";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- गुजरातसारख्या सुसंस्कृत राज्यात एका दिवसाच्या मुलीवर शस्त्राने 20 हून अधिक घाव

गुजरातसारख्या सुसंस्कृत राज्यात एका दिवसाच्या मुलीवर शस्त्राने 20 हून अधिक घाव

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

राजकोट : गुजरातच्या राजकोटमध्ये हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली. ठेेबचडा गावाजवळ बुधवारी सकाळी ११ वाजता, सुमारे २० तरुण क्रिकेट खेळून परतत होते. तेव्हा त्यांना एका मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर काही वेळातच त्यांना एक कुत्रा मुलीला तोंडात धरुन फरपटत नेत असल्याचे दिसले. त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली. विपुल रेयणी या मुलाने रुग्णवाहिकेस फोन केला आणि तिला राजकोटच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले . एका महिलेनेच त्या मुलीस जन्मानंतर झाडीत फेकल्याचे निष्पन्न झाले. तिच्या पाठीवर, पोटावर तसेच संपूर्ण शरीरावर जागोजागी घाव दिसले. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा तेही घाबरले. तिच्या शरीरावर व पाठीवर धारदार शस्त्राने केलेल्या जखमेचे १५ ते २० घाव होते. आता तिच्यावर उपचार सुरू आहेत.

आई होऊन आम्ही करू तिचा सांभाळ : आयुक्त

राजकोटचे पोलिस आयुक्त मनोज अग्रवाल यांनी दैनिक भास्करला लिहिले, पोलिस मुख्यालयात बुधवारपासून अंबेमातेचा महोत्सव सुरू झाला अाहे. यामुळे आम्ही तिचे नाव अंबा ठेवला आहे. या निष्पाप जीवाचा ज्याने क्रूरपणे बळी घेण्याचा प्रयत्न केला त्याला तर शोधूनच काढू. जोपर्यंत कोणी अंबेवर हक्क सांगणारा पुढे येत नाही, तोपर्यंत तिची आई होऊन पोलिस तिचा सांभाळ करतील. मुलांपेक्षा मुलींच खूप सामर्थ्यशाली आहेत, हे केवळ भारतच नव्हे तर जगभरातील मुलींनी सिद्ध केले आहे. आम्ही या नवजात मुलींची लवकर बरे होण्याची कामना करत आहोत.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 14

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds