";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- कोरोनाचा कहर / इटली : 10 हजार भावी डॉक्टर उतरवले मैदानात

कोरोनाचा कहर / इटली : 10 हजार भावी डॉक्टर उतरवले मैदानात

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

इटलीत झुंज - मुकाबल्यास सज्ज डॉक्टरांचा चमू : छायाचित्र रोमचे आहे. क्युबा, व्हेनेझुएला व चीनमधून डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक येथे दाखल झाले. त्यांना काम सुरू करण्याआधी परिस्थितीबाबत माहिती दिली गेली. लवकरच आणखी ९ पथके इटलीत येतील.

रोम/तेहरान/ वॉशिंग्टन : इटलीत कोरोना व्हायरसमुळे चोवीस तासांत आणखी ३४५ जणांचा मृत्यू झाल्याने सरकार हादरले. या संकटावर मात करण्यासाठी सरकारने १० हजार वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना मैदानात उतरवले आहे. त्यांची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयांत तैनात करण्यात आले आहे. देशावरील सर्वात मोठ्या आरोग्यविषयक संकटातून बाहेर पडण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री गेटाने मॅनफ्रॅडी म्हणाले, ८ ते ९ महिन्यांनंतर पदवी संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याआधीच जबाबदारी दिली जावी, असा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याशिवाय त्यांना परीक्षेतून सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे ते तणावमुक्त होऊन रुग्णसेवा करू शकतील. या निर्णयामुळे डॉक्टरांची संख्या कमी असल्याची समस्या जाणवणार नाही. इटली याआधी रविवारी ३६८ जणांचा मृत्यू झाला. सोमवारी ३४९ जण दगावले. आतापर्यंत २ हजार ५०३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात ३१ हजार ५०६ लोक बाधित आहेत. इटलीतील सर्व मोठी शहरे कोरोनाबाधित झाली आहेत.

इराणमधील परिस्थिती आणखी वाईट, ३५ लाख लोकांच्या मृत्यूचे भय

चीन, इटलीनंतर इराणमध्ये कोरोनाची सर्वाधिक बाधा झाली आहे. आतापर्यंत १७ हजार ३६१ लोकांना बाधा झाली आहे. ११९२ जणांचा मृत्यू झाला. इराणमधील एका अभ्यासानुसार मेपर्यंत इराणमध्ये ३५ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. इराणला या महामारीशी मुकाबला करण्यासाठी कुवेतने ७५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

कक्षा वाढतेय : अमेरिकेत १०० हून जास्त मृत्यू, नासामध्ये बाधा, संयुक्त राष्ट्राच्या बैठका रद्द

अमेरिकेतील सर्व ५० राज्यांत संसर्ग वाढला आहे. १०० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ६५०० हून जास्त लोक बाधित आहेत. अमेरिकेच्या नौदलाने आपल्या जहाजांचा वापर सामान्य लोकांच्या वैद्यकीय सेवेसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. अंतराळ संस्था नासाने कोरोनाचा धोका लक्षात घेऊन १७ हजार कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सूचना दिली आहे. संयुक्त राष्ट्राने याच आठवड्यातील प्रस्तावित सुरक्षा परिषदेची बैठक रद्द केली आहे. ब्रिटनच्या नागरिकांना ३० दिवसांसाठी प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परदेशात जाणाऱ्या लोकांना काही कालावधीसाठी परतण्याची परवानगी मिळणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. येथे २६२६ प्रकरणे आहेत. चोवीस तासांत ६७६ जणांना बाधा झाली. पंतप्रधान जॉन्सन यांनी दररोज २५ हजार नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. युरोपीय संघटनेने अनावश्यक प्रवासावर एक महिन्यासाठी निर्बंध लावले आहेत. फ्रान्समध्ये आणखी २७ जणांचा मृृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या १७५ वर पोहोचली.

पाकिस्तान - लॉक डाऊन झाल्यास भूकबळी : इम्रान खान

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, देशात लॉक डाऊन करणे कठीण आहे. देशातील २५ टक्के लोकसंख्या गरिबीत जगतात. शहर बंद करण्यात आल्यास लोकांना विषाणूपासून तर वाचवू परंतु ते भूकबळी ठरतील. पाकिस्तानात २५४ जणांना बाधा झाली आहे. चीनमधून परतलेले परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनाही बाधा झाली. पाकने जागतिक बँकेकडे २० कोटी डॉलर्सचे कर्ज मागितले आहे.

दक्षिण कोरिया - रस्ते, कारमध्येही चाचणी; संसर्ग वाढवल्यास कारवाई

दक्षिण कोरियात संसर्गाच्या प्रकरणांत अचानक वाढ झाली. सर्वाधिक प्रभावी देगू शहरातील नर्सिंग रुग्णालयात ८७ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. लोकांची चाचणी कार तसेच रस्त्यावर केली जात आहे. आतापर्यंत ८४ जणांचा मृत्यू झाला तर ८ हजार ४१३ जण बाधित झाले. दुसरीकडे संसर्ग वाढवल्याबद्दल प्रशासनाने चर्चचे संस्थापक ली-मन-ही व इतर ११ जणांवर खटला चालणार आहे.

स्पेन - २४ पासून हॉटेल बंद, पर्यटकांना जाण्याचे आदेश

लॉक डाऊनला सामोरे जाणाऱ्या स्पेन सरकारने सर्व हॉटेल २४ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले. त्यात थांबलेल्या पर्यटकांना जाण्याच्या सूचना दिल्या. येते १३ हजाराहून जास्त बाधित आहेत. ५५८ जणांचा मृत्यू झाला आहे. माद्रिदची परिस्थिती वाईट आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग म्हणाले, कोरोनाशी लढण्यासाठी एकजुटीने काम करणार आहोत.

इस्रायल - २४ तासांत ४० टक्के प्रकरणे, फोन ट्रॅकिंग सुरू

इस्रायलमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाची ४० टक्के प्रकरणे समोर आली. एकूण ४२७ बाधित आहेत. पंतप्रधान नेतन्याहू यांनी दररोज ३ हजार लोकांच्या चाचणीचे आदेश दिले. त्याशिवाय पुढील एक महिन्यापर्यंत लोकांचे मोबाईल ट्रॅकिंग करण्याचेही आदेश दिले आहेत. त्या अंतर्गत सरकार संसर्ग व संशयित रुग्णांच्या मोबाईल संभाषणावर निगराणी ठेवेल.

युद्धपातळीवर जग कामाला; चीनचा हेल्थ सिल्क मार्गाचा प्रस्ताव, काही ठिकाणी हेल्थ सर्टिफिकेट, अॅडव्हान्सची पावती

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 4

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds