";} /*B6D1B1EE*/ ?>
वाचकांसाठी सूचना - सद्यपरिस्थिती लक्षात घेता, साप्ताहिक अंबर चे ऑफिस काही काळासाठी बंद ठेवत आहोत. २२ मार्चचा अंक प्रकाशित झाला आहे पण पोस्ट ऑफिस बंद असल्याने तो आपणास पाठवू शकत नाहीये. ताजा अंक वाचण्यासाठी वाचकांनी ह्या संकेतस्थळावरील E-Paper ह्या पेज वर जाऊन वाचावे ही विनंती. आपण सर्वे जन ह्या संकटातून लवकर बाहेर पडू आणि ह्या वर मात करूया. आपणा सर्वाचे सहकार्य असुदयावे. तसदी बद्दल क्षमस्व.
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- अमेरिका / 45 युवकांवर केले गेली कोरोना व्हॅक्सिनची ट्रायल, लस बनवण्यासाठी लागू शकतात 18 महिने

अमेरिका / 45 युवकांवर केले गेली कोरोना व्हॅक्सिनची ट्रायल, लस बनवण्यासाठी लागू शकतात 18 महिने

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

हेल्थ डेस्क : अमेरिकेने कोरोना व्हायरसवर व्हॅक्सिन तयार केले आहे, ज्याचे ट्रायल सोमवारी वॉशिंग्टन आरोग्य अनुसंधान संस्थेमध्ये झाले. पहिल्या ट्रायलमध्ये 45 तंदुरुस्त तरुणांना सामील केले गेले. हे कोरोना व्हायरसने संक्रमित नाहीत पण व्हॅक्सिनचे साइड इफेक्ट जाणून घेण्यासाठी आधी यांना सामील केले गेले आहे.

व्हॅक्सिनची वैशिष्ठ्ये...

1) हे व्हॅक्सिन अमेरिकन फार्मा कंपनी मॉडर्माने तयार केले आणि याचे फंडिंग करत असलेल्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थसोबत मिळून ट्रायल केले जात आहे. ट्रायलमध्ये यश मिळण्यानंतरही हे तयार करण्यासाठी 18 महिने लागतील.

2) हे व्हॅक्सिन जेनेटिक इंजीनिअरिंगवर आधारित आहे. जेव्हा रुग्णांना याचे इंजेक्शन दिले जाते तेव्हा शरीरातील पेशी व्हायरसला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापतात. तुड्यांच्या मदतीने शरीराची इम्यून सिस्टीम व्हायरस ओळखण्यास सुरुवात करते.

3) इंजेक्शनमध्ये असलेले औषध आरएनएला प्रभावित करते जे इम्यून सिस्टिमला आपले टार्गेट म्हणजेच व्हायरसला पकडण्याचा आदेश देते.

4) वैज्ञानिक थेअरीनुसार, जेव्हा कृत्रिम आरएनए मनुष्याच्या शरीरात जातात तेव्हा पेशींमध्ये पोहोचून जास्त प्रमाणात प्रोटीन तयार करू लागते. हे प्रोटीन व्हायरसच्या वरच्या स्तराशी मिळते जुळते असते. जे इम्यून सिस्टीमवर दबाव बनवते की, मनुष्याला इजा न पोहोचवता व्हायरसला पकडावे.

एप्रिलमध्ये व्हायचे होते ट्रायल...

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जी अँड इंफेक्शियस डिसीजचे डायरेक्टर अँथनी फॉसी यांच्यानुसार, सुरुवातीचे ट्रायल यशस्वी असते. जगभरातील रुग्णांना हे उपलब्ध करून देण्यात दीड वर्ष लागेल. आधी या व्हॅक्सिनचे ट्रायल एप्रिलमध्ये होणार होते पण जगभरात कोरोना व्हायरसने पीडित रुग्णांचा वाढता आकडा समोर आला आणि ताराखेमध्ये बदल करावा लागला.

अमेरिकेमध्ये कोरोनाने आतापर्यँत 68 मृत्यू...

जगाच्या 157 देशांना कोरोनाने आपला निशाणा बनवले आहे. यामुळे जगभरात 6,515 आणि अमेरिकेमध्ये 68 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात 1,69,524 लोक अजूनही कोरोनाच्या जाळ्यात आहेत.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 3

Greenleaf


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds