";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मुलीने प्रियकरासह मिळून केली कुटुंबातील 7 जणांची हत्या

मुलीने प्रियकरासह मिळून केली कुटुंबातील 7 जणांची हत्या

E-mail Print PDF

Add this to your website
 
 
लखनऊ/अमरोहा - 7 ऑगस्टला देशभरात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. परंतु एक अशीही बहीण होती जिने आपल्या प्रियकरासोबत जाण्यासाठी भावाला तर जिवे मारलेच सोबतच कुटुंबातील तब्बल 7 जणांचा खून केला. आपल्या जबाबात ती म्हणाली की, भाच्याला मारताना मला थोडी दया आली होती, पण पकडले जाण्याची भीतीने त्याचाही गळा दाबला.
 
मुलीने प्रियकरासह मिळून केली कुटुंबातील 7 जणांची हत्या
- अमरोहा जिल्ह्याच्या हसनुपर स्टेशनमध्ये 14 एप्रिल 2008 रोजी शौकतसहित कुटुंबातील 7 जणांची हत्या झाली. हे नृशंस हत्याकांड शौकत यांची मुलगी शबनम आणि तिचा प्रियकर सलीम यांनी घडवले. कारण फक्त एवढेच - कुटुंबीयांचा शबनम-सलीमच्या प्रेमाला विरोध.
- सुरुवातीला शबनम पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होती. ती म्हणाली, कोणातरी अज्ञात माथेफिरूनी घरच्यांची केली.
- संशयाच्या आधारे पोलिसांनी सलीमला कस्टडीत घेऊन चौकशी केली. मग या हत्याकांडाचे रहस्य उलगडले. पोलिसांनी दोघांना अटक केली. 15 जुलै 2015 ला अमरोहाचे तत्कालीन
न्यायाधीशांनी दोघांना फाशीची शिक्षा ठोठावली.
- आरोपींच्या फाशीची शिक्षा अगोदर हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली. अमरोहा जिल्हा न्यायाधीशांनी दोघांचे डेथ वॉरंटही जारी केले. यादरम्यान शबनमला तिच्या प्रियकराकडून एक मुलगा झाला. यानंतर तिने राज्यपाल आणि राष्ट्रपतींना मुलाकडे पाहून क्षमा देण्याची विनंती केली.
- तथापि, शबनमची दयायाचिका  माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी फेटाळली. सप्टेंबर 2015 मध्ये यूपीचे राज्यपाल राम नाईक यांनीही दयायाचिका खारिज केली होती.
- शबनम एमए पास आहे आणि गावातील शाळेत शिक्षक मित्र म्हणून कार्यरत होती. तर सलीम फक्त सहावी पास आहे.
- पोलिसांनी मोबाइल कॉल ट्रेस करून घटनेचा तपास लावला. तपासात कळले की, दोघांचे एका वर्षात 900 वेळा फोनवर बोलणे झाले.
 
कॉलेजच्या मित्राला दत्तक दिला मुलगा
- जेलमध्ये शिक्षा भोगताना शबनमने मुलगा (ताज मोहम्मद)ला 14 डिसेंबर 2008ला जन्म दिला. मुलगा तिच्यासोबतच तुरुंगात राहत होता. 15 जुलै 2015ला ताज तुरुंगातून बाहेर आला. शबनमने तिच्या कॉलेजच्या मित्राला- उस्मान आणि त्याच्या पत्नीला ताजला दत्तक दिले.  आता मुलाचे दुसऱ्या घरी पालनपोषण होत आहे.
- उस्मान म्हणतो, अनेक लोक माझ्यावर टीका करतात, माझ्या  घरच्यांनीही संबंध तोडून टाकलेत. कधी कधी वाटते की जीव द्यावा, पण मग नंतर वाटते की या चिमुरड्याचा यात काय दोष? त्याचे काय होईल? अन् मग मी स्वत:ला सावरतो.
 
केसचे प्रेझेंट स्टेटस
-मुरादाबाद वरिष्ठ जेल अधीक्षक एसएचएम रिझवी म्हणाले, आता शबनमने जुलै 2017 मध्ये सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे, याचा निर्णय येणे अद्याप बाकी आहे. यानंतरही शबनमला शेवटची संधी मिळेल, तिला क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करता येईल. परंतु यासाठी सबळ कारण पाहिजे, तरच शिक्षेत काही सूट मिळू शकते. सध्या शबनम आणि सलीम जेलमध्ये बंद आहेत.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 151

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds