";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोणावळे, दि. 25 : शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहर शिवसेनेतर्फे त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. तसेच शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा संघटक शादान चौधरी, शहर प्रमुख सुनील इंगुळकर, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, सिंधू परदेशी, बाळासाहेब फाटक, सुभाष उनकर, दीपाली भिलारे, प्रवीण काळे, जयवंत दळवी, प्रकाश   पाठारे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

तुंगार्ली शाखेच्या वतीने कार्ला येथील एकवीरा गडावरून आणलेल्या हिंदू जागर ज्योतीचे लोणावळ्यात स्वागत करण्यात आले. सकाळी आठ वाजता खंडाळा बाजारपेठेत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. नगरपालिका प्राथमिक, माध्यमिक शाळेध्ये विद्यार्थ्यांना खाऊवाटप, जुना खंडाळा येथील अंध वृद्धाश्रमात अन्नदान तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पटांगणात नागरिकांना फराळवाटप करण्यात आले. बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवसेनेतर्फे शहरात सभासद नोंदणीला सुरुवात झाली. महेश खटाडे, संजय भोईर, विजय आखाडे, भगवान देशमुख, संजय शिंदे, तानाजी सूर्यवंशी, श्याम सुतार, मनीषा भांगरे, प्रतिभा कालेकर, प्रभा अकोलकर, संगीता कंधारे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 28

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds