";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- रेल्वेत स्वच्छता करणाऱ्या चाळीसगावच्या मृत भिकाऱ्याच्या बँक खात्यात सापडले १२ लाख

रेल्वेत स्वच्छता करणाऱ्या चाळीसगावच्या मृत भिकाऱ्याच्या बँक खात्यात सापडले १२ लाख

E-mail Print PDF

Add this to your website

 

चाळीसगाव - रेल्वेत स्वच्छता करून भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या चाळीसगाव येथील रहिवासी इंदलसिंग फुलचंद ठाकूर यांचा २९ फेब्रुवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांना त्यांच्या बँक व पोस्ट खात्यात तब्बल १२ लाख रुपयांची शिल्लक आढळून आली आहे.

इंदलसिंग ठाकूर (वय ५२, रा. हनुमानवाडी, ता. चाळीसगाव) हे फाटलेली बनियन, मळकट कपडे अशा अवस्थेत आपल्या हातातील शर्टचे फडके तर कधी झाडूने रेल्वेच्या डब्यात साफसफाई करून प्रवाशांकडे भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत हाेते. चेहरा हसमुख व नेहमी विविध विषयांवर भाष्य करणारे, गाणे म्हणत मनाेरंजन करणारे ठाकूर हे रेल्वे प्रवास करणाऱ्यांना चांगलेच परिचित हाेते. त्यांची काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आले होते. २९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर याबाबतची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना देण्यात आल्यानंतर पाेलिसांनी त्यांच्या परिवाराचा शोध घेण्यासाठी त्यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली. त्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चाळीसगाव शाखेचे पासबुक व पोस्टाच्या आरडीच्या पावत्या मिळून आल्या. ते तपासले असता खात्यात तब्बल १२ लाख रुपयांची रोकड आढळून आल्याने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, इंदलसिंग ठाकूर यांच्या औरंगाबाद येथील नातेवाइकांची माहिती मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेजारचे म्हणाले, बँकेत नित्यनेमाने ये-जा करत

पाेलिसांनी ठाकूर यांच्या घराशेजारी राहणाऱ्यांकडे विचारपूस केली. त्या वेळी ते बऱ्याच वर्षांपासून रेल्वेत साफसफाई करून प्रवाशांकडे भीक मागून उदरनिर्वाह करीत हाेते. या कामातून मिळालेले पैसेे बँकेत जमा करण्यासाठी ते नित्यनेमाने बँकेत जायचे, असे सांगण्यात आले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 27

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds