";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- टोकियोमध्ये एका कारकुनाने 1300 लाेकांच्या क्रेडिट कार्डातून केली मनसोक्त ऑनलाइन शॉपिंग

टोकियोमध्ये एका कारकुनाने 1300 लाेकांच्या क्रेडिट कार्डातून केली मनसोक्त ऑनलाइन शॉपिंग

E-mail Print PDF

Add this to your website

In Tokyo, a clerk made a free online shopping with a credit card of 1300 peoples

 

टोकियो : बहुतांश लोकांना आपल्या क्रेडिट कार्डाचा क्रमांक, एक्सपायरी डेट व सिव्हीव्ही क्रमांक लक्षात ठेवणे अवघड असते. पण जपानमध्ये एका व्यक्तीने एक, दोन नव्हे तर सुमारे १३०० लोकांच्या क्रेडिट कार्डाचे क्रमांक लक्षात ठेवून हवी तशी रक्कम उधळली. या महाभागाचे नाव युसूके तानीगुची (३४) असे असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. तानीगुची कोटो सिटीतील एका शॉपिंग मॉलमध्ये काम करतो. तो फोटोग्राफिक मेमरीच्या मदतीने बिलिंग करत होता. त्याच्या साह्यानेच लोकांच्या क्रेडिट कार्डाची सगळी माहिती त्यांच्या डोक्यात साठवली गेली, असे पोलिसाना त्याने कबुली देताना सांगितले.


फोटोग्राफिक मेमरीतून ३४ वर्षीय युसूके लक्षात ठेवत असे माहिती
- एकाने लिहिले, कमाल वाटते. जगात काही माणसे असे कृत्य करतात
- आणखी एकाने म्हटले, बुद्धीचा अपव्यय करणे आहे. आपल्या बुद्धीचा योग्य वापर करण्यासाठी अशा प्रकारची नोकरी त्याला मिळेल का?
- या माणसाची स्मरणशक्ती व्हीडिओ रेकॉर्डरसारखी
- हा खराेखरच बुद्धिमान असेल. अशा माणसाची आमची भेट झाली नाही.
- फोटोग्राफिक मेेमरी प्रत्येकाकडे नसते. परंतु ज्यांच्याकडे असते, त्यांनी त्याचा वापर योग्य कामासाठी करावा. लोकांची फसवणूक करण्यासाठी नको.


घरी वस्तू मागवण्याच्या दोषामुळे सापडला पोलिसांच्या तावडीत
फोटोग्राफिक मेमरीद्वारे लोकांना एखादी वस्तू आठवणीत राहतात. तानीगुचीच्या बाबतीत असेच घडत होते. कोणतीही वस्तू पाहताच तो ती सहज लक्षात ठेवत होता. एखाद्या नोटबुकमध्ये लिहून ठेवेपर्यंत त्या वस्तूची माहिती त्याच्या डोक्यात राहात होती. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, वस्तू दीर्घकाळ लक्षात ठेवण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे, तानीगुचीला क्रेडिट कार्ड होल्डरचे नाव, त्या कार्डाचे १६ आकड्याचा क्रमांक, एक्सपायरी डेट, व सिक्युरिटी कोड सहजपणे लक्षात ठेवत होता. या माहितीद्वारे तो ऑनलाइन शॉपिंग करायचा. त्या वस्तू खरेदी करून त्याची पुन्हा विक्री करायचा आणि पैसे कमावत हाेता. या पैशातून मौजमजा करत होता. एकदा अशीच ऑनलाइन शॉपिंग करताना तो पकडला गेला. त्याने एका क्रेडिट कार्डातून अडीच हजार डॉलर म्हणजे एक लाख ८० हजार रुपयाच्या दोन बॅगा मागवल्या. परंतु पोलिसांकडे क्रेडिट कार्ड चोरीस गेल्याची माहिती होती. त्यांनी सर्व डिलिव्हरी बॉयना सांगून ठेवले होते की, एखादे महागडे उत्पादन डिलिव्हरीसाठी आले तर त्यांना जरूर कळविण्यात यावे. पोलिसांना तानीगुचीच्या घरात त्याची नोटबुक सापडली असून यात हजारो क्रेडिट कार्डाची माहिती लिहून ठेवलेली होती. या डायरीवरून सर्व तपास होईल.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 35

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds