";} /*B6D1B1EE*/ ?>
साप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......
मुख्य पान -- पुढे वाचा >> -- नारायणी धाम पोलीस चौकी शासनाच्या नावावर करा, अन्यथा आंदोलन - प्रकाश पोरवाल

नारायणी धाम पोलीस चौकी शासनाच्या नावावर करा, अन्यथा आंदोलन - प्रकाश पोरवाल

E-mail Print PDF

Add this to your website

 

 

लोणावळा, दि. 24 : नागरी सहभागातून बांधण्यात आलेल्या नारायणी धाम पोलीस चौकीची इमारत शासन किंवा लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या नावे करण्यात यावी, याकरिता सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोरवाल यांनी आंदोलन करण्याचा इशारा यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. 2016 मध्ये नागरिक सुरक्षिततेकरिता मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग वलवण, (नारायणी धाम रस्ता), रायवूड व भांगरवाडी येथे लोकसहभागातून पोलीस चौक्या उभारण्यात आल्या. त्यांपैकी नारायणी धाम मार्गावरील चौकीला भोगवटादार म्हणून सुन विष्णु पाटील असे नाव आहे.

नगरपरिषद कर व विद्युतमंडळ लाइट बिलदेखील त्यांचे नावे आहे. त्यामुळे सदर इमारत खासगी व्यक्तीच्या नावे कशी? असा सवाल पोरवाल यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पोलीस प्राधिकरण समिती व पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही पत्रव्यवहार केला आहे. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, सदर चौकीच्या जागी पोस्ट ऑफिसचे आरक्षण आहे.

त्यावर अनधिकृतपणे पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे. या जागेत तत्कालीन पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी त्यांच्या नातेवाईक सुन पाटील यांना हॉटेलकरिता जागा दिली होती. त्यांच्या नावाची पाटी तेथे असून, भोगवटादार म्हणून त्यांच्या नावावर लाईट बिल व करपावती येते. नागरिकांच्या सुरक्षेकरिता ही चौकी उभारण्यात आली आहे. परंतु कोणाला अडचणीची वाटत असल्यास ती संबंधित यंत्रणांनी पाडून टाकावी, असे आय.एस. पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले. तसेच नाहक बदनामी केल्याप्रकरणी पोरवाल यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सदर तक्रारीत काहीही तथ्य नसल्याचे लोणावळा पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले. वैयक्तिक हेव्यादाव्यातून ही कृती होत आहे, असे ते म्हणाले. पाटील कुटुंबीयांपैकी कोणीही तेथे येत नाही. वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रकरणाची पडताळणी करण्यात येईल, असे ते म्हणाले. नारायणी धाम पोलीस चौकीची जागा आरक्षित असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. याबाबत कागदपत्रे शहानिशा, तसेच सदर जागेवर भोगवटादार म्हणून सुन पाटील यांचे नाव कसे आले याबाबत शहानिशा करून निर्णय घेतला जाईल असे लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.

Share
 

वाचकांची संख्या

ह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 31

gurudev

maxx


amber saptahik amber weekly amber e-amber eamber marathi news marathi batmya talegaon news talegaon batmya lonavala news lonavala batmya chakan news chakan batmya 
maval news maval batmya pimpri news pimpri batmya chinchwad news chinchwad batmya pune news pune batmya maharashtra news maharashtra batmya  talegaon chakan
lonavala pimpri chinchwad pune real estate talegaon real estate chakan real estate lonavala real estate pimpri real estate chinchwad real estate maval real estate pune real estate
classifieds talegaon classifieds chakan classifieds maval classifieds lonavala classifieds pimpri classifieds chinchwad classifieds pune classifieds