";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- बबली समजून प्रेमात पडला; प्रत्यक्षात बबलू निघाला

बबली समजून प्रेमात पडला; प्रत्यक्षात बबलू निघाला

E-mail Print PDF

Add this to your website

 

ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात एक विचित्र प्रेमप्रकरण उघड झाले आहे. लिंगपरिवर्तन करून मुलगी बनलेल्या एकीच्या प्रेमात अलेक्स हा तरुण आकंठ बुडाला होता. ते नऊ महिने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, अलेक्सला प्रेयसीच्या लिंगपरिवर्तनाबाबत कोणतीही माहिती नव्हती. एका मित्राकडून प्रेयसीच्या पूर्वायुष्याबाबत समजल्यानंतर त्याला धक्का बसला. त्याने प्रेयसीशी संबंध तोडले असून या धक्क्यातून तो अजूनही सावरलेला नाही.

आपण आपल्या प्रेयसीवर मनापासून प्रेम करत होतो. नऊ महिने एकत्र राहत असूनही तिने आपल्यापासून ही मोठी गोष्ट लपवून ठेवली. आपली प्रेयसी आधी मुलगा होती. मात्र, वयाच्या 18 व्या वर्षी लिंगपरिवर्तन करून ती मुलगी झाली होती. आमच्या एका मित्राकडून तिच्या पूर्वायुष्याबाबत समजल्यानंतर आपण तिच्याशी संबंध तोडल्याचे अलेक्सने सांगितले. तिने आपल्याला फसवले असून सत्य लपवून ठेवल्याचा राग आल्याचेही तो म्हणाला. अलेक्स 20 वर्षाचा असून त्याची प्रेयसी 25 वर्षाची आहे. सात वर्षांपूर्वी तिने लिंगपरिवर्तन केले होते. मात्र, आपल्यापासून तिने हे लपवून ठेवले होते. आमच्यात कोणेतही मतभेद नव्हते. आमचे चांगले संबंध असल्याचेही तो म्हणाला. मात्र, तिने सत्य लपवून ठेवल्याने मानसिक त्रास होत असल्याचे त्याने सांगितले. ‘डेली मेल’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

एकदा मित्राने नशेत असताना प्रेयसीच्या पूर्वायुष्याबाबत माहिती दिल्यानंतर आपल्याला त्याच्यावर विश्वास बसला नाही. आपण प्रेयसीला याबाबत विचारल्यावर तिने काहीही उत्तर दिले नाही. मात्र, ती रडायला लागली. लिंगप्रिवर्तन केल्यानंतर ती काही औषधे घेत होती, असेही अलेक्स म्हणाला. आमच्यात चांगले संबंध आणि विश्वास असूनही प्रेयसीने ही गोष्ट का लपवली ते समजले नसल्याचे तो म्हणाला. रिलेशनशिपमध्ये विश्वास महत्त्वाचा असल्याने प्रेयसीने ही गोष्ट सांगायला हवी होती, असे तो म्हणला. तिने विश्वासात घेऊन आपल्याला ही माहिती दिली असती तर आपण तिच्याशी संबंध तोडले नसते असेही अलेक्सने स्पष्ट केले. आपण अनेकदा तिच्या घरीही गेलो होतो. तिच्या कुटुंबीयानीही याबाबत आपल्याला कधीही सांगितले नाही. आपल्या मुलीने मला सर्व सांगितले आहे असा त्यांचा समज होता. या घटनेने फसवणूक झाल्याचे वाटत आहे. या धक्क्यातून सावरलो नसल्याने आपण प्रेयसीशी संबंध तोडले असून समाजात मिसळणेही थांबवले आहे, असे अलेक्स म्हणाला.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 34

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds