";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- श्रीलंकेचे स्वप्न भंगले

श्रीलंकेचे स्वप्न भंगले

E-mail Print PDF

Add this to your website
भारताची विजयी नवमी; 7 गड्यांनी जिंकला सामना; गोड शेवटाचे श्रीलंकेचे स्वप्न भंगले
काेलंबाे- सामनावीर कर्णधार विराट काेहलीने अापल्या कणखर नेतृत्वाखाली लय कायम ठेवताना टीम इंडियाची विजयी नवमी साजरी केली. भारताने बुधवारी यजमान श्रीलंकेला एकमेव टी-२० सामन्यातही पराभवाची धूळ चारली. भारताने ७ गड्यांनी सामना जिंकला. यासह भारताने दाैऱ्यामध्ये सलग ९ विजयाची नाेंद केली. यामध्ये तीन कसाेटी अाणि पाच वन डे सामन्यांचा समावेश अाहे.

विराट काेहलीच्या (८२) अाणि मनीष पांडेच्या (नाबाद ५१) अर्धशतकाच्या बळावर भारताने १९.२ षटकांत विजयश्री खेचून अाणली. 
यजुवेंद्र चहल (३/४३) अाणि कुलदीप यादवच्या (२/२०) धारदार गाेलंदाजीमुळे कंबरडे माेडलेल्या यजमान श्रीलंकेला ७ बाद १७० धावा काढता अाल्या. प्रत्युत्तरामध्ये भारताने तीन गड्यांच्या माेबदल्यात सहज लक्ष्य गाठले. विराट काेहली अाणि मनीष पांडेने तिसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली अाणि भारतीय संघाचा विजय निश्चित केला. यामध्ये मनीषने अर्धशतकाचे याेगदान दिले.

धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीवीर अाणि तडाखेबंद फलंदाज राेहित शर्मा (९) फार काळ अाव्हान कायम ठेऊ शकला नाही. त्यापाठाेपाठ २४ धावांची खेळी करून युवा फलंदाज लाेकेश राहुलनेही पॅव्हेलियन गाठले. मात्र, त्यानंतर विराट काेहली अाणि मनीष पांडे चमकले. त्यांनी संघाचा डाव सावरला. या पराभवामुळे श्रीलंकेला घरच्या एकही विजय संपादन करता अाला नाही.

चहल, कुलदीप चमकले
भारताकडून गाेलंदाजीमध्ये युवा खेळाडू यजुुवेंद्र चहल अाणि कुलदीप यादव हे दाेघे चमकले. चहलने धारदार गाेलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. त्याने डिकवेला, परेरा अाणि शनाकाला बाद केले. तसेच कुलदीप यादवने दाेन गडी बाद केले. तसेच भुवनेश्वर कुमार अाणि जसप्रीत बुमराहने सामन्यात प्रत्येकी एक गडी बाद केला.

काेहली-पांडेची विजयी भागीदारी
झटपट दाेन विकेट पडल्यानंतर संकटात सापडलेल्या भारताला विराट काेहली अाणि मनीष पांडेने सावरले. या दाेघांनी तुफानी फटकेबाजी करताना संघाच्या धावसंख्येला गती दिली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. यासह त्यांनी टीमचा विजय जवळजवळ निश्चित केला हाेता. दरम्यान, मनीष पांडेने शानदार नाबाद अर्धशतकी खेळी केली. त्याने ३६ चेंडूंचा सामना करताना ४ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे नाबाद ५१ धावांची खेळी केली.

काेहलीचे झंझावाती अर्धशतक
जबरदस्त फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीने झंझावाती अर्धशतक ठाेकून विजयश्री खेचून अाणली. त्याने ५४ चेंडूंत ८२ धावांची तुफानी खेळी केली.यामध्ये सात चाैकार अाणि एका षटकाराचा समावेश अाहे. याच अर्धशतकाच्या बळावर त्याने अापल्या नेतृत्वात टीम इंडियाची विजयी माेहीम अबाधित ठेवली. याशिवाय त्याने दाैऱ्यातील अापली झंझावाती खेळीही कायम ठेवली.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 110

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds