";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- भाविकांवर ओढवली संक्रांत..नर्मदेत बोट उलटली, मृतांची संख्या 7 वर

भाविकांवर ओढवली संक्रांत..नर्मदेत बोट उलटली, मृतांची संख्या 7 वर

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

नंदुरबार- मकरसंक्रांतीनिमित्त नर्मदा नदीवरील भूषा पॉइंट या पवित्रस्थळी स्नानास गेलेल्या आदिवासी भाविकांवर संक्रांत ओढवली. नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जात असताना बोट उलटून सात जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने किनाऱ्यापासून १५ फूट अंतरावरच ही दुर्घटना घडली. त्यामुळे वेळीच मदत मिळाल्याने इतर ४० भाविकांना वाचवण्यात यश आले. घटनेच्या दुसर्‍या दिवशी शोधकार्य सुरु आहे. बुधवारी सकाळी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या त्रिवेणी संगमावर असलेल्या अतिदुर्गम भागातील भुश्या येथील बोट दुर्घटनेत २४ तासानंतर दोन चिमुकल्या बालकांचे मृतदेह एनडीआरएफच्या पथकाने बाहेर काढले. यात सीमर भाईदास पावरा (वय-साडे चार वर्षे), मोनिका वीरसिंग पावरा (वय- 5, दोन्ही रा.तेलखेडी ता.धडगाव) या बालकांचा समावेश आहे.

 

दोन्ही बालकांना शवविच्छेदन करण्यासाठी धडगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याठिकाणी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. या दुर्घटनेत बोट चालक मालक वसंत भामट्या पावरा यांच्या कलम 304 प्रमाणे धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बोटीचा पंचनामा करून बोट जप्त करण्यात आली आहे.

शोकाकूल वातावरणात पाच जणांवर अंत्यसंस्कार..
पाच मृतदेहांवर दुपारी तेलखेडी गावात शोकाकुल वातावरण अंतिम संस्कार करण्यात आले. धडगाव तालुक्यातील हजारोच्या संख्येने नातेवाईक उपस्थित होते. यापुढे अशी दुर्घटना होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने काळजी घेणे गरजेचे आहे.

 

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत

ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास धडगाव तालुक्यातील भूषा येथे घडली. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे प्रत्येकी दोन लाख रुपये मदतीची घोषणा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली. दरवर्षाप्रमाणे मकरसंक्रांतीला भूषा येथून नर्मदा नदीच्या दुसऱ्या काठावर आदिवासी बांधव एकत्र जमतात. त्याठिकाणी नवस. स्नान आणि निसर्गाची पूजा करतात. मंगळवारी मकरसंक्रांतीनिमित्त एका बंदिस्त बोटीत ७० ते ८० भाविक भूषा पॉइंट येथून नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर जाणार होते. मात्र, भूषा येथे १५ फूट अंतरावरच बोट उलटली. घटनास्थळी माेठा जमाव जमला हाेता. काहीजण मोबाइलमध्ये घटनेचे चित्रीकरण करण्यात व मृतदेहाचे फाेटाे काढण्यात व्यस्त हाेते. घटनेचे गांभीर्य नसलेल्या या लाेकांबद्दल संताप व्यक्त केला जात हाेता.

 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 63

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds