";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कलहामुळे तिने मागितली कोर्टाची मदत; जजनी आपल्या खुर्चीवर बसवून सांगितले -तूच आदेश दे...

कलहामुळे तिने मागितली कोर्टाची मदत; जजनी आपल्या खुर्चीवर बसवून सांगितले -तूच आदेश दे...

E-mail Print PDF

Add this to your website

 

भोपाळ : वडिलांचा नेहमीचा संताप आणि घरातील कलहाला कंटाळून एका १६ वर्षीय मुलीने जिल्हा विधी प्राधिकरणात तक्रार करून मदत मागितली. शुक्रवारी ही मुलगी शाळेतून थेट प्राधिकरणात पोहोचली. तेथील कार्यकारी जज आशुतोष मिश्रांकडे तिने तक्रार नोंदवली. या नेहमीच्या भांडणामुळे मला नैराश्य येत आहे, मला मदत करा, असे तिने विनवले. जजनीही अनोखा मार्ग काढला. अगोदर त्यांनी समुपदेशनातून मुलीस तिच्या आई-वडिलांना प्राधिकरणात बोलावण्यास राजी केले. नंतर आई-वडिलांसमोर मुलीस आपल्या खुर्चीत बसवून, तूच निकाल दे, असे सांगितले. मुलीनेही हिंमत केली आणि निकाल दिला. हा निकाल ऐकून आई-वडिलांचे डोळे पाणावले. जजनीही मुलीने दिलेल्या निकालाचा आदेश काढला.

बाबा मारहाण करणार नाहीत... मुलीचा आदेश मुलीने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आई-बाबा आता कधीही भांडणार नाहीत. शाळेची फीस बाबा नियमित भरतील. कधीही मारहाण करणार नाहीत. जेवणाचे ताट फेकणार नाहीत. किराणा वेळेत भरतील. मुलांच्या गरजा वेळेत पूर्ण करतील. आईला खर्चासाठी काही पैसे देतील.

बाबा संतापी आहेत, फेकाफेकी करतात... मुलीने जजना सांगितले, की ती मिसरोद भागात राहते. तिचे वडील एका खासगी कंपनीत मॅनेजर आहेत. वृत्तपत्रातून तिने जिल्हा विधी प्राधिकरणाबाबत वाचले आणि ती तक्रार घेऊन आली. प्राधिकरणानेही घाबरलेल्या या मुलीचे समुपदेशन केले. दुसरीकडे पित्यानेही आपल्या चिडखोरपणामुळे कुटुंब अस्वस्थ होत असल्याचे सुनावणीदरम्यान मान्य केले. गावी वृद्ध माता-पित्यास सतत पैसे पाठवावे लागतात म्हणून आपण नेहमी तणावात असतो हे मान्य करून मुलीच्या पित्याने हेच आपल्या चिडखोरपणाचे मुख्य कारण असल्याचे सांगितले. प्राधिकरणाचे सचिव आशुतोष मिश्रा यांनी सांगितले, निकालानंतर या मुलीत आत्मविश्वास वाढला आहे. आता ती स्वत: कुटुंबाचे समुपदेशन करू शकते. यासाठी प्राधिकरण या मुलीस नि:शुल्क प्रशिक्षण देणार आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 30

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds