";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मशिदीत होणार हिंदू पद्धतीने विवाह, वधुला 10 तोळे सोने आणि 2 लाखांच्या भेटवस्तुही मिळतील

मशिदीत होणार हिंदू पद्धतीने विवाह, वधुला 10 तोळे सोने आणि 2 लाखांच्या भेटवस्तुही मिळतील

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

अलप्पुझा- सोशल मीडिया एक लग्नाचे कार्ड सध्या खूप व्हायरल होत आहे. या कार्डवर लिहील्यानुसार केरळच्या एका मशिदीत 19 जानेवारीला एक हिंदू दांपत्याचा विवाह होणार आहे. याबाबत चेरुवल्ली मुस्लिम जमात समितीचे सचिव नुजुमुद्दीन अलुमुट्टिलने सांगितले की, "मशिदीजवळच हिंदू कुटंबातील बिंदू आणि दिवंगत अशोकन यांची मुलगी अंजू (22) चे लग्न करण्यात येत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कुटुंबाने मशीध समितीकडे मदतीची मागणी केली होती. मशीद समिती अंजूला 10 तोळे सोने आणि दोन लाख रुपयांच्या गृहोपयोगी वस्तूदेखील देणार आहे. हे लग्न संपूर्णपणे हिंदू पद्धतीने होईल समितीने 1,000 लग्नात 1 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्थाही केली आहे."

नुजुमुद्दीन अलुमुट्टिल पुढे म्हणाले की, "2018 मध्ये अशोकन यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. मी त्यांच्या लहान मुलाच्या शिक्षणासाठी वयक्तिकरित्या मदत केली होती. लग्नाचा खर्च खूप असल्यामुळे कुटुंबाने मशीद समितीकडे मदतीची मागणी केली. त्यानंतर सर्वानुमते मदत करण्याचे ठरवण्यात आले."

लग्नाचा कार्ड व्हायरल

लग्नाच्या कार्डवर लिहीलेल्या मजकुरानुसार, वर शरत शशी आणि वधू अंजूचे लग्न 19 जानेवारीला सकाळी 11.30 ते 12.30 दरम्यान मशिदीत केले जाणार आहे.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 12

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds