";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मातीशिवाय केली शेती, दोन वर्षात कमावले 4 कोटी रुपये

मातीशिवाय केली शेती, दोन वर्षात कमावले 4 कोटी रुपये

E-mail Print PDF

Add this to your website
 
 
नवी दिल्ली - एक वर्ग असा आहे की जो शेतीसोडून दुसऱ्या व्यवसायाकडे वळतोय. तर काही जण तगड्या पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळतात. चेन्नई येथील एका तरुणाला मातीशिवाय शेती करण्याची आयडिया इतकी आवडली, की त्याने थेट या आयडियाला आपल्या उदरनिर्वाहाचे साधन बनवले. या तरुणाने मातीशिवाय शेती करणाऱ्या व्यवसायाला स्टार्टअपच्या माध्यमातून सुरवात केली. सुरवातीलाच या व्यवसायाने 2 कोटी टर्नओव्हरचा टप्पा पार पाडला. हा व्यक्ती आहे चेन्नई येथील रहिवासी श्रीराम गोपाल.
 
दिव्य मराठी वेब टीमशी बोलतांना श्रीराम गोपाल म्हणाले, की पाच वर्षापूर्वी त्यांच्या एका मित्राने मातीशिवाय शेतीचा एक व्हिडीओ दाखविला होता. या व्हिडीओने मला प्रेरणा दिली. मातीशिवाय शेती होणाऱ्या या पद्धतीला हायड्रोपोनिक्स म्हणतात. याची सुरवात मी वडिलांच्या फॅक्टरीमधून केली.
 
पुढील स्लाईडवर वाचा - काय आहे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान
मातीशिवाय घराच्या गच्चीवर करू शकता शेती
 
- हायड्रोपोनिक्स या टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने रोपटे मातीशिवाय उगवल्या जातात. पाण्याच्या सहाय्याने पोषक तत्वे रोपट्यांच्या मुळापर्यंत पोचवली जातात.
- रोपट्याला एका मल्टी लेअरच्या सहाय्याने पाईमध्ये उगवले जाते. या रोपट्यांची मुळे पाईपमध्ये सोडली जातात. 
- माती नसल्याने गच्चीवरील भार कमी होतो. त्याचबरोबर नव्या तंत्रज्ञानामुळे वेगळी काही व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही.
 
पुढे वाचा - सुरवातीला केली इतकी गुंतवणूक
5 लाख रुपयांची केली गुंतवणूक
 
श्रीराम यांनी सांगितले, की त्यांनी तीन मित्रांच्या मदतीने 5 लाख रुपयांची गुंतवणूक करून फ्यूचर फर्मची स्थापना केली. त्यांच्या वडिलांच्या फॅक्टरीत रिकामा जागा खूप असल्याने त्यांनी तेथूनच सुरवात केली. आता त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 8 कोटी रुपये झाला आहे.
 
पुढे वाचा - या शेतीला दिले जातेय प्रोत्साहन
श्रीराम यांनी सांगितले की, मातीशिवाय होणऱ्या शेतीला सर्वसामान्य शेतीच्या तुलनेत 90 टक्के पाणी कमी लागते. सध्या आमच्या कंपनीकडून हायड्रोपोनिक्स किट्सची विक्री होत आहे. हे किट्स 999 रुपयांपासून पुढे उपलब्ध आहे. जागा आणि गरजेनुसार किट्सचे दर ठरतात. घरामध्ये असलेल्या 80 चौरस फूटावर या किट्सचा खर्च 40 हजार रुपये येतो. यामध्ये 160 झाडे लावता येतात.
 
पुढे वाचा - किती वेगाने वाढतोय व्यवसाय
300 पट वेगाने वाढतोय व्यवसाय
 
श्रीराम यांनी सांगितले  की, 2016-17 मध्ये कंपनीचा टर्नओव्हर 38 लाख रुपये होता. हा यावर्षी वाढून 2 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. यावर्षी हा टर्नओव्हर 8 कोटी रुपयांपर्यंत पोचण्याची अपेक्षा आहे. एका बाजार सर्वेक्षणानुसार, ग्लोबल हायड्रोपोनिक्स मार्केटचा एकूण वाटा गेल्या आर्थिक वर्षात् 693.46 कोटी रुपये होता. हा व्यवसाय 2025 मध्ये 1210.65 कोटी रुपयांची उलाढाल गाठण्याची अपेक्षा आहे.
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 138

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds