";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मुलीच्या आवाजात गोड बोलत जोधपूरच्या तरुणाला लाखो रुपयांना लुटले

मुलीच्या आवाजात गोड बोलत जोधपूरच्या तरुणाला लाखो रुपयांना लुटले

E-mail Print PDF

Add this to your website

 

आरोपी सिद्धार्थ पटेल आणि फिर्यादी रवी इनाणिया

आरोपी सिद्धार्थ पटेल                                          आणि फिर्यादी रवी इनाणिया

 

जोधपूर : ही एखाद्या चित्रपटाची कथा नाही. पूर्णपणे खरी आहे. मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील सिद्धार्थ पटेलने फेसबुकवर संजना नाव धारण करून जोधपूरच्या रवी इनाणियाशी तीन वर्षांपूर्वी मैत्री केली होती. बनावट संजनाने आपण दिल्लीची असल्याचे सांगितले होते. सिद्धार्थ मुलींच्या आवाजात रवीशी फोनवर संभाषण करायचा. संजनाने पहिला मेसेज 'हाय!' असा पाठवला. त्यानंतर प्रेम जुळत गेले. नंतर लग्नापर्यंतची बोलणी गेली. लग्नात शनी व मंगळाचा दोष असल्याचे सांगत रवीकडून चार वेळा दहा हजार ४०० किमी लांबीची नर्मदा परिक्रमाही पार पाडली. अावाज बदलून बोलण्यात तरबेज असलेल्या सिद्धार्थने आपण संजनाचा भाऊ असल्याचेही सांगितले आणि ठिकठिकाणी रवीसोबत तो तीन वर्षे फिरला. लाखों रुपये उडवले. पण संजनाची व रवीची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. त्यामुळे रवीला संशय आला. त्याने पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सिद्धार्थ यास अटक केली. न्यायालयाने त्यास ७ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. सिद्धार्थने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबात जे काही सांगितले, त्यावरुन एखाद्या चित्रपटात शोभून दिसावे असे प्रसंग आहेत. रवी म्हणाला, सिद्धार्थला कायद्याने जी काही शिक्षा व्हायची ती होईल. परंतु संजनावर माझे इतके प्रेम जडले होतेे की, तिच्यासाठी मी घर-दार सोडले. पैसा खर्च केला. पण संजनाला कधीच भेटू शकलो नाही.

- ज्या संजनावर पैसे उडवले, कुटुंब सोडले तो निघाला सिद्धार्थ - संजनावर इतके प्रेम जडले की तिला विसरणे अशक्य : फिर्यादी - आलिशान आयुष्य जगण्यासाठी व्यावसायिकासोबत फेसबुकवर मैत्री

९ सिम; आत्या, मावशी, भाऊ व वडील म्हणून बोलला

सोशल मीडियावर चॅटिंग, संजनाच्या सुरेल आवाजाने रवीशी मैत्री केली. सिद्धार्थने संजनाचा संपूर्ण कुटुंबाची पात्र साकारली. कॉन्फरन्सिंगवर तो सर्वांच्या आवाजात बोलायचा. वेगवेगळ्या ९ सिमवरून संजना, तिची मावशी, आत्या, भाऊ, वडील व सावत्र आई बनून संवाद साधत होता. वेगवेगळ्या संभाषणामुळे रवीचा विश्वास वाढत गेला.

मंदिरांतून नवस-सायास, १ लाख किमी प्रवास

फोनवर रवीला वाटायचे, आपण संजनाशीच बोलतोय. कधी तिचा भाऊ बनून सिद्धार्थ सांगायचा, ती आजारी आहे. यासाठी तू नर्मदा परिक्रमा करायला पाहिजे, असा सल्ला द्यायचा. कधी कामाख्या मातेची, ओंकारेश्वराची परिक्रमा करायचा सल्ला देत असे. रवीने त्यासाठी लाखों रुपये खर्च केले.

न्यायाधीशांसमक्ष सिद्धार्थने काढला संजनाचा आवाज

पोलिसांनी साेमवारी सिद्धार्थ व रवीला समोरासमोर बसवून चौकशी केली. सिद्धार्थने संजनाचा आवाज काढताच अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. तरीही रवीला संजना अस्तित्वात नाही, असे वाटत नव्हते. तो म्हणाला, आवाज संजनाचा आहे. पण सिद्धार्थ संजना नाही.

 
Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 19

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds