शिक्षिकेला भर वर्गात विद्यार्थ्यांसमोर पेटवलं!

Friday, 18 August 2017 09:24 Pragati
Print

Add this to your website

 

 

बंगळुरु : भर वर्गात शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोर पेटवल्याची धक्कादायक घटना बंगळुरुतील एका शाळेत घडली आहे. पीडित शिक्षिकेच्या बिझनेस पार्टनरने अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

केजी सुनंदा असं भाजलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेत ती 50 टक्के भाजली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शिक्षिका गंभीर भाजली असून तिला देखरेखीखाली ठेवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

शिक्षिकेला पेटवून दिल्यानंतर आरोपी रेणुकाराध्या पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

केजी सुनंदा पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषय शिकवत असताना ही घटना घडली. “दुपारी 2 च्या सुमारास एक व्यक्ती वर्गात शिरला आणि शिक्षिकेवर ओरडू लागला. त्यानंतर त्यांच्यात काही क्षण वाद झाला. शिक्षिकेने त्याला वर्गातून बाहेर जाण्यास सांगितलं.

मात्र त्याचवेळी त्याने हातातील बाटलीचं झाकण उघडून शिक्षिकेच्या अंगावर रॉकेल ओतलं आणि त्यानंतर तिला पेटवलं. आम्ही हतबल होऊन किंचाळत होतो,” असं एका विद्यार्थ्याने सांगितलं.

शिक्षिकेला पेटवून हल्लेखोराने पोबारा केल्यानंतर विद्यार्थीही त्याच्या मागे धावले आणि इतर शिक्षकांना मदतीसाठी बोलावलं.

Share