";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- भारतीय वंशाच्या दीपक राज यांनी 'भगवद्गीते'वर हात ठेवून घेतली आमदारकीची शपथ

भारतीय वंशाच्या दीपक राज यांनी 'भगवद्गीते'वर हात ठेवून घेतली आमदारकीची शपथ

E-mail Print PDF

Add this to your website

Deepak Raj Gupta becomes first Indian to take oath as MLA in Australian Capitol Territory Assembly.

 

 

कॅनबेरा - ऑस्ट्रेलिया कॅपिटल टेरेटरी (एसीटी) विधानसभेत पहिल्या भारतीय-ऑस्ट्रेलियन सदस्य दीपक राज गुप्ता यांनी मंगळवारी 'भगवद्गीते'वर हात ठेवून आमदारकीची शपथ घेतली. 30 वर्षीय दीपक 1989 मध्ये ऑस्ट्रेलियात गेले होते.

याबाबत दीपक यांनी सांगितले, 'मी भगवद् गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याच्या निर्णय अगोदरच घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या सदनात बायबलद्वारे शपथ घेतली जाते. मी माझी इच्छा व्यक्ती केली असता विधानभवनातील अधिकाऱ्यांनी एखाद्या सदस्य इतर धर्मग्रंथासोबत शपथ घेऊ शकतो का याबाबतचे नियम तपासले. दरम्यान अशाप्रकारची शपथ घेण्यास कोणतीही अडचण नसल्याचे सांगत मला शपथ घेण्यात परवानगी दिली. मी विधानभवनात भगवद् गीतेची एक प्रत सोबत घेऊन गेलो होतो.' शपथविधी कार्यक्रमानंतर दीपक यांनी भगवद् गीतेची प्रत विधानभवनास भेट म्हणून दिली.


ऑस्ट्रेलियात कारावा लागला मोठा संघर्ष 
दीपक यांचे बंधू कर्नल अनिल राज यांनी सांगितले, 'की दीपकने ऑस्ट्रेलियात बराच संघर्ष केला. कार धुण्यापासून ते रेस्तराँमध्ये सुद्धा काम केले. या दरम्यान ते अभ्यासही करत होते. दीपक यांना 1991 मध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरी भेटली. यानंतर त्यांना सरंक्षण विभागात कार्यकारी अधिकारी म्हणून सरकारी नोकरी मिळाली.'


भारतीय संस्कृतीला चालना दिली
अनिलने पुढे बोलताना सांगितले, की दीपक ऑस्ट्रेलिया राहून सुद्धा भारतीय संस्कृती विसरले नाहीत. त्यांनी भारतीय संस्कृतीला चालना देण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले. भारतीय संस्कृतीबाबत ऑस्ट्रेलियातील लोकांना माहीत व्हावे यासाठी त्यांनी कॅनबरात भारतातील विविध सण साजरे केले. या सणांमध्ये मंत्र्यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. तसेच ऑस्ट्रेलियात गुरुद्वारा आणि मंदिर उभारण्यासाठी योगदान दिले. यानंतर दीपकला मल्टी कल्चर अॅडव्होकेट आणि एक्सलन्स कम्युनिटी सर्व्हिसचा पुरस्कार मिळाला.


दीपक 2006 ते 2016 पर्यंत ऑस्ट्रेलिया-इंडिया व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. ही ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय संस्था असून दोन्ही देशांमधील व्यापार वाढविणे हे संस्थेचे उद्दीष्ट आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 53

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds