";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- 50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस पुलावरून कोसळली

50 शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस पुलावरून कोसळली

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

 

School Bus Carrying 50 Children Falls Into Culvert In Andhra Pradesh

गुंटूर - आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी शालेय बसला भीषण अपघात झाला आहे. जवळपास 50 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बस पुलावरून कोसळली. या अपघातात किमान 15 विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी 3 जण गंभीर आहेत. सर्वच विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • चालक पोलिसांच्या ताब्यात

    > गुंटूर जिल्ह्यातील एका पुलावरून जात असताना सोमवारी सकाळी ही शालेय बस घसरली. तसेच पुलाखाली पलटल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले. स्थानिकांनी वेळीच बचावकार्य सुरू करताना पोलिसांना घटनास्थळी बोलावले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. बसच्या चालकाची चौकशी केली असता तो नशेत असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

    > बस आणि त्यातील सर्वच विद्यार्थी गुंटूरच्या कृष्णावेणी टॅलेंट स्कूलचे होते. तसेच ही बस सोमवारी सकाळी शाळेच्या दिशेने जात होती. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये बस उलटल्याचे दिसून येत आहे. सोबतच, सभोवताल जमलेली गर्दी आणि लहान मुलांचे टिफीन तसेच स्कूल बॅग सुद्धा दिसत आहेत.

     
 
 
 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 31

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds