";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मुलाला विमानतळावर विसरून आईचा विमानप्रवास, पायलटने घेतला यू-टर्न

मुलाला विमानतळावर विसरून आईचा विमानप्रवास, पायलटने घेतला यू-टर्न

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

Image result for विमान

प्रवासाला निघताना घाईघाईत घरात एखादं सामान, पैसे किंवा तिकीट विसरणं यासारख्या घटना होतच असतात. पण सौदी अरेबियात एक महिला चक्क मुलाला विमानतळावर विसरून विमानप्रवासास निघून गेली. अखेर पायलटने यू टर्न घेत विमान वळवलं आणि ताटातूट झालेल्या या मायलेकराची भेट घडवून आणली. पायलटच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

साधारणत: टेक ऑफ केल्यानंतर विमानाला फक्त इमर्जन्सी मध्ये परतण्याची परवानगी दिली जाते. पण सौदी अरेबियात एका पायलटने मायलेकराची भेट व्हावी म्हणून विमान परत विमानतळावर आणल्याची घटना घडली आहे. फ्लाईट SV832 प्रवाशांना घेऊन जेड्ढाहून क्लालांलपूरला निघाली होती. त्याचवेळी अचानक सौदी अरेबियातील एका महिला प्रवाशाने आरडाओरड करत रडण्यास सुरुवात केली. क्रूने तिला याबद्दल विचारले असता गडबडीत आपण मुलाला अब्दुल अजीज इंटरनॅशनल विमानतळावरच विसरल्याचं तिने सांगितले. तसेच काहीही करा पण मला माझ्या मुलापर्यंत पोहोचवा अशी गयावया करत तिने पुढील प्रवास करण्यास नकार दिला. त्यामुळे एअर हॉस्टेसने व इतर प्रवाशांनी तिला शांत राहण्याचा सल्ला दिला. पण महिला ओक्साबोक्शी रडू लागली.

अखेर याबद्दल पायलटला कळले. त्यानंतर त्याने कंट्रोलरुमशी संपर्क साधून विमान पुन्हा विमानतळावर आणण्यासाठी कोणते नियम आहेत याबद्दल विचारणा केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला परत येण्याची परवानगी दिली. त्यानंतर पायलटने इतर प्रवाशांना याबद्दल सांगितले. सगळ्याच प्रवाशांनी पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले. त्यानंतर विमानाने यूटर्न घेत अब्दुल अजीज इंटरनॅशनल विमानतळ गाठले आणि माय लेकराची भेट झाली. त्यानंतर थोड्या वेळाचा ब्रेक घेत विमान पुन्हा क्लालांलपूरच्या दिशेने झेपावले.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच पायलटवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच मुलाला विमानतळावर विसरणाऱ्या महिलेवर टीका होत आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 6

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds