";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- खासदार दिलीप गांधींना भाषण थांबवण्यास सांगताच संयोजकांवर भडकले

खासदार दिलीप गांधींना भाषण थांबवण्यास सांगताच संयोजकांवर भडकले

E-mail Print PDF

Add this to your website

अहमदनगर: नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना भाषण थांबविण्याची सूचना केल्यानंतर ते संयोजकांवर चांगलेच भडकले. मी केलेल्या विकासकामांबाबत बोलू देणार नसाल तर तुम्हीच बोला असे म्हणत त्यांनी आपला त्रागा व्यक्त केला. दरम्यान, दिलीप गांधी यांची नाराजी अद्याप दूर झाली नसल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. तसेच भाजपवालेही गांधी यांच्याबाबत अविश्वासच दाखवत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा झाली. पंतप्रधान मोदींच्या भाषणा आधी भाजप खासदार दिलीप गांधी यांचे भाषण झाले. या भाषणादरम्यान दिलीप गांधी मागील पाच वर्षात आपण केलेल्या कामांची माहिती देत होते. मात्र, चालू भाषणादरम्यान संयोजकांकडून गांधी यांना एका व्यक्तीद्वारे चिठ्ठी पाठवली व भाषण आटोपते घेण्यास सांगितले. यामुळे गांधी संतप्त झाले आणि दोन मिनिटे कशाला आताच भाषण बंद करतो तुम्हाला कोणाला बोलायचे ते बोला असा सूर आवळला व माईकपासून दूर जाऊ लागले. त्यानंतर गांधी यांना पुन्हा बोला बोला असे व्यासपीठावरून सांगण्यात आले. यानंतर गांधी यांनी आपले भाषण चालू केले तसेच आपण केलेल्या विकासकामांची जंत्री वाचून दाखविली. यादरम्यान, दिलीप गांधी चांगेलच भावूक झाल्याचे दिसले.

विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट कापून काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या डॉ. सुजय विखे यांना देण्यात आले. यामुळे दिलीप गांधी पक्षावर नाराज आहेत. त्यांनी सुजय विखेंच्या प्रचारात उघड उडी घेतलेली नाही. त्यांची समजूत काढण्यासाठी सुजय विखेंसह राधाकृष्ण यांनीही वेगवेगळी भेट घेतली होती. मात्र, आपण भाजपसोबत आहोत असे मोघम सांगितले होते. त्यानंतर गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांची बंडखोरी रोखण्यात भाजपला यश आले. मात्र, आजच्या घटनेने दिलीप गांधी अद्याप भाजपवर नाराज असल्याचे तसेच भाजपचाही गांधींवर पूर्ण विश्वास नसल्याचे चित्र समोर आले आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 20

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds