भारतीय वंशाचा 16 वर्षीय क्लायंबर डोंगरावरुन 500 फूट खोल कोसळला, नंतर झाले असे...

Saturday, 04 January 2020 09:48 pragati
Print

Add this to your website

 

 

ओरेगोन- भारतीय वंशाचा कॅनेडीयन क्लायंबर गुरबाज सिंग मंगळवारी अमेरिकेच्या ओरेगोनमधील 11240 फूट उंच माउंट हुडवरुन कोसळला, पण सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. गुरबाज आपल्या मित्रांसोबत डोंगरावर चढाई करण्यासाठी जात होते, तेव्हा बर्फावरुन पाय घसरल्याने ते 500 फूट खोल कोसळले. बचाव पथकाने 4 तासांच्या अथक पर्यत्नानंतर त्यांना वाचवले.

वाचल्यानंतर गुरबाज म्हणाले की, "आम्ही वर चढत जात होतो, तेव्हा अचानक माझा पाय घसरला आणि मी खाली कोसळलो. खाली येताना मला वाटले की, आता माझे वाचणे अशक्य आहे. पण, सुदैवाने मी वाचलो." या अपघाता गुरबाजचा पाय फ्रॅक्चर झाला.

हेलमेट आणि प्रशिक्षणामुळे वाचले

डॉक्टरांनी सांगितले की, गुरबाजने हेलमेट घातल्यामुळे जास्त काही दुखापत झाली नाही. त्यांच्या वाचण्यामागे त्यांच्या प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे. दुसरीकडे, गुरबाजचे वडील रिशमदीप सिंग म्हणाले की, त्यांचा मुलगा आता ठीक आहे आणि जखम भरल्यानंतर परत तो माउंट हुड चढण्यासाचे लक्ष पूर्ण करणार आहे.

Share