";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- गर्भवतीच्या डिलीव्हरीसाठी महिला डॉक्टरने स्वतःची प्रसुती थांबवली

गर्भवतीच्या डिलीव्हरीसाठी महिला डॉक्टरने स्वतःची प्रसुती थांबवली

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

न्यूयॉर्क : डॉक्टरांना आपल्या समाजात देवाचं स्थान दिलं जातं. अमेरिकेतील एका महिला डॉक्टरने प्रसुतीवेदना सुरु असतानाही आपल्या सेवाव्रताचं स्मरण ठेवलं. रुग्णालयातील एका गर्भवतीच्या प्रसुतीसाठी तिने स्वतःची डिलीव्हरी रोखून धरली.

अमेरिकेतील केंटुकीमध्ये ही मन हेलावणारी घटना घडली आहे. डॉ. अमेंडा हेस 23 जुलै रोजी हॉस्पिटलमधील स्वतःच्या रुममध्ये होती. त्याचवेळी एका गर्भवतीच्या प्रसववेदना तिच्या कानावर आल्या. लिआ हॅलिडे- जॉनसन ही गर्भवती विव्हळत होती.

लिआच्या बाळाच्या मानेभोवती नाळ गुंडाळली गेली होती. लिआच्या डिलीव्हरीसाठी दुसऱ्या डॉक्टर येण्यास विलंब होत होता. त्यामुळे डॉ. अमेंडा यांनी निकड ओळखून स्वतःच ही केस हाती घेण्याचं ठरवलं. विशेष म्हणजे डॉ. अमेंडाने लिआचं बाळंतपण यशस्वीरित्या पार पडलं.

डॉ. अमेंडाच्या धैर्याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. अमेंडाच्या एलन जॉईस या दुसऱ्या अपत्याच्या डिलीव्हरीनंतर मायलेकाचा फोटो फेसबुकवर शेअर केला जात आहे. डॉ. अमेंडाने शब्दशः प्रसुतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपली ड्युटी बजावली.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 42

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds