";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मुलाने आईची शेवटची इच्छा पूर्ण करताच आईने त्यागले प्राण

मुलाने आईची शेवटची इच्छा पूर्ण करताच आईने त्यागले प्राण

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

  • हिसार (हरियाणा न्यूज) : येथे पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने देखली पतीच्या तेराव्या नंतर जगाचा निरोप घेतला. मुलाने शेवटची इच्छा पूर्ण केल्यानंतर महिलेची प्राणज्चोत मालवली. जहरो देवी आणि बनवारी असे मृत जोडप्याचे नाव आहे. दोघांचा विवाह 1937 मध्ये झाला होता. त्यांनी 82 वर्ष एकमेकांची साथ दिली. त्यांनी आपल्या चार पिढ्यांना मोठे होताना पाहिले आहे. आज या परिवारामध्ये मुले-मुली, नातू-नातीण, पंतूसहीत एकूण 32 सदस्य आहेत. जहरो देवी यांनी 92 व्या वर्षी तर बनवारीलाल यांनी वयाच्या 102 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.


    मुलाने आईची शेवटची इच्छा पूर्ण करताच आईने त्यागले प्राण
    बनवारीलाल यांचाय 31 डिसेंबर 2018 रोजी निधन झाले होते. मुलांनी 11 जानेवारी वडिलांचे तेरावे केले. यावेळी आई मुलांनी म्हणाली की, 'माझी देखील जिवंतपणीच तेराव्याची प्रथा पार पाडा'. मुलांनी आईची मागणी ऐकत वडिलांसोबतच आईचे तेरावेही केले. क्रियाकर्म केल्याच्या दुसऱ्या दिवशी जहरो देवीने सुद्धा जगाचा निरोप घेतला.

     

    बनवारीलाल वयाच्या 101 व्या वर्षी सद्धा करत होते काम
    बनवारीलाल यांनी कधीच कामातून निवृत्ती घेतली नाही. 101 वर्षाचे असताना देखील ते काम करत असल्याचे नातू जयपाल याने सांगितले. तर जयपाल यांचे वडील सांगतात की, कुरुक्षेत्र गोशाळा सुरू होण्यापूर्वी येथे वीट तयार करण्याचे काम करत होते. यानंतर गोशाळेची स्थापना झाली होती. बनवारीलाल यांनी स्वतः या गोशाळेसाठी विटा तयार केल्या होत्या. याशिवाय उदयपुरिया भागातील गोशाळी देखील वडिलांनी तयार केलेल्या विटांपासून बांधण्यात आली आहे. मुलाने सांगितले की, गेल्या दिवाळीला त्यांनी पणत्या तयार करून विक्री केली होती. तर आई जहरोदेवी सुद्धा घरातील काम करत होती.

     

    प्रेम इतके की, सोबतच करायचे जेवण
    जपपालने सांगितले की, आजी-आजोबांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. दोघे एकमेकांना सोडून जेवण करत नसे. शेवटच्या वेळेपर्यंत त्यांनी एकमेकाला साथ दिली होती. 31 डिसेंबर रोजी बनवारी लाल यांच्या मृत्यूनंतर जहरोदेवी उदास राहत होत्या. 11 जानेवरी रोजी बनवारीलाल यांचा तेराव्याच्या कार्यक्रमावेळी माझी देखील जिवंतपणी तेरावा घाला अशी आजीने इच्छा व्यक्त केली होती. मुलांनी देखील त्यांची ही शेवटची इच्छा पूर्ण केली. दुसऱ्यादिवशी सकाळीच जहरोदेवीने या जगाचा निरोप घेतला. 

     
     
 
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 31

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds