";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- ट्रम्पच्या भूमिकेने अधिकारी घाबरले

ट्रम्पच्या भूमिकेने अधिकारी घाबरले

E-mail Print PDF

Add this to your website

 

वॉशिंग्टन - अमेरिकेत निर्वासित येऊ नयेत यासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विचित्र सल्ला दिला होता. यात काटेरी भिंत उभारणे, निर्वासितांना मगरी आणि साप असलेल्या दरीत टाकणे आणि पायात गोळी मारणे यासारखे उपाय होते.

हा दावा न्यूयाॅर्क टाइम्सचे वार्ताहर मायकेल शिअर आणि ज्युली डेव्हिस यांच्या नुकत्याच प्रकाशित पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाचे नाव आहे ‘बॉर्डर वॉर्स : इनसाइड ट्रम्प्स असाॅल्ट आॅन इमिग्रेशन.’ यात अनेक अधिकाऱ्यांसोबत झालेल्या मुलाखतीनंतर ही माहिती देण्यात आली. मेक्सिको सीमेवर भिंत बांधणे ट्रम्प यांचा मुख्य अजेंडा होता. कामास सुरुवातही झाली होती. पेंटागॉनने यासाठी २५,६०० कोटी रुपये मंजूरही केले होते. सांगण्यात आले आहे की, या वर्षी मार्चमध्ये ट्रम्प निर्वासितांबाबत आक्रमक झाले होते. त्यांना दक्षिणेकडून होणारी वर्दळ थांबवण्यासाठी त्यांनी सर्व उपाय करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी वैयक्तिक पातळीवर सल्ला दिला होता की, सैनिकांनी निर्वासितांच्या पायावर गोळी मारावी. मात्र, त्यांना हे बेकायदेशीर होईल, असल्याचे सांगण्यात आले. सीमेवर पाण्याने भरलेला मोठा खड‌्डा जवळच असलेली भिंत बांधायलाही त्यांनी सांगितले होते. त्याच्यात साप आणि मगरीही असाव्यात. भिंतीमध्ये वीजप्रवाह सतत वाहता असावा असेही त्यांना वाटत होते. सल्लागारांसोबतच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी सीमा बंद करण्याचे आदेश दिल्याचे पुस्तकात म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले होते- मी हे करेनच

ओव्हल कार्यालयात ट्रम्प आणि सल्लागारांची बैठक सुमारे दोन तास चालली होती. यात ट्रम्प यांना समजावण्याचा प्रयत्न झाला. यावर ट्रम्प अधिकाऱ्यांना ओरडत म्हणाले होते की, तुम्ही मला मूर्ख समजत आहात, हा माझा मुद्दा आहे, तो मी अमलात आणेनच. लवकरच तुम्हाला त्यावर अंमलबजावणी झालेली दिसेल.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 15

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds