";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- मुजफ्फरनगरमध्ये सीएए हिंसाचारातील ५३ आराेपींची सीसीटीव्हीने पटली ओळख

मुजफ्फरनगरमध्ये सीएए हिंसाचारातील ५३ आराेपींची सीसीटीव्हीने पटली ओळख

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

मुजफ्फरनगर - उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगरमध्ये गेल्या वर्षी नागरिकता संशाेधन कायद्याच्या विराेधात झालेल्या आंदाेलनानंतर भडकलेल्या हिंसाचाराबद्दल ५३ आराेपींकडून २३ लाख ४१ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. अधिकृत सूत्रांनी गुरुवारी सांगितले की, २० डिसेंबरला सीएएच्या विराेधात शहराच्या विविध भागांत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारावर आराेपींची आेळख पटवण्यात आली. या सर्वांना सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल नुकसान भरपाई करण्याबाबत नाेटिसा पाठवण्यात आल्या. या प्रकरणी न्यायालयानेही या आेळख पटवण्यात आलेल्या ५३ आराेपींकडून २३ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात यावी असे म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले अपर जिल्हाधिकारी (प्रशासन) अमित सिंह यांनी संबंधित पाेलिस ठाण्यांकडून आरोपींविषयी अधिक पुरावे मागितले आहेत. त्या आधारावर आराेपींच्या मालमत्तेतून नुकसान भरपाई होईल. या प्रकरणात एडीएम प्रशासनाला पोलिसांनी ५३ आरोपींविरुद्ध ठोस पुरावे दिले आहेत. सिव्हिल लाइन पाेलिस ठाण्याने ५९ जणांची नावे दिली आहेत. यामध्ये आराेपी सरफराज इम्रान कालाेनी आणि मुजफ्फर अली (महमूदनगर) यांच्या नावाचा अहवालामध्ये दाेन वेळा उल्लेख आहे. यातील चार आराेपी अल्पवयीन निघाले. सिंह म्हणाले, पोलिस स्टेशन परिसरातील उपद्रवादरम्यान झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन सहायक विभागीय परिवहन अधिकारी व पोलिस विभागाने केले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 15

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds