रोग पसरला आहे. त्याची निर्मिती प्रथम चीनमधील वुहान शहरात झाली. नंतर तो दक्षिण कोरिया, जपान, इटली, इराण, फ्रान्स, अमेरिका आदी देशांध्ये पसरला. सुारे पाच हजार माणसे आजवर या रोगाने दगावली असून जगभर सव्वा लाख लोकांना त्याची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने त्याला सर्वत्र फैलाव झालेला साथीचा रोग म्हणून जाहीर केले आहे. याचे परिणाम सर्व क्षेत्रांवर होत आहेत. मुख्यत: आर्थिक क्षेत्रावर चांगलाच परिणाम झाला आहे.

सर्व देशांच्या बाजाराचे निर्देशांक दणादण कोसळत आहेत. शंभर-दीडशेने निर्देशांक कोसळला तरी विलक्षण चलबिचल होत असताना गेल्या 5-6 दिवसांत हजाराने, 3-3 हजाराने बाजार गडगडत असल्याचे चित्र आहे. सोने वर जात आहे आणि खाली येत आहे. इंधनाचे दर प्रतिबॅरल 35 डॉलरला येऊन ठेपले असून पेट्रोल-डिझेलचे गिर्‍हाईक कमी होत चालले आहे. परदेशातून कोरोनाचे आगमन होत असल्याने अनेक देशांची विमानसेवा बंद करण्यात आली आहे. अनेक राष्ट्रांचे व्हिसा देण्यात येत नाहीत.

ही गंभीर परिस्थिती कोरोना या चीनमध्ये निर्माण झालेल्या एका व्हायरसने करून टाकली आहे. साहजिकच सारे जग चिंतेत असून पुढे काय होणार याची भीती प्रत्येकाच्या मनात दाटली आहे. साथीचे अनुभव संपूर्ण जगाला आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगो आपल्या देशाने तापसरी, कॉलरा, देवी, प्लेग अशा साथींचा जोरदार सामना केला होता. पुढे आधुनिक औषधोपचार उपलब्ध झाले व रोगांवर प्रभावी नियंत्रण माणसाला शक्य झाले. पूर्वी तिशी-पस्तीशीत माणसं जायची तर आता किमान पंचाहत्तरी गाठू ला ली.

औषधोपचारामुळे माणसाचे आर्युान वाढल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. शंभरी गाठलेलीदेखील भरपूर मंडळी आजकाल बघायला मिळतात. परंतु साथीचे रोग थांबवणे मात्र माणसाला शक्य झालेले नाही. 5-6 वर्षांपूर्वी स्वाइन फ्लू येऊन गेला. त्या वेळेसही लोक प्रचंड घाबरले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका संचालकाने या संधीचा फायदा घेत हजारो कोटींची औषधे भारतात आणल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने तेव्हा दिले होते.

त्याच्या अगोदर भारतात बर्ड फ्लू येऊन गेला व कोट्यवधी कोंबड्यांचे प्राण सक्तीने त्या वेळी घेण्यात आले होते. जागतिक बाजारात भारताचे चिकन मोठ्या प्रमाणावर येत असल्याने ज्यांचे धंदे संकटात आले होते. त्या देशांनी हा कट रचल्याचा संशय व्यक्त झाला होता. कोरोनाचे संकट हा चीन देशाचा उपद्व्याप असल्याचे आरोप होत आहेत. सध्या जगभर सत्तेची स्पर्धा आहे.

पहिल्या व दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिका ही महाशक्ती म्हणून उदयास आलेली असून तिला शह देण्यासाठी चीन हा देश वेगवेगळ्या बाजूंनी प्रयत्नशील आहे. अनेक राष्ट्रांनी अण्वस्त्रे बनवून आपली भांडारघरे भरून ठेवली आहेत. त्याच्या जोडीला जैविक अस्त्रे निर्मितीचीही लाट येऊ पाहते आहे. चीनमध्ये असाच प्रयोग चालू होता व तो फसल्याने कोरोनाचे भूत मानगुटीवर बसल्याचे सांगितले जाते.

शक्यता नाकारता येत नाही. माणूसच माणसाचा वैरी बनला आहे. भगवान श्रीकृष्णाने आत्मैव रिपुरात्मन:असे गीतेत सांगूनच ठेवले आहे. एका बाजूला चंद्रावर, मंगळावर याने पाठवली जात आहेत तर दुसरीकडे माणसे मारण्याची अस्त्रे निर्माण केली जात आहेत. या विसंगतीचा अर्थ काय लावावा? नंदनवनात जाण्याऐवजी माणसाला स्मशानात जाण्याची बुद्धी व्हावी याच्यासारखं दुर्दैव नाही. आपला देश श्रद्धाळू आहे.

कुणी काहीही म्हणो, आम्हा लोकांच परमेेशरावर श्रद्धा अहे. निर्वाणी गोविंद असे माग पुढेया जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या वचनावर आम्हाला भरवसा हे. त्यामुळे कोरोना असो की टरोना असो! आम्हाला त्याची भीती वाटणार नाही. एक आहे की त्यासाठी लागणारी काळजी आम्ही जरूर घेऊ.

व्यवहारातील दक्षता निश्चित पाळू. परंतु धीर नक्कीच सोडणार नाही. खरं म्हणजे आम्ही चीन देशाच्या सर्वात जवळचे पण तसा काहीही परिणाम भारतावर झालेला नाही आणि होणारही नाही. पुढारलेल्या बड्या राष्ट्रांध्ये कोरोनाचे बळी गेले पण दरिद्री आफ्रिकी देशात एकही कोरोनाग्रस्त सापडला नाही हे ध्यानात घ्यायला हवे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की कोरोनाको डरोना!!!

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 21

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds