";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कट-कॉपी-पेस्टचे जनक टेस्लर कालवश; स्टीव्ह जॉब्ज त्यांना म्हणाले होते- तुम्ही सोन्याच्या खाणीवर बसलेले आहात, जग बदलू शकतात

कट-कॉपी-पेस्टचे जनक टेस्लर कालवश; स्टीव्ह जॉब्ज त्यांना म्हणाले होते- तुम्ही सोन्याच्या खाणीवर बसलेले आहात, जग बदलू शकतात

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

 

 

न्यूयाॅर्क : कॉम्प्युटरमध्ये कट, कॉपी व पेस्ट या कमांडचा शोध लावणारे ७४ वर्षीय शास्त्रज्ञ लॅरी टेस्लर यांचे निधन झाले. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स शाखेचे पदवीधर असलेल्या लॅरींनी १९७३ मध्ये झेरॉक्स पालो अल्टो रिसर्च सेंटरमधून कारकीर्दीस सुरुवात केली. त्यांनी केंद्रात टिम मॉट यांच्यासाेबत जिप्सी टेक्स्ट एडिटर तयार केले होते. यात त्यांनी शब्द कॉपी व मूव्ह करण्यासाठी पद्धत तयार केली. टेस्लर यांच्या संशोधनामुळे लोकांसाठी पर्सनल कॉम्प्युटरचा वापर सुलभ झाला होता. याशिवाय त्यांनी फाइंड आणि रिप्लेससारख्या कमांडही तयार केल्या, ज्यामुळे शब्द लिहिण्यापासून ते सॉफ्टवेअर विकसित करण्यासारखी अनेक कामे सोपी झाली. १९८३ मध्ये या कमांडचा अॅपलच्या सॉफ्टवेअरमध्ये लिसा कॉम्प्युटरसाठी वापर झाल्यापासून त्यांची ही कमांड लोकप्रिय झाली. टेस्लर यांनी अॅपल, अॅमेझॉन आणि याहूतही काम केले आहे.

फाइंड-रिप्लेससारखी कमांड तयार करून कॉम्प्युटरचा वापर सोपा केला

लॅरी टेस्लर यांनी १९६० मध्ये सिलिकॉन व्हॅलीत कामाला सुरुवात केली. त्या काळी कॉम्प्युटर काही लोकापुरतेच मर्यािदत होते. झेरॉक्स सोडल्यानंतर लॅरींनी १९८० मध्ये अॅपलमध्ये काम सुरू केलेे. तेथे त्यांनी १७ वर्षे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम केले. २०११ मध्ये कॅलिफोर्नियातील एका कार्यक्रमात त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले होते, २७ सप्टेंबर १९७९ चांगला लक्षात आहे. तेव्हा मला अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांना झेरॉक्सचे अल्टो कॉम्प्युटर दाखवण्याची संधी मिळाली होती. यात आयकॉन, विंडो, फोल्डर, माऊस आणि मेरी कट, कॉपी आणि पेस्ट या तंत्रांचा समावेश होता. हे पाहताना स्टीव्ह अत्यंत उत्साहित होते. ते कधी माझ्याकडे आणि कधी स्क्रीनकडे बघत होते. प्रेझेंटेशननंतर ते म्हणाले, तुम्ही तर सोन्याच्या खाणीवर बसलेले आहात, जग बदलू शकतात. मी उत्तरलो, हे तंत्रज्ञान उपयोगी पडू शकते तर तुम्ही याचा वापर का करत नाहीत? असे म्हणताच त्यांनी नवीन कामांसाठी माझ्यासोबत करार केला. माझ्या सर्व तंत्रांना अॅपलमध्ये जागा दिली. या तंत्रज्ञानामुळे माझ्या कंपनीला किती फायदा झाला आहे हे ते मला नेहमी सांगायचे. तसेच कंपनीच्या प्रत्येक यशानंतर ते माझे आठवणीने अभिनंदन करायचे. मी आनंदी आहे. कारण आयफोन, आयपॅडमधील अनेक तंत्रांवर मी काम केले आहे, जे भविष्याला नवी दिशा देतील.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 14

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds