";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मृत्यूचे तांडव, 26 मुलांसह 63 जणांचा मृत्यू; काँग्रेसची राजीनाम्याची मागणी

मृत्यूचे तांडव, 26 मुलांसह 63 जणांचा मृत्यू; काँग्रेसची राजीनाम्याची मागणी

E-mail Print PDF

Add this to your website
गोरखपूर - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघातील बाबा राघव दास (बीआरडी) मेडिकल कॉलेजमध्ये दोन दिवसात ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडल्यामुळे 26 मुलांसह 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजन पुरवठा करणारी गुजरातची कंपनी पुष्पा सेल्सचे 69 लाख रुपयांचे बिल थकल्याने त्यांनी पुरवठा बंद केला होता. पुष्पा सेल्स कंपनीचा दावा आहे की त्यांनी 100 वेळा पत्र लिहिले तरीही बिल दिले गेले नाही. पेमेंटसाठी आल्यानंतर अधिष्ठाता भेटत नसल्याचीही तक्रार त्यांनी केली. त्यामुळे 1 ऑगस्टला वॉर्निंग देऊन 4 ऑगस्टपासून पुरवठा बंद करण्यात आला. बुधवारी ऑक्सिजन टाकी रिकामी झाली, त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत 63 रुग्णांचा ऑक्सिजन आभावी मृत्यू झाला. विशेष म्हणजे ऑक्सिजन पुरवठा बंद झाला त्याच दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बीआरडी मेडिकल कॉलेजची पाहाणी करण्यासाठी आले होते. काँग्रेसने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 
मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, या घटनेने संपूर्ण देश हळहळला आहे. राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे बालकांचा जीव गेला आहे. शेकडो कुटुंबांवर दुःख कोसळले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. आरोग्य सेवा पुरवणे ही त्यांची जबाबदारी होती. यापासून ते पळ काढू शकत नाही. यात डॉक्टरांचा काहीही दोष नसल्याचेही आझाद म्हणाले.

काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी आरोप केला की गेल्या एक महिन्यापासून बीआरडी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. ते म्हणाले, स्थानिक वृत्तपत्रांमध्ये याबद्दल वारंवार छापून येत होते. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आमच्याकडे याची सविस्तर महिती आहे की हॉस्पिटलमध्ये एक महिन्यापासून ऑक्सिजनची कमतरता होती. 
आझाद यांच्यासोबत उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर आमि आरपीएन सिंह देखील होते.
 
बहुजन समाज पक्षाचे नेते सुधींद्र भदोरिया म्हणाले, 'ही फार दुःखद आणि लाजीरवाणी घटना आहे. त्यांना (सीएम योगी आदित्यनाथ) थोडेजरी दुःख होत असेल तर त्यांनी हॉस्पिटलमध्ये जावे आणि मुलांच्या आई-वडिलांना भेटावे. नैतिकेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.'
 
दोषींवर कठोरात कठोर कारवाई होणार
उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले, यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. आरोग्य हा राज्य सरकारचा महत्त्वाचा विषय आहे. योग्य कारवाई केली जाईल असा विश्वास मौर्य यांनी शनिवारी व्यक्त केला.
 
प्रश्नोत्तरातून समजून घ्या योगींच्या राज्यातील मृत्यूचे तांडव
9 ऑगस्ट रोजी योगींनी मेडिकल कॉलेजची पाहाणी केली होती, मात्र ऑक्सिजन पुरवठा बंद असल्याची त्यांना कल्पना नव्हती. दुसरीकडे यूपी सरकारने 26 बालकांसह 63 रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्यामुळे झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. सरकारने म्हटले आहे, की ऑक्सिजनमुळे मृत्यू झालेले नाही. 
- जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांनी या घटनेचे न्यायिक चौकशीचे आदेश दिले आहे. ते म्हणाले, शुक्रवारी 7 जणांचा मृत्यू आजारपणामुळे झाला. 
- बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये दोन वर्षांपूर्वी द्रवरुप ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यात आला होता. येथून 100 खाटांच्या इन्सेफेलायटिस वॉर्डसह 300 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जातो.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 114

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds